स्ट्रॉबेरी फळाची संपूर्ण माहिती Strawberry Fruit Information In Marathi

Strawberry Fruit Information In Marathi अतिशय आकर्षक आणि तेवढेच आरोग्यदायी असणारे फळ म्हणजे स्ट्रॉबेरी होय. त्याच्या उत्कृष्ट श्वासासाठी ओळखले जाणारे हे फळ अनेक ठिकाणी फ्लेवरिंग एजंट म्हणून देखील कार्य करत असते. महाराष्ट्राच्या महाबळेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण केले जाणारे हे फळ मूळ फ्रॅगेरीया वंशाचे समजले जाते. जे संकरित स्वरूपातील आहे, जेणेकरून त्याला संपूर्ण वर्षभर वापरले जाऊ शकते. विविध प्रकारच्या डाय बनवण्याकरिता तसेच साठवणुकीतील पदार्थ बनवण्याकरिता देखील या स्ट्रॉबेरी चा वापर केला जात असतो.

Strawberry Fruit Information In Marathi

स्ट्रॉबेरी फळाची संपूर्ण माहिती Strawberry Fruit Information In Marathi

अतिशय मधुर चव आणि रसाळ रचना असल्यामुळे हे फळ अतिशय प्रसिद्ध झालेले असून, या फळापासून विविध प्रकारच्या आईस्क्रीम, चॉकलेट, मिल्कशेक, ज्यूस यांसारखे पदार्थ देखील बनवले जातात. त्याचबरोबर साठवून ठेवले जाईल असे सरबत बनवून देखील याचा वापर केला जातो.

विविध प्रकारच्या मिठाई मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर या फळाचा वापर केला जात असून, या फळाचा कृत्रिम स्वाद तयार करून देखील अनेक उत्पादनांमध्ये वापरला जात असतो. आजच्या भागामध्ये आपण या स्ट्रॉबेरी फळाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नाव स्ट्रॉबेरी
इंग्रजी नावStrawberry
शास्त्रीय नावFragaria ananassa
किंगडमप्लांटी
ऑर्डररोसालेस
कुटुंब किंवा कुळरोजेसी
वंशफ्रेजेरिया
प्रजातीअननसा

स्ट्रॉबेरी वनस्पती चे प्रकार:

स्ट्रॉबेरी वनस्पतीचे व फळाचे जगभरात अनेक प्रकारे आढळून येत असतात. मात्र भारतामध्ये प्रामुख्याने फळे देण्याच्या कालावधीनुसार याचे मुख्य तीन प्रकार करण्यात आलेले असून, त्यामध्ये जून बियरिंग स्ट्रॉबेरी, एव्हर बियरिंग स्ट्रॉबेरी, आणि डे न्यूट्रल स्ट्रॉबेरी इत्यादी प्रकारांचा समावेश होत असतो.

यातील जून बियरिंग स्ट्रॉबेरी सामान्य स्तरावर मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असते. मुख्यतः जून महिन्यामध्ये या वनस्पतीची फळे पिकतात. अतिशय उत्कृष्ट प्रकारची फळे देण्यासाठी हा प्रकार ओळखला जात असतो. तसेच एव्हर बियरिंग प्रकारची स्ट्रॉबेरी वर्षातून दोन वेळेस फळे देण्यासाठी ओळखली जाते.

यामध्ये उन्हाळा व वसंत ऋतूंचा समावेश होतो, मात्र चवीच्या बाबतीत ही प्रजाती काहीशी कमी पडते. डे न्यूट्रल स्ट्रॉबेरी चा प्रकार संपूर्ण उन्हाळा फळे देत असतो. त्याचबरोबर अतिशय उत्कृष्ट चवीच्या स्ट्रॉबेरी फळासाठी ही प्रजाती ओळखली जात असते.

स्ट्रॉबेरी फळाचे फायदे:

स्ट्रॉबेरी केवळ चवदार व आकर्षक सