विदर्भ विभागा विषयी संपूर्ण माहिती Vidarbha Division Information In Marathi

Vidarbha Division Information In Marathi महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडील प्राकृतिक विभाग कोणता असे विचारले तर त्याचे उत्तर विदर्भ असे येते. अतिशय अवलव्यवेक स्वरूपाचा हा भूभाग दोन गटांमध्ये विभाजित करण्यात आलेले असून, एका प्रदेशाला देश तर दुसरा प्रदेशाला झाडी म्हणून संबोधले जाते. यातील झाडी प्रदेश हा जास्तीत जास्त वनांनी आच्छादलेला असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो. मात्र दुसऱ्या भागामध्ये पावसाचे प्रमाण फारच कमी आढळून येत असते.

Vidarbha Division Information In Marathi

विदर्भ विभागा विषयी संपूर्ण माहिती Vidarbha Division Information In Marathi

अतिशय टोकाची जैवविविधता असणाऱ्या या भागामध्ये तापमान देखील चांगले जाणवत असते. महाराष्ट्रातील एक उत्तम जिल्हा असणाऱ्या नागपूर देखील याच विभागांमध्ये येत असून, यातील गडचिरोली सारखा जिल्हा नक्षलवादी म्हणून घोषित केला गेलेला आहे. 

अतिशय उत्तम नद्या असणारा हा प्रदेश अनेक प्राणी प्रजातींचे माहेरघर म्हणून देखील ओळखला जात असतो. मुख्यतः महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेस वसलेल्या या प्रदेशाचे नागपूर आणि अमरावती असे दोन मुख्यालय समजले जात असतात. या प्रदेशात जवळपास ११ जिल्ह्यांचा समावेश असून, महाराष्ट्राचे जवळपास ३१ टक्के क्षेत्रफळ या एकट्या विदर्भ प्रदेशाने व्यापलेले आहे.

तर या परिक्षेत्रामध्ये जवळपास महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी एकवीस टक्के लोकसंख्या राहत असते. मात्र असे असले तरी देखील प्रगतीच्या दृष्टिकोनातून हा विदर्भ प्रदेश काहीसा मागे पडलेला आहे. कृषी क्षेत्रावर आधारित व्यवसाय या ठिकाणी जास्त प्रमाणात असून, मोठ्या प्रमाणावर येथे संत्री, सोयाबीन, आणि कापूस या पिकांचे उत्पादन घेतले जात असते. सोबतच अन्नधान्य पिकांमधील बाजरी, ज्वारी, आणि तांदूळ इत्यादी पिके देखील लागवड केली जात असतात.

विदर्भ हा शब्द वीर आणि तर्फ या दोन शब्दांपासून तयार झालेला असून, याचा अर्थ वीरांची भूमी किंवा वीरांचा प्रदेश असा होतो. कारण मुख्यतः या ठिकाणी यादव, सातवाहन, मराठा, वाकाटक, राष्ट्रकूट, इत्यादी उत्तम राज्यसत्तांनी राज्य केले असल्यामुळे या ठिकाणाला विरांची भूमी म्हणून ओळखले जाते. आजच्या भागामध्ये आपण या विदर्भ नावाच्या प्राकृतिक विभागाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.

गेल्या काही वर्षांमध्ये शेतकरी आत्महत्या या मुळे प्रसिद्धी पावलेला महाराष्ट्रातील विभाग म्हणजे विदर्भ होय. मुख्यतः कापूस पीक घेतले जाणारे हे ठिकाण बाजार भाव न मिळाल्यामुळे आणि पावसाने तसेच निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकऱ्यांना फारच आर्थिक संकटात टाकत आहे. या दरम्यान घेतलेली कर्जे देखील फेडणे शक्य न झाल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्याचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे या विदर्भ परिक्षेत्राकडे जातीने लक्ष देणे फारच महत्त्वाचे ठरते.

भारतातील या मुख्य ठिकाणाला भारताचे मध्य ठिकाण म्हणून देखील ओळखले जाते. येथे कापूस मोठ्या प्रमाणावर घेतला जात असून, शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी येथे कापसाला हमीभाव देण्याची पद्धत देखील सुरू करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे २००६ या वर्षी १ जुलै रोजी विदर्भाकरिता तत्कालीन भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जवळपास साडे सदतीस कोटी रुपये देण्याची वचन दिले होते, मात्र हा सर्व लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला की नाही याबद्दल कुणालाही खात्री नाही.

विदर्भाबद्दल ऐतिहासिक माहिती:

विदर्भ हा प्रदेश अगदी पुरानापासूनच अस्तित्वात असून, वेळोवेळी त्यात सीमा देखील बदलत गेलेल्या आहेत. पूर्वी हे राजधानीचे ठिकाण असलेले हे राज्य फार मोठ्या प्रमाणावर विस्तारले होते. मात्र आजकाल त्याचा विस्तार काहीसा कमी झालेला आहे.

सम्राट अशोक नावाच्या महान राजाने येथे राज्य केलेले असून, चंद्रपूर मधील शिलालेख या ऐतिहासिक घटनांचे साक्ष देत असतो. त्याचबरोबर इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये येथे मौर्य साम्राज्य देखील राज्य करत असल्याचे सांगितले जाते. शुंग, माधव सेन यांसारख्या राजवटीसह सातवाहनांनी देखील येथे राज्य केलेले आहे.  आणि याबद्दलच्या पुराव्यामध्ये तरहळा येथे आढळणारी नाणी देखील समजली जातात.

