सुनीता विल्यम्स यांची संपूर्ण माहिती Sunita Williams Information In Marathi

Sunita Williams Information In Marathi मानवी स्वभावानुसार कोणी चांगली गोष्ट केली की आपण त्या व्यक्तीशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत असतो. असेच सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या एका महिलेने अमेरिकेच्या नासा या संस्थेच्या अंतर्गत अंतराळात प्रवास करण्याचा विक्रम केला, त्यामुळे संपूर्ण भारताला या सुनीता विल्यम्स चा फार मोठा अभिमान वाटला होता.

Sunita Williams Information In Marathi

सुनीता विल्यम्स यांची संपूर्ण माहिती Sunita Williams Information In Marathi

नासाने १९९८ या वर्षी आखलेल्या जून महिन्यातील एका योजनेकरिता सुनिता विल्यम्स ची निवड केली होती. भारतीय वंशाच्या महिलांमधील दुसरी व्यक्ती ठरण्याचा बहुमान या माध्यमातून त्यांना मिळाला होता. त्याचबरोबर सर्वात जास्त वेळ अंतराळामध्ये थांबण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावे असून, त्यांनी सुमारे १९५ दिवस अंतराळामध्ये व्यतीत केलेले आहेत.

सोबतच त्यांचा दुसरा एक विक्रम म्हणून, त्यांनी सात वेळा स्पेस वॉक करण्याचा देखील जागतिक विक्रम स्वतःच्या नावे नोंदवलेला असून, अशा करणाऱ्या त्या पहिल्याच महिला प्रवासी आहेत. त्याच्या या कार्यासाठी भारत सरकारने देखील त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने २००८ या वर्षी सन्मानित केलेले असून, संपूर्ण भारतीयांना त्यांच्या या कार्याचा प्रचंड अभिमान आहे. आजच्या भागामध्ये आपण या सुनीता विल्यम्स यांच्या जीवन चरित्राबद्दल माहिती जाणून घेणार आहोत…

नावसुनीता विल्यम्स
संपूर्ण नावसुनीता माइकल जे विल्यम्स
जन्म दिनांक१५ सप्टेंबर १९६५
जन्मस्थळ युक्लिड, ओहायो, अमेरिका
वडिलांचे नावडॉ. दीपक एन पंड्या
आईबानी पंड्या
पतीचे नावमायकल जे विल्यम्स
ओळखअंतराळ शास्त्रज्ञ

आज देखील आपल्या समाजामध्ये मुलींपेक्षा मुलाला सरस समजले जाते. अश्यातच या समाजाला आपल्या कर्तृत्वातून मुलींच्या क्षमतेची जाणीव करून देणारी सुनीता विल्यम्स अशीच एक महिला म्हणून प्रसिद्ध असून, त्यांनी अंतराळ क्षेत्रांमध्ये देखील आपल्या करिअरचा विस्तार करत, दुनिया समोर एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे.

अनेक लोक अंधश्रद्धाळू असतात, त्यामुळे त्यांना या विज्ञान क्षेत्रातील गोष्टींमध्ये रस वाटत नाही. मात्र एक भारतीय वंशाची महिला असून देखील त्यांनी नासासारख्या सुप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित संस्थांमध्ये कार्य करून, आपल्या आधुनिकतेचा परिचय दिलेला आहे.

सुनिता विल्यम च्या आयुष्याला कलाटणी:

सुनीता विल्यम्स यांनी आपले करिअर एक नेव्ही ऑफिसर म्हणून सुरू केले होते. १९८७ यावर्षी अमेरिकेच्या नेव्ही दलामध्ये सामील झालेल्या या सुनीता विल्यम्स यांना त्यांच्या कार्यामुळे अवघ्या सहा महिन्यांमध्ये प्रमोशन मिळून डायव्हिंग ऑफिसर पदी नियुक्त करण्यात आले होते. 

