तहसीलदार परीक्षाची संपूर्ण माहिती Tehsildar Exam Information In Marathi

Tehsildar Exam Information In Marathi तहसीलदार हा महसूल प्रशासनामध्ये असणारा एक अधिकारी असून, तो संपूर्ण तालुक्यावर आपला अंमल किंवा अंकुश ठेवून असतो. प्रत्येकाला या दर्जाचा अधिकारी होणे स्वप्न वाटत असते, मात्र यासाठी प्रचंड मेहनत घेऊन योग्य त्या परीक्षा पार कराव्या लागतात. अनेक लोकांचे तहसीलदार होण्याचे स्वप्न असले तरी देखील योग्य रीतीने या स्वप्नापर्यंत कसे पोहोचावे, त्याचबरोबर यासाठी काय तयारी करावी लागते, कोणकोणत्या परीक्षा द्याव्या लागतात, याबद्दल काही लोकांना माहिती नसते. याचसाठी आजच्या भागामध्ये आपण तहसीलदार च्या परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.

Tehsildar Exam Information In Marathi

तहसीलदार परीक्षाची संपूर्ण माहिती Tehsildar Exam Information In Marathi

भारतीय प्रशासकीय सेवा ही एक शासकीय स्तरावरील नोकरीची सेवा असून, या अंतर्गत अनेक व्यक्ती करिअर करण्यासाठी वाट बघत असतात. जमीन प्रशासन महसूल वसुली आणि कायदा व सुव्यवस्था त्याचबरोबर दंडाधिकारी पदी कार्य करणे या गोष्टींसाठी ओळखला जाणारा तहसीलदार संपूर्ण तालुक्याचा प्रमुख म्हणून देखील ओळखला जातो. या तहसीलदार च्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून उत्तम मार्कांनी उत्तीर्ण होणे फारच गरजेचे ठरते.

आजच्या भागामध्ये आपण या तहसीलदार पदाच्या परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला तहसीलदार परीक्षा देण्यासाठीच्या विविध पात्रता, त्याचे निकष, अभ्यासक्रम काय असतो, परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतली जाते, आणि काही अभ्यासासाठीच्या टिप्स देखील देणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.…

नावतहसीलदार परीक्षा
प्रकारस्पर्धा परीक्षा
उपयोगतहसीलदार पदी निवड होण्यासाठी
तहसीलदार तालुक्याचा प्रमुख
तहसीलदार कार्यमहसूल गोळा करणे
खातेमहसूल खाते

तहसीलदार हा राज्याच्या अधिपत्याखाली असणारा तालुका स्तरावरील मुख्य अधिकारी म्हणून कार्य बघत असतो. विविध गावांतील अधिकाऱ्यांचा प्रमुख तसेच मंडल क्षेत्रातील अधिकाऱ्यांचा प्रमुख म्हणून देखील त्याला ओळखले जाते. मुख्य कार्यामध्ये महसुली जबाबदारी असली, तरी देखील तो दंडाधिकारी म्हणून देखील काम करत असतो. तहसीलदाराच्या अधिपत्याखाली जमीन व्यवहार, कर, सामाजिक समस्या, नैसर्गिक आपत्ती, विविध दस्तऐवजासंदर्भातील काम, आणि स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्री विषयी अधिकार एकवटलेले असतात.

तहसीलदार परीक्षा साठी शैक्षणिक पात्रता:

तहसीलदार परीक्षा देण्यासाठी उमेदवार हा सर्वात प्रथम भारताच्या कोणत्याही राज्यामध्ये रहिवासी असून, त्याच्याकडे भारतीय नागरिकत्व असणे गरजेचे ठरते. त्याचबरोबर सदर उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असली पाहिजे. सोबतच वेळोवेळी सांगितल्या जाणाऱ्या पात्रतांमध्ये टायपिंग, एम एस सी आय टी यांसारख्या पात्रतांचा देखील समावेश केला जाऊ शकतो.

तहसीलदार परीक्षेसाठी वयोमर्यादा:

तहसीलदार पदावर विराजमान व्हायचे असेल तर उमेदवारांनी किमान वयाची २१ वर्षे पूर्ण केलेली असली पाहिजेत. त्याचबरोबर सदर उमेदवार हा ४२ वर्षे वयापेक्षा अधिक नसला पाहिजे. यात देखील विविध प्रवर्गानुसार वेगवेगळ्या वयोमर्यादा बघायला मिळत असतात.

तहसीलदार परीक्षा प्रक्रिया किंवा टप्पे:

तहसीलदार हे एक अधिकारी पद असल्यामुळे उमेदवारांना तावून-सुलाखून घेतले जाते. जेणेकरून योग्य उमेदवाराची या पदावर निवड होईल. यासाठी उमेदवारांना तीन टप्प्यांवर परीक्षा द्याव्या लागतात. यामध्ये सर्वात पहिल्या परीक्षेला पूर्व परीक्षा म्हणून ओळखले जाते. यालाच स्क्रीनिंग टेस्ट या नावाने देखील ओळखले जाते.

यासाठी सर्वात प्रथम अर्ज केल्यानंतर उमेदवाराला बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या १०० प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. या परीक्षेमध्ये पडलेल्या गुणांच्या आधारावर कट ऑफ मार्क घोषित केले जातात, आणि या मार्कंच्या पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी नियुक्त केले जाते.

पूर्व परीक्षेपेक्षा काहीशी कठीण स्वरूपाची असणारी ही परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची घेतली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक कष्ट घेणे गरजेचे ठरते. त्याचबरोबर योग्य अभ्यास आणि योग्य सराव देखील फारच गरजेचा असतो. या परीक्षेसाठी साधारणपणे एकास दहा किंवा एकास पंधरा या प्रमाणामध्ये उमेदवारांची निवड केली जाते. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरत असतो.

