वज्रासन व्यायामची संपूर्ण माहिती Vajrasana Exercise Information In Marathi

Vajrasana Exercise Information In Marathi प्रत्येकाला सुंदर व सुडौल शरीर हवे असते, मात्र दररोजच्या कामाच्या व्यापामुळे तसेच कंटाळा आल्यामुळे कोणीही शरीरासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. मात्र जेव्हा कुठलीतरी व्याधी मागे लागते, तेव्हा या व्यायामाचे महत्त्व लोकांना समजू लागते. आपल्या भारतीय संस्कृतीने विविध आसनांचा व्यायाम प्रकार निर्माण केलेला आहे. ही आसने अतिशय कमी वेळेमध्ये करता येणारी असतात. त्यामुळे व्यक्तीला सहजरीत्या शक्य होते.

Vajrasana Exercise Information In Marathi

वज्रासन व्यायामची संपूर्ण माहिती Vajrasana Exercise Information In Marathi

या आसनामधील एक आसन म्हणजे वज्रासन होय. हे आसन करण्यासाठी अतिशय सोपे असते. यामध्ये कमरेखालील अवयवांचा व्यायाम केला जातो, आजच्या भागामध्ये आपण या वज्रासन बद्दल इथे माहिती बघणार आहोत, व त्याचे शरीरावर होणारे फायदे जाणून घेणार आहोत…

नाववज्रासन
प्रकारव्यायाम प्रकार
उपप्रकारआसन किंवा योगासन
समाविष्ट अवयवगुडघे व पाय
फायदेकमरेखालील शरीराला सुदृढ करणे, तसेच पोटाचे आरोग्य सुधारणे

वज्रासन म्हणजे नेमके काय असते:

पाय व गुडघे यांच्यासाठी मुख्य व्यायाम म्हणून संबोधले जाणारे वज्रासन आपण बसून करू शकतो, असा व्यायाम आहे. या व्यायामासाठी गुडघे वाकवून पायांवर बसले जाते, आणि अशा रीतीने प्राणायाम केले जातात. या व्यायाम प्रकाराला डायमंड पोझिशन या नावाने देखील इंग्रजी भाषेमध्ये ओळखले जाते. या स्थितीमध्ये बसल्यानंतर तुम्ही कपालभाती, अनुलोम-विलोम यांसारखे प्राणायाम चे प्रकार करू शकता, ज्यामुळे तुमच्या संपूर्ण आरोग्याला फायदा होण्यास मदत मिळते.

वज्रासनाची योग्य पद्धत:

अनेकांना योगासने करायची असतात, मात्र त्यासाठी योग्य ज्ञान असत नाही. तसेच या योगासनांच्या क्लासेसची फी देखील भरमसाठ असल्यामुळे, अनेक लोक योगासने करणे टाळतात. तुम्हाला वज्रासन करायची असेल, तर त्यासाठीची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगत आहोत. यासाठी सर्वप्रथम तुम्ही जमिजीवर काहीतरी अंथरून, त्यावर आपले गुडघे टेकवावे.

आपल्या दोन्ही पायांच्या अंगठयांना पाठीमागील बाजूस एकमेकांना जोडावेत, मात्र यावेळी तुमचे घोटे वेगळे असले पाहिजेत. आता तुमच्या घोट्यावर बसून, रिलॅक्स पोझिशन मध्ये यायचे आहे. हाताच्या तळवे गुडघ्यावर ठेवून, पाठ अतिशय सरळ करावी, व डोके देखील सरळ रेषेमध्ये असले पाहिजे. आता गुडघे एकत्र करून डोळे बंद करावे व प्राणायाम सुरू करावेत. अशा रीतीने पाच ते दहा मिनिटे बसून प्राणायाम केल्यास तुम्हाला अतिशय फायदा दिसून येतो.

वज्रासन करताना घ्यावयाची काळजी:

वज्रासन करताना गुडघ्यावर त्याचप्रमाणे घोट्यावर ताण पडत असतो. त्यामुळे या ठिकाणी काही दुखापत झाली असेल, किंवा शस्त्रक्रिया केली असेल तर अशा लोकांनी हे आसन करू नये असा सल्ला दिला जातो.

गर्भवती मातांच्या पोटावर या आसानामुळे तणाव येऊ शकतो, परिणामी अशा महिलांनी वज्रासन करणे हितावह ठरत नाही.

वज्रासनामध्ये जास्त वेळे करिता पाठ सरळ करून असावी लागते. त्यामुळे ज्या रुग्णांना मणक्याचा त्रास जाणवत असेल अशा लोकांनी या आसनाच्या वाटेला देखील जाऊ नये.

ज्या लोकांना कमी रक्तदाबाची समस्या असेल, अशा लोकांच्या मेंदूला वज्रासन केल्यामुळे रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्या लोकांनी देखील हे आसन करणे टाळायला हवे.

वज्रासन केल्याने होणारे शारीरिक फायदे:

वज्रासन हे मधुमेह व्यक्तींसाठी सर्वोत्तम व्यायाम समजले जाते, व वज्रासन केल्यामुळे श्वास घेण्याचा प्रक्रियेवर नियंत्रण मिळवले जाते. त्यामुळे रक्तातील साखर कमी होण्यास देखील मदत मिळते. आणि या गोष्टीला नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी यांनी देखील दुजोरा दिलेला असून, इन्सुलिन निर्मिती करण्याकरिता हे आसन फायदेशीर आहे असे सांगितलेले आहे.

आपले शरीर वज्रासन करताना मांडी, पाठ, गुडघा इत्यादी ठिकाणी तणाव अनुभवत असते. त्यामुळे या ठिकाणच्या स्नायूंना बळकटी येण्यासाठी देखील मदत मिळते. त्याचबरोबर पाठीचा कणा देखील सरळ होत असतो.

