उसा विषयी संपूर्ण माहिती Sugarcane Information In Marathi

Sugarcane Information In Marathi ऊस बघितला नाही असा क्वचितच कोणी असेल. गोड असणारा हा पदार्थ भारतातील सर्वात जास्त गोड पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या साखरेचा जन्मदाता आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. स्वयंपाक घरामध्ये कुठलाही पदार्थ बनवायचा असेल तर त्याला गोडी आणायची म्हटलं की साखर लागतेच. आणि साखर तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उसाचा वापर केला जातो. अगदी गुळ तयार करणे, रसवंतीगृहावर रस तयार करणे, इत्यादी गोष्टी मार्फत प्रत्येकाला या उसाची ओळख झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये गुळ खाल्ला किंवा उसाचा रस पिला तर शरीराला थंडावा प्राप्त होत असतो, असे सांगितले जाते.

Sugarcane Information In Marathi

उसा विषयी संपूर्ण माहिती Sugarcane Information In Marathi

चवीला अतिशय मधुर व किंचितसा खारट असणारा हा उसाचा रस चवदार असण्याबरोबरच विविध शारीरिक समस्यांवर उपयुक्त देखील असतो. हा ऊस सहजरित्या कोणालाही उपलब्ध होऊ शकतो. चावून खाल्ल्यानंतर कावीळ सारखे आजार देखील बरे होण्यास मदत मिळते, असे सांगितले जाते. आजच्या भागामध्ये आपण या सर्वांच्या आवडीच्या गोड ऊसाबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया ऊसाच्या या माहितीला…

नावऊस
हिंदी नावगन्ना
इंग्रजी नावशुगरकेन
शास्त्रीय नावसॅकॅरम ऑफिसिनेल
उगमन्यू गिनिया
वापरसाखर, गुळ, आणि रस उत्पादन
साधारण कालावधी१२ महिने
प्रकारसुरू, आडसाली, आणि पूर्व हंगामी
स्वरूपउंच वाढणारी वनस्पती
चवमधुर
उपलब्ध घटकग्लुकोज, पाणी, कर्बोदके, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, अँटिऑक्सिडेंट, जीवनसत्व अ व ब आणि फायबर

शरीराला थंडावा देणारी वनस्पती म्हणून ऊसाला ओळखले जाते. उन्हाळ्यामध्ये मुख्यतः उसाचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जात असते. आरोग्यदायी असणारा हा ऊस विविध सण उत्सवांच्या वेळेस देखील वापरला जातो. संक्रांती सारख्या सणाला महिलांद्वारे हा ऊस मोठ्या प्रमाणावर वापरला जात असून, संपूर्ण महाराष्ट्रासह भारतभर देखील याचा वापर केले जातो.

ऊस हे असे पीक आहे जे वर्षाच्या कोणत्याही हंगामामध्ये लावले जाऊ शकते, त्याचबरोबर कोणत्याही हंगामामध्ये काढले जाऊ शकते. मात्र यासाठी तीन हंगाम अतिशय उत्कृष्ट समजले जातात. ज्यांना सुरू हंगाम, आडसाली हंगाम, आणि पूर्व हंगामी हंगाम असे म्हटले जाते. साधारणपणे १२ ते १५ फूट उंच वाढणारा हा ऊस काही ठिकाणी अगदी ३० फूट उंच देखील वाढत असतो.

ऊस वापराच्या पद्धती:

ऊस अशी वनस्पती आहे जी कोणत्याही स्वरूपामध्ये खाल्ली जाऊ शकते. सर्वात जास्त प्रमाणात याच्या पासून साखर बनवली जाते, व तिचे सेवन केले जाते. त्याचबरोबर उसाच्या वरील आवरण सोलून दातांच्या साह्याने देखील ऊस खाल्ला जाऊ शकतो. यामध्ये ऊस खाण्याचा चांगला आनंद खाणाऱ्याला मिळत असतो.

त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला अनेक लोक उसाचा रस बनवून देत असतात. हा उसाचा रस सेवन केल्यामुळे शरीराला देखील अनेक फायदे होत असतात. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी थंडावा मिळत असतो. मात्र उसाचा रस नेहमी ताजा काढलेलाच पिला पाहिजे, अन्यथा शरीराला फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसानदायी ठरत असतो. अनेक ठिकाणी उसाच्या रसाला चांगला स्वाद यावा म्हणून त्यामध्ये लिंबाचा रस, सेंधव मीठ, आले इत्यादी गोष्टींचे मिश्रण केले जाते.

उसाचे आरोग्यदायी फायदे:

कडाक्याच्या उन्हामध्ये शरीराला थंडावा देण्याचे कार्य उसाचा रस करत असतो.

कुठल्याही प्रकारच्या गोड पदार्थांच्या निर्मिती करिता साखर देखील याच उसापासून तयार केली जात असते.

उसामध्ये अनेक पोषक द्रव्य असतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास फार मोलाची ची मदत मिळत असते. या घटकांमध्ये पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, लोह, प्रथिने, फायबर यासह अनेक घटकांचा समावेश असतो.