तहसीलदार परीक्षेचा शेवटचा आणि तिसरा टप्पा म्हणून मुलाखतीला ओळखले जाते. पहिल्या दोनही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावले जाते. हा विद्यार्थ्यांकरिता सर्वात शेवटचा टप्पा असतो. येथे उच्च अधिकाऱ्यांकडून सदर उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. त्यामध्ये उमेदवारांची निर्णयक्षमता आणि त्या क्षेत्रात असलेले ज्ञान तपासले जाते. या ठिकाणी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना तहसीलदार पदाचे प्रशिक्षण देऊन नियुक्ती दिली जाते.

तहसीलदार झालेल्या उमेदवाराला साधारणपणे साडेनऊ ते साडे चौतीस हजार रुपयांचे वेतन मिळत असते. याबरोबरच विविध भत्ते देखील दिले जात असतात. सोबतच शासनाकडून वाहन, घर, आणि इतर खर्चांकरिता देखील पैसे पुरवले जात असतात. त्याचबरोबर या अधिकाऱ्याला अनेक स्वरूपाचे कार्य दिले जातात, आणि अनेक अधिकार देखील बहाल केले जातात. त्यामुळे प्रत्येक जणाला तहसीलदार होण्याचे स्वप्न असते.

निष्कर्ष:

कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये अधिकारी व्हावे हे प्रत्येकाला आवडत असते. कारण दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपण कोणालातरी हाताखाली कामाला ठेवावे, त्याचप्रमाणे आपणही ऑर्डर द्याव्यात हे प्रत्येक मनुष्याला वाटत असते. मात्र या अधिकारी पदी जाण्यासाठी प्रचंड मेहनत देखील गरजेची असते. यामध्ये अनेक परीक्षार्थी विद्यार्थी दरवर्षी फॉर्म भरून विविध परीक्षा देत असतात.

यातील काही विद्यार्थी उत्तीर्ण होत असले, तरीदेखील बरीचशी विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असतात. कारण एका जागेसाठी कितीतरी पटीने अधिक फॉर्म जमा होत असतात, त्यामुळे या स्पर्धा परीक्षांना काही लोकांकडून मायाजाल म्हणून देखील संबोधले जाते. या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रचंड अभ्यासाचे देखील गरज असते. स्पर्धा परीक्षा करून व्यक्ती तहसीलदार पदापर्यंत पोहोचू शकतो. यासाठी त्याला तहसीलदार परीक्षा द्यावी लागते.

आजच्या भागामध्ये आपण याच तहसीलदार परीक्षा विषयी संपूर्ण माहिती घेतलेली असून, तहसीलदार कसे व्हावे, त्यासाठी कोणाकोणाच्या शैक्षणिक पात्रता असण्याबरोबर शारीरिक पात्रता काय असाव्या लागतात, यासाठी वयोमर्यादा काय आहे, वेगवेगळे चाचणी निकष व निवड प्रक्रिया कशी असते, या परीक्षेच्या विविध टप्प्यांविषयी माहिती, त्याचबरोबर तहसीलदार झाल्यानंतर मिळणारा पगार व करावयाची कामे, याबाबत देखील माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर तयारी करण्यासाठी काही टिप्स देखील दिलेल्या आहेत.

FAQ

तहसीलदार हा कोणत्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती आहे?

तहसीलदार हा महसूल क्षेत्रातील किंवा महसूल खात्यातील एक अधिकारी व्यक्ती आहे. ज्याच्या अधिपत्याखाली संपूर्ण तालुक्यातील महसूल व्यवस्था सोपविलेली असते.

महसुली कार्याव्यतिरिक्त तहसीलदार याला कोणाकोणाच्या स्वरूपाची कार्य करावी लागतात?

महसुली कार्याव्यतिरिक्त तहसीलदार हा दंडाधिकारी म्हणून देखील कार्य करत असतो. या दरम्यान त्याला दंडाधिकार्‍याची सर्व कार्य पार पाडावी लागतात.

तहसीलदार पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे कोणकोणते टप्पे असतात?

तहसीलदार पदासाठी पात्र ठरण्याकरिता उमेदवाराने पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, आणि मुलाखत या तीन टप्प्यांमधून जावे लागते. यातील पूर्व परीक्षा ही बहुपर्यायी चाचणीवर आधारित तर मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक स्वरूपाच्या पेपर वर आधारित असते.

तहसीलदार परीक्षेसाठी कोणकोणत्या मुख्य विषयांचा अभ्यास करणे गरजेचे ठरते?

तहसीलदार पदी विराजमान होण्याकरिता उमेदवाराने स्पर्धा परीक्षेच्या कालावधीमध्ये भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, पर्यावरण, गणित, मराठी, आणि इंग्रजी यांसारख्या विषयांचा अभ्यास करण्याबरोबरच महसुली क्षेत्रातील काही मूलभूत कायदे आणि योजना यांचा देखील अभ्यास करणे गरजेचे ठरते. सोबतच विद्यार्थ्याकडे निबंध लेखनाची कला देखील अवगत असली पाहिजे.

तहसीलदार पदाच्या परीक्षेसाठी कोणकोणत्या पात्रता सांगितल्या जातात?

तहसीलदार पदावर विराजमान होण्याकरिता सदर उमेदवार भारतीय नागरिक असला पाहिजे. त्याचबरोबर त्याने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेले पाहिजे. सोबतच वेळोवेळी नमूद केलेल्या काही पात्रता निकष देखील पार करणे गरजेचे ठरते.

Leave a Comment