विदर्भाच्या विकासाकरिता नेहमीच प्रयत्न केले गेलेले असून, त्यासाठी अनेक महामंडळ देखील कार्यरत आहेत. त्यातीलच अलीकडील काळामध्ये स्थापन झालेले महामंडळ म्हणजे विदर्भ वैधानिक विकास मंडळ होय. याची स्थापना १९९४ मध्ये करण्यात आली होती. महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असणाऱ्या या प्रदेशाला नेहमीच दुर्लक्षित केले गेले, असे येथील लोकांचे आरोप असून वेगळा विदर्भ राज्य म्हणून घोषित करावा अशी मागणी नेहमीच केली जात असते.

विदर्भाचे भौगोलिक वर्णन:

विदर्भ गाविलगड टेकड्यांपासून अजिंठा पर्वत रांगेपर्यंत वसलेला असून, अतिशय उंच सखल भागासाठी याला ओळखले जाते. त्याचप्रमाणे येथे जंगल आणि उजाड प्रदेश असे टोकाचे जैव विविधता केंद्र वसलेले आहे. अनेक अभयारण्य या परीक्षेमध्ये वसलेले असल्यामुळे, या प्रदेशाला फारच महत्त्व प्राप्त झालेले आहे. या प्रदेशात महाराष्ट्रातील जास्तीत जास्त खनिजे संपत्ती आढळत असते.

निष्कर्ष:

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ बरेच मोठे असल्यामुळे यामध्ये तुम्हाला भौगोलिक स्वरूपाची विविधता देखील आढळून येत असते. अगदी कोकण हा समुद्रसपाटीचा प्रदेश तर त्याच्या लगेचच जवळ उंच उंच सह्याद्री पर्वत दिसून येत असतो. पूर्वेकडे उतारा असलेला पठार आणि सर्वात पूर्वेकडील विदर्भ असे अनेक प्रदेश महाराष्ट्र मध्ये असून, या सर्व प्रदेशांना वेगवेगळ्या वैशिष्ट्यांकरिता ओळखले जात असते.

विरांचा प्रदेश म्हणून ओळखला जाणारा विदर्भ महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील भाग असून, त्याचे दोन भागांमध्ये विभाजन केले गेलेले आहे. एका विभागाचे मुख्यालय अमरावतीमध्ये तर दुसऱ्या विभागाचे मुख्यालय नागपूर मध्ये आहे. जवळपास महाराष्ट्राचे एक तृतीयांश क्षेत्रफळ व्यापणारा हा विदर्भ नैसर्गिक दृष्टिकोनातून देखील अनेक विविधतेने नटलेला आहे.

या ठिकाणी अगदी टोकाच्या जैवविविधता आढळून येत असतात. त्याचबरोबर विविध प्रकारच्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या देखील प्रजाती असून, याचा गडचिरोली हा जिल्हा नक्षली जिल्हा म्हणून ओळखला जातो.

आजच्या भागामध्ये आपण या विदर्भाबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली असून, विदर्भाबद्दल ऐतिहासिक माहिती तसेच पुराण कथांमध्ये आढळणारा उल्लेख, या ठिकाणी झालेला नागपूर करार, स्वातंत्र्य चळवळीमध्ये विदर्भाचे महत्व, येथील नैसर्गिक साधन संपत्ती, लोकसंख्या, येथील साहित्य रचना आणि संस्कृती इत्यादी माहिती घेतलेली असून, येथील मुख्य समाज सुधारकांची देखील नावे जाणून घेतलेली आहेत. तसेच येथे आढळणाऱ्या काही पर्यटन स्थळांबद्दल देखील जाणून घेतले आहे.

FAQ

विदर्भ या महाराष्ट्रातील प्राकृतिक विभागामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश होत असतो?

महाराष्ट्रातील विदर्भ या अतिपूर्वेकडील प्राकृतिक विभागामध्ये सुमारे ११ जिल्ह्यांचा समावेश होत असतो.

विदर्भातील काही थोर समाजसुधारकांची नावे काय आहेत?

विदर्भामध्ये विनोबा भावे, संत तुकडोजी महाराज’ संत गाडगे महाराज, बाबा आमटे, जमनालाल बजाज, वसंतराव नाईक, आणि पंजाबराव देशमुख यांच्यासारखे अनेक दिग्गज समाजसुधारक आणि राज्यकर्ते होऊन गेलेले आहेत.

विदर्भ परिसरामध्ये कोणकोणत्या ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत?

विदर्भ हा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असून, या ठिकाणी स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळ, नागपूर करार, आणि बेरार आढावा यांसारख्या अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत.

विदर्भामध्ये कोणकोणती पर्यटन स्थळे आहेत?

विदर्भ पर्यटन स्थळांच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय समृद्ध असून, या ठिकाणी भामरागड, सुरजागड, चिखलदरा, आणि सोमनवर नावाची थंड हवेचे ठिकाण आहेत. त्याचबरोबर येथे ताडोबा राष्ट्रीय अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प देखील असून, अनेक हेमाडपंथी मंदिरे येथे वसलेली आहेत. त्यासोबतच अनेक शिल्पे आणि नरनाळा किल्ला आणि गाविलगड टेकड्यांसाठी देखील हा विदर्भ ओळखला जातो.

प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे विदर्भ या प्रदेशाची राजधानी कोणती होती, व त्याचा विस्तार किती होता?

अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये विदर्भाचा उल्लेख असून, त्यावेळी कुंडीनपूर ही विदर्भाची राजधानी होती असे सांगितले जाते. त्या दरम्यान नर्मदा नदीपासून कृष्णा नदीपर्यंत आणि खानदेशापासून छत्तीसगड पर्यंत या विदर्भाचा विस्तार होता असे सांगितले जाते.

Leave a Comment