कावीळ या आजारावर ऊस चावून खाणे किंवा त्याचा रस पिणे खूपच फायदेशीर सांगितलेले असून, ऊस चावून खाल्ल्यास कावीळ झटपट बरी होण्यास मदत मिळते. मात्र चावून खाणे शक्य नसेल तर तुम्ही उसाचा रसाचे सेवन देखील करू शकता.

अन्न पचण्याची किंवा पोटामध्ये गॅस होण्याची समस्या असेल त्याचबरोबर ऍसिडिटीचा त्रास जाणवत असेल, अशा सर्व प्रकारच्या समस्येवर उसाचा रस रामबाण उपाय समजला जातो.

ज्या लोकांना शरीर संपदा कमवायची आहे, किंवा वजन वाढवायचे आहे अशा लोकांसाठी देखील दररोज एक ग्लास उसाचा रस सेवन करणे सांगितले जाते.

सौंदर्याप्रती जागरूक असणाऱ्या लोकांसाठी देखील हा उसाचा रस खूपच फायदेशीर असून, त्यामुळे त्वचेचा रंग सुधारण्यासह त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी देखील मदत मिळत असते.

उसाचा रस हा गोड असला तरी देखील मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखर वाढवण्यामागे हा उसाचा रस कारणीभूत नसतो. उसाच्या रसापासून साखर बनवली तर ती शरीरासाठी घातक ठरू शकते. मात्र उसाचा रस हा शरीरासाठी उत्तम समजला जातो.

ज्या लोकांना नियमित मुतखड्याचा त्रास होत असतो, किंवा वारंवार मुतखडा उद्भवत असतो अशा लोकांनी कायम उसाचा रस सेवन करावा असे डॉक्टर सांगतात. ज्यामुळे हे मुतखडे फुटण्यास मदत मिळते.

निष्कर्ष:

दिवाळी झाली की आपल्याला रस्त्यावरून उसाने भरून चाललेल्या मोठमोठ्या ट्रक, ट्रॉली, किंवा बैलगाड्या दिसत असतील. हा इतका ऊस नेमका जातो कुठे असा लहानपणी तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. मोठे झाल्यानंतर याचे उत्तर तुम्हाला मिळाले असले तरी देखील साखरेच्या कारखान्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये कुतूहल असतेच.

ऊस हा अतिशय मधुर आणि कठीण स्वरूपाचा असून त्याच्या गोड  रसासाठी तो ओळखला जातो. अगदी चावून देखील खाता येणारा ऊस रस करून, गुळाच्या किंवा साखरेच्या स्वरूपात देखील वापरला जाऊ शकतो. आज भारतामध्ये स्वयंपाक घरात साखर मोठ्या प्रमाणावर वापरली जाते, आणि या साखरेचे निर्माण उसापासून होत असते.

आजच्या भागामध्ये आपण उसाबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे, ज्यामध्ये ऊस म्हणजे काय, उस कसा असतो, ऊस खाण्याचा विविध पद्धती, उसामध्ये आढळणारे विविध पोषक तत्व, उसाच्या विविध भागांचे उपयोग, उसाबद्दल मनोरंजक तत्व, इत्यादी माहिती बघितली आहे.

FAQ

ऊसाला कोणकोणत्या वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते?

मराठीमध्ये ऊस म्हणत असले तरी देखील हिंदीमध्ये गन्ना, इंग्रजीमध्ये शुगर केन, तर शास्त्रीय भाषेमध्ये सॅकॅरम ऑफिसिनेल या नावाने उसाला ओळखले जाते.

ऊस लागवडीकरिता बेणे निवड करत असताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष देणे फार गरजेचे ठरते?

लागवड करीत असताना बेणे निवड ही ८ ते ११ महिन्यांच्या प्लॉटमधून करावी. त्याचबरोबर बेणे अतिशय रसरशीत व पक्व स्वरूपाचे असावे, व त्याचे डोळे देखील योग्यरीत्या फुगलेले असावेत. बेण्याला कुठल्याही रोगाचा अथवा किडींचा प्रादुर्भाव असू नये. रोपे वापरणार असाल तर त्याची वाढ व रोगमुक्ती याबद्दल खात्री करून घ्यावी.

कोणत्या स्वरूपाच्या हवामानामध्ये व जमिनीमध्ये उसाचे पीक चांगले येते?

उसाची योग्य वाढ व्हावी याकरिता २० ते २६ डिग्री सेंटीग्रेड तापमान असलेल्या भागांमध्ये अर्थात उष्ण व समशीतोष्ण भागामध्ये, चांगली व पाणी धरून ठेवण्याची क्षमता उत्तम असलेली जमीज असावी.

ऊस लागवडीचे कोणकोणते हंगाम पडत असतात?

ऊस लागवडीचे तीन हंगाम पडतात. यातील सुरू हंगामालाच हंगामी लागवड असे म्हटले जाते, जी जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान केली जाते. पूर्व हंगामी लागवड ही ऑक्टोबर नोव्हेंबर, तर आडसाली लागवड ही जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यांच्या दरम्यान केली जाते.

उसाची लागवड करण्याकरिता कोणत्या पद्धती वापरल्या जातात?

उसाची लागवड करण्याकरिता पाणी आधी देणार की नंतर देणार या आधारावर दोन प्रकार पाडले जातात. त्याला ओली पद्धत व कोरडी पद्धत असे म्हणून ओळखले जाते.

Leave a Comment