Zebra Animal Information In Marathi लहानपणापासूनच इंग्रजी मुळाक्षरे म्हणताना ओळखीचा झालेला प्राणी म्हणजे झेब्रा होय. आफ्रिकेमध्ये उगम पावलेले हे झेब्रे त्यांच्या रंगासाठी ओळखले जातात. अगदी वैशिष्ट्यपूर्ण रंग असणारे हे प्राणी पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या पट्टेरी स्वरूपात आढळून येतात.
झेब्रा प्राण्याची संपूर्ण माहिती Zebra Animal Information In Marathi
या प्राण्यांच्या मुख्यतः तीन प्रजाती अस्तित्वात असून, हे प्राणी गाढव आणि घोडा या दोन प्रजातीशी साधर्म्य दाखवत असतात. जसे मानवाच्या बोटांवरील ठसे वेगवेगळ्या स्वरूपात असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक झेब्राच्या अंगावर असलेल्या काळा पांढऱ्या पट्ट्यांचे स्वरूप हे प्रत्येकासाठी वेगवेगळे असते.
या प्राण्यांच्या रंगावर अनेक प्रयोग केले गेलेले असून, त्यातून विविध सिद्धांत देखील मांडले गेलेले आहेत. मुख्यतः दक्षिण आफ्रिका आणि पूर्व आफ्रिका या ठिकाणी आढळणारे हे प्राणी डोंगराळ भाग, गवते, वने, वनस्पती किंवा गवताळ प्रदेश इत्यादी ठिकाणी राहणे पसंत करत असतात. आजच्या भागामध्ये आपण झेब्रा प्राण्याबद्दल इत्यंभूत माहिती जाणून घेऊया…
नाव | झेब्रा |
कुटुंब किंवा कुळ | इक्विडे |
वास्तव्य स्थान | डोंगराळ भाग, वने, आणि गवताळ भाग |
साधारण वेग | प्रती तास ६५ किलोमीटर |
खाण्याच्या सवयी | झुडुप, गवत |
साधारण लांबी | आठ फूट |
साधारण वजन | ३०० किलो ते ४१० किलो |
ओळख | उत्कृष्ट कान व डोळे |
शरीराने घोड्यासारखा असणारा मात्र वैशिष्ट्यपूर्ण रंगाचा झेब्रा हा प्राणी आपल्यापैकी सर्वांनाच माहिती असेल. गुंडाळलेली शेपटी, लहान पाय व मान, आणि ताठ शरीर हे या झेब्रा प्राण्याचे वैशिष्ट्य आहेत. या प्राण्याच्या अंगावर असणाऱ्या रंगाला विघ्नकारी रंग म्हणून देखील ओळख आहे. हा प्राणी शक्यतो सकाळच्या वेळी अर्थात पहाटे आपले अन्नग्रहण करायला प्राधान्य देत असतो. जास्तीत जास्त फायबर युक्त असलेले गवत खाण्यास त्याचा कल असतो.
झेब्रा या प्राण्याचे वर्तन:
अतिशय शुभ प्रकारचे समजले जाणारे हे प्राणी शिकारी लोकांना शक्यतो घाबरत नाहीत. त्याचबरोबर वाघ, सिंह, जंगली कुत्रे, यांच्यासारख्या हिंस्त्र प्राण्यांशी देखील दोन हात करण्याची क्षमता या प्राण्यांमध्ये असते. कळपाने राहायला आवडणारे हे प्राणी समाजशील स्वरूपाचे समजले जातात.
या प्राण्यांचे कळप फार मोठे असू शकतात. त्यांची संख्या सुमारे १००० प्राण्यांची देखील असते. साधारणपणे १५ ते २० प्राणी कुटुंब करून एकत्र राहत असतात. ज्यामध्ये नर, मादी आणि पिल्ले यांचा समावेश होतो. जरी ही अनेक कुटुंब एकत्र आले, तरी सुद्धा त्यात देखील हे प्राणी आपल्या कुटुंबासह एकत्र गट करून राहत असतात. त्यामुळे या प्राण्यांच्या एकजुटीला फार वाखाणले जाते.