अनेक लोकांना हाता पायाला मुंग्या येण्याची समस्या जाणवत असते, मात्र वाचन केल्यामुळे या समस्येवर देखील मात केली जाऊ शकते,  त्याचबरोबर शरीराच्या अनेक भागांना त्याचबरोबर पायाच्या बोटांना होणाऱ्या वेदना या आसनामुळे कमी केल्या जातात. गुडघेदुखीवर देखील हा प्रकार फायदेशीर ठरविला जातो.

वज्रासन हे पचनसंस्थेच्या संदर्भात येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी देखील खूपच फायदेशीर असून, जेवल्यानंतर हे आसन केल्यास खूपच चांगले परिणाम दिसून येतात. व व्यक्तीला अन्न पचण्यासाठी मदत मिळत असते. पचनाशी संदर्भात असणारे बद्धकोष्ठता, वायुदोष, पोट जड पडणे, आणि मुळव्याध इत्यादी आजारांमध्ये किंवा समस्यांमध्ये देखील हे आसन खूपच फायदेशीर आहे, असे सिद्ध झालेले आहे. व वैद्यकीय शास्त्राने देखील त्याला पाठिंबा दर्शविलेला आहे.

हृदयाचे व मेंदूचे आरोग्य सुधारण्याकरिता व त्यांनी अधिक कार्यक्षमरीत्या कार्य करावे, याकरिता हे असं खूपच फायदेशीर समजले जाते. या आसनामध्ये श्वासावर नियंत्रण मिळवत असल्यामुळे रक्त अतिशय वेगाने शुद्ध होत असते. परिणामी मेंदूला चांगल्या व शुद्ध ऑक्सिजन युक्त रक्ताचा पुरवठा होतो. यामुळे मेंदू अधिक कार्यक्षमरित्या कार्य करू शकतो.

त्याचबरोबर हे शुद्ध झालेले रक्त शरीरातील इतर अवयवांपर्यंत देखील पोहोचवले जाते. त्यामुळे रक्त संचलन किंवा परिसंचरण करणारी यंत्रणादेखील अतिशय उत्कृष्टरिता कार्य करते, आणि शरीराच्या सर्वच भागांना शुद्ध रक्ताचा पुरवठा केला जातो.

निष्कर्ष:

धावपळीच्या युगामुळे प्रत्येकाला व्यायाम करण्याची इच्छा असून देखील तो शक्य होत नाही. त्यामुळे शरीर बेढब होत चालले आहे. त्याचबरोबरच अनेकांना विविध समस्यांनी तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळेच आजकाल योगासन हा प्रकार जोर धरू लागलेला आहे.

अगदी गल्ली गल्ली मध्ये देखील या योगासनाचे प्रकार शिकवणाऱ्या क्लासेसची निर्मिती झालेली आहे. कुठल्याही प्रकारचे योगासन करणे शरीरासाठी खूपच फायदेशीर असले, तरी देखील ते सोपे सुद्धा असतेच. त्यामुळे योगासन करण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे.

आजच्या भागामध्ये आपण अशाच एका योगासनाबद्दल अर्थात वज्रासनाबद्दल माहिती बघितली आहे. ज्यामध्ये वज्रासन म्हणजे काय, त्यामुळे होणारे विविध फायदे, वज्रासन करण्याची योग्य पद्धती, त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने योगासन केल्यामुळे होणारे तोटे, आणि या आसन प्रकारांना करताना घ्यायची काळजी, किंवा खबरदारी इत्यादी बाबतीत माहिती बघितली आहे.

FAQ

वज्रासन म्हणजे नेमके काय आहे?

वज्रासन हे दुसरे तिसरे काही नसून, एक योगासनाचा प्रकार आहे. ज्या अंतर्गत शरीराला लवचिक करण्यामध्ये मदत मिळत असते.

वज्रासन केल्यामुळे कोणकोणत्या बाबतीत फायदा होत असतो?

वज्रसनाने शरीराला वेगवेगळ्या स्वरूपात फायदा होत असतो, ज्यामध्ये मधुमेह कमी करणे, मेंदूचे हृदयाचे आरोग्य सुधारणे, स्नायूंची ताकद वाढविणे, शारीरिक वेदना कमी करणे, पचन सुधारणे, आणि रक्त संचलन चांगले करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

वज्रासन करण्याची योग्य वेळ कोणती आहे?

कोणताही व्यायाम करायचा असेल, तर जेवल्यानंतर करू नये असे सांगितले जाते. मात्र वज्रासन हे असे योगासन आहे जे जेवल्यानंतर लगेच तुम्ही करू शकता. मात्र तुम्हाला गुडघ्याला त्रास जाणवत असेल, तर हे योगासन करणे टाळायला पाहिजे.

वज्रासन करण्याकरिता साधारणपणे किती मिनिटांचा कालावधी लागत असतो?

वज्रासन हे योगासन फार वेळ न घेणारे आहे. ते कोणताही व्यक्ती अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पूर्ण करू शकतो. या आसनामुळे मधुमेही रुग्णांना फारच फायदा होत असतो.

वज्रासन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे?

वज्रासन करताना गुडघ्याचे आरोग्य चांगले असल्याची खात्री करून घेतली पाहिजे, त्याचबरोबर हाड दुखत असताना हे आसन करू नये. गर्भवती माता, मणक्याचे आजार असणारे लोक, आणि गुडघ्यावर शस्त्रक्रिया झालेले लोकांनी हे आसन करू नये.

Leave a Comment