पुढे एअर ट्रेनिंग कमांडर व नंतर नेवलटर अशा अनेक भूमिका बजावत, त्या आपल्या क्षेत्रामध्ये पुढे जात होत्या. त्यांनी १९९३ या वर्षीचा मिस युनिव्हर्स हा किताब देखील पटकावलेला आहे. त्यांनी एका नेव्हल पायलट स्कूलमध्ये प्रवेश घेत, हेलिकॉप्टर उडवण्याचा सराव केला. परिणामी १९९८ या वर्षी त्यांना नासा या संस्थेमध्ये भरती होण्याची संधी मिळाली, आणि हीच त्यांच्या आयुष्याला मिळालेली सर्वात मोठी कलाटणी होती. 

सुनीता विल्यम्स यांची पहिली अंतराळ मोहीम :

महिलांमधून अंतराळामध्ये प्रवेश करणाऱ्या दुसऱ्या महिला होण्याचा मान सुनीता विल्यम्स यांना मिळाला होता. याकरिता नासा या संस्थेने त्यांची निवड केली होती. त्यांनी पृथ्वीवर अनेक भूमिका बजावल्या असल्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड अनुभव व ज्ञान होते.

मात्र अंतराळामध्ये जाऊन या ज्ञानाचा वापर करण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर खऱ्या अर्थाने येऊन ठेवली होती. त्यांनी आपल्या पहिल्या मोहिमेमध्ये जवळपास २२१ ते २२२ दिवस अंतराळामध्ये घालून, एक विश्वविक्रम केलेला आहे.

सुनीता विल्यम्स ला मिळालेले विविध पुरस्कार :

  • भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स यांना भारताकडून आणि अमेरिकेकडून सुद्धा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
  •  त्यांना भारत सरकारने २००८ या वर्षीचा पुरस्कार दिला होता, जो विज्ञान व अभियांत्रिकी या क्षेत्राकरिता देण्यात आलेला होता.
  • त्यांनी गुजरात विद्यापीठाचा मानद डॉक्टररेट हा पुरस्कार देखील २०१३ यावर्षी पटकावला होता.
  • त्यांना स्लोव्हेनिया या देशाने देखील गोल्डन ऑर्डर फोर मेरिट्स हा पुरस्कार २०१३ यावर्षी देऊन सन्मानित केलेले आहे.

सुनीता विल्यम्स बद्दल तथ्य माहिती :

  • सुनीता विल्यम्स या परदेशी जन्मलेल्या असल्या, तरी देखील त्यांचा वंश भारतीय आहे.
  • सुनिता विल्यम्स यांनी यु एस नेवल अकॅडमी येथून आपला डिप्लोमा १९८७ या वर्षी मिळवलेला होता.
  • अंतराळ क्षेत्रामध्ये येण्या अगोदरच या नेव्ही या क्षेत्रामध्ये देखील कार्य करत होत्या.
  • भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला अंतराळवीर ठरलेल्या सुनीता विल्यम्स कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळामध्ये गेल्या होत्या.
  • सुनीता विल्यम्स यांनी अनेक स्पेस स्टेशनवर फ्लाईट इंजिनिअर या पदी कार्य केलेले असून, त्यांनी २००६ व २००७ या वर्षी १४ किंवा १५ मोहिमांचे यशस्वी नेतृत्व केले आहे.
  • सुनीता विल्यम्स अंतराळामध्ये गेल्यानंतर त्यांनी भारताचे वर्णन अतिशय छान पद्धतीने केले होते, त्यांना भारताचा हिमालय अवकाशातून फारच सुंदर भासला होता.
  • अशा या भारतीय वंशाच्या अंतराळवीराला अर्थात सुनीता विल्यम्स ला मानसन्मान देत त्यांच्याविषयी भारताला प्रचंड आदर आहे, व तो इथूनही पुढे नक्कीच कायम राहील.

निष्कर्ष :

भारतीय लोकांचे डोके अतिशय सुपीक आणि बुद्धिवंत आहे, हे संपूर्ण जगाने मान्य केलेले आहे. भारतीयांनी जगभरात अनेक क्षेत्रांमध्ये योगदान दिलेले असून, जगासाठी अशक्य असणाऱ्या गोष्टी देखील भारतीय व्यक्तींनी सहजरित्या हस्तगत केलेल्या आहेत.

मात्र त्यांना काही कारणास्तव परदेशी स्थायिक व्हावे लागले. असे देखील अनेक नागरिक असे आहेत, जे परदेशात राहत असले तरी देखील परदेशात जाऊनही त्यांनी भारतीय जमिनीशी नाळ तोडलेली नाही. त्यामुळे आज देखील या व्यक्तींचा भारताला प्रचंड मोठ्या प्रमाणावर अभिमान वाटत असतो. त्यांच्या कर्तुत्वाने त्यांनी जगाच्या पाठीवर भारताचे नाव मोठे करत, भारताचा तिरंगा सर्वत्र फडकवलेला आहे.

असेच एक व्यक्तीमत्व म्हणजे सुनीता विल्यम होय. आजच्या भागामध्ये आपण त्यांच्याविषयी माहिती बघितली आहे, व त्यांचे जीवन चरित्र जाणून घेतलेले आहे. सोबतच त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते, त्यांच्या विविध कार्यक्षमता, त्यांचे शिक्षण, त्यांच्या आयुष्यात आलेला टर्निंग पॉईंट, त्यांच्या पहिल्या अंतराळ यात्रेविषयीचा अनुभव, व त्यासाठी त्यांनी घेतलेले प्रशिक्षण, नासामध्ये तज्ञ होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, अंतराळात घेतल्या गेलेल्या मॅरेथॉन मधील त्यांचा सहभाग, त्यांनी केलेल्या मोहिमा, आणि त्यांना मिळालेले काही पुरस्कार, यासोबतच काही मनोरंजक तथ्य देखील जाणून घेतलेली आहेत.

FAQ

सुनीता विल्यम्स यांचे संपूर्ण नाव काय होते?

सुनिता विल्यम्स यांचे संपूर्ण नाव सुनिता माईकल जे विल्यम्स असे होते.

सुनीता विल्यम्स यांचा जन्म कोणत्या ठिकाणी, व कोणत्या दिवशी झाला होता?

सुनीता विल्यम्स यांचा जन्म अमेरिकेच्या युक्लीड ओहायो या ठिकाणी दिनांक १९ सप्टेंबर १९६५ या दिवशी झाला होता.

सुनिता विल्यम्स यांच्या आईचे व वडिलांचे नाव काय होते?

सुनीता विल्यम्स यांच्या आईचे नाव बोनी जे पंड्या, तर वडिलांचे नाव डॉक्टर दीपक पंड्या असे होते.

सुनीता विल्यम्स यांना कशासाठी ओळखले जाते?

सुनीता विल्यम्स या एक भारतीय वंशाच्या अंतराळ शास्त्रज्ञ असून, त्यांना सर्वात जास्त अंतराळामध्ये राहण्याच्या विक्रमासाठी ओळखले जाते ल. त्याचबरोबर सर्वाधिक वेळा स्पेस वॉक करण्यासाठी देखील त्या सर्व प्रसिद्ध आहेत.

सुनीता विल्यम्स यांनी कोठे कोठे आपले शिक्षण घेतले आहे?

सुनीता विल्यम्स यांनी मसच्युसेट्स येथे १९८३ या वर्षी आपले हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करून, संयुक्त राष्ट्र अकादमी या ठिकाणी १९८७ या वर्षी प्रवेश मिळवला होता. पुढे १९९५ यावर्षी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी अभियांत्रिकी व्यवस्थापनातील एम एस ही पदवी देखील त्यांनी मिळवलेली होती.

Leave a Comment