झेब्रा हा प्राणी आपल्या गटातील सदस्यांसाठी फारच हळवा असतो. जर काही कारणास्तव गटातील एखादा सदस्य किंवा प्राणी दूर गेला, तर त्याला पुन्हा सापडण्यासाठी हे प्राणी संपूर्ण जंगल पालथे घालत असतात. एकमेकांच्या दुःखामध्ये सहभागी होत, आजारपणाच्या कालावधीमध्ये देखील प्रत्येकाची काळजी घेत असतात.
झेब्रा हा प्राणी स्थलांतर करण्यासाठी देखील ओळखला जातो. पुढे स्थलांतर केल्यानंतर गटातील लहान प्राणी आपले सोबती देखील निवडत असतात, आणि आपला वेगळा गट किंवा कुटुंब स्थापन करत असतात. शक्यतो या कुटुंबामध्ये मादी प्राण्याचे वर्चस्व मोठ्या प्रमाणावर आढळून येते. हे प्राणी आपल्या संततीला जन्माला घातल्यानंतर देखील एकत्रच राहत असतात.
झेब्रा प्राण्यामधील पुनरुत्पादनाची पद्धत:
झेब्रा हा एक सस्तन प्राणी असून, तो आपल्या पिल्लांना स्वतः जन्म देत असतो. मादी सुमारे ११ ते १२ महिने गरोदर राहत असते, आणि आपल्या पिल्लांना जन्म देते. या पिल्लांचे वैशिष्ट्ये म्हणजे जन्मानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटानंतर चालू शकणारे हे अपत्य तासाभरात तर वेगाने धावते सुद्धा.
जन्मतः ही पिल्ले काहीशी तपकिरी रंगांमध्ये असतात. मात्र त्यांच्या वाढीच्या कालावधीमध्ये त्यांच्या अंगावर पट्टे तयार होण्यास सुरुवात होते. यासाठी सुमारे जन्मापासून चार महिन्यांचा कालावधी जावा लागतो. जन्मनंतर अवघ्या एका आठवड्यात हा प्राणी स्वतःचा चारा खाऊ शकतो.
मात्र असे असले तरी देखील मादी झेब्रा आपल्या पिल्लांना १६ महिन्यांपर्यंत दूध प्यायला देत असते. या प्राण्यांची संख्या झपाट्याने वाढत नाही, कारण या गटातील लहान मुलांना सिंह किंवा तत्सम शिकारी प्राणी खात असतात. त्यामुळे एकूण प्राण्यांपैकी अर्धे प्राणी तर लहानपणी च मृत होतात.
झेब्रा प्राण्यांच्या विविध प्रजाती:
झेब्रा हा प्राणी वेगवेगळ्या प्रजातीमध्ये आढळून येतो. घोडा प्राण्याशी साधर्म्य दाखवणाऱ्या या प्राण्याच्या इक्वस झेब्रा, ग्रेव्ही झेब्रा, माउंटन झेब्रा, आणि प्लेन्स झेब्रा इत्यादी मुख्य प्रजाती आढळून येत असतात.
झेब्रा प्राण्याच्या संख्येमध्ये घट:
मानव हा निसर्गाला शाप आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण आपल्या स्वतःच्या हव्यासापाई मानव जीवसृष्टीच्या आणि निसर्गाच्या अगदी हात धुवून मागे लागलेला आहे. यातून झेब्रा प्राणी देखील सुटलेला नाही. मानव मोठ्या प्रमाणावर या झेब्रा प्राण्याची शिकार करत आहे.
त्याचबरोबर लहान अपत्यांना हिंस्र श्वापदांकडून किंवा विविध प्राण्यांकडून देखील मोठ्या प्रमाणावर शिकार करून खाल्ले जात आहे. परिणामी या प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असून, हा प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आलेला आहे.
झेब्रा प्राण्याबद्दल मजेदार तथ्य:
- झेब्रा प्राणी जन्मतः तपकिरी रंगांमध्ये असतो. त्यानंतर चार महिन्यांनी त्याचे रंग विकसित व्हायला लागतात.
- प्रत्येक झेब्रासाठी शरीरावर असणाऱ्या रंगांचे पट्टे हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात.
- झेब्रा हा देखील एक वेगवान प्राणी असून, प्रती तास ६५ किलोमीटर वेगाने तो धावू शकतो.
- झेब्रा आणि घोडे सोबत पाळले तर घोडे आजारी पडून मृत्युमुखी देखील पडू शकतात. कारण झेब्रा प्राणी मध्ये असणारे विषाणू घोड्यांसाठी मारक ठरतात.
- केशरी रंग सोडला तर झेब्रा प्राणी प्रत्येक रंग व्यवस्थितरित्या बघू शकतो.
निष्कर्ष:
आपल्या आसपास आढळणाऱ्या प्राण्यांबद्दल आपल्याला चांगली माहिती असते. त्याचबरोबर आपल्याला या प्राण्यांबद्दल फारसे अप्रूप वाटत नाही, मात्र काही वैशिष्ट्यपूर्ण प्राणी दिसला की मानवाला त्याबद्दल जिज्ञासा जागृत होत असते. आपल्याकडे साधारणपणे हा झेब्रा प्राणी दिसत नाही, त्यामुळे या प्राण्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो.
आपल्याकडे झेब्रा क्रॉसिंग ही संकल्पना आपल्याला माहिती आहे. तशाच रंगाचा हा प्राणी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून, आजच्या भागामध्ये आपण या प्राण्याबद्दल माहिती घेतली आहे. त्यामध्ये तुम्हाला या प्राण्याची वैशिष्ट्ये, त्याचे वर्तन, त्याच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रिया, त्याच्या शिकारी बद्दल माहिती, जेब्राच्या विविध प्रजाती, या प्राण्याबद्दल चे काही मनोरंजक व मजेदार तथ्य, इत्यादी माहिती बघितली आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असावी अशी आशा आहे.
FAQ
झेब्रा या प्राण्याचे साधारण आयुष्यमान किती समजले जाते?
झेब्रा या प्राण्याचे साधारण आयुष्यमान २० ते ४० वर्ष इतके समजले जाते.
झेब्रा या प्राण्याच्या लहान अपत्याबद्दल काय वैशिष्ट्ये सांगता येतील?
झेब्रा चे अपत्य जन्माला आल्यानंतर अवघ्या वीस मिनिटांमध्ये चालू लागते.
जगभरामध्ये साधारणपणे झेबऱ्यांची संख्या किती आहे?
साधारणपणे जगभरामध्ये झेब्रा या प्राण्याची संख्या साडेसात लाख इतकी आहे.
झेब्रा या प्राण्याची प्रजाती धोक्यामध्ये येण्याचे काय कारण आहे?
झेब्रा या प्राण्याची प्रजाती आज काल धोक्यामध्ये येत आहे, कारण मोठ्या प्रमाणावर मानवाकडून कातडी करिता या प्राण्याची शिकार केली जात आहे.
झेब्रा प्राण्याचे वैशिष्ट्ये काय सांगता येईल?
झेब्रा हा प्राणी त्याच्या रंगासाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्याच्या अंगावरील पट्टे हे प्रत्येक झेब्रासाठी वेगवेगळे असतात. ज्याप्रमाणे कुत्रे भुंकत असतात, तसेच हा प्राणी देखील भुंकतो. घोडा, गाढव आणि झेब्रा या प्राण्यांमध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य असते. असे असले तरी देखील गाढवाप्रमाणे या प्राण्याला काम करायला शिकविले जाऊ शकत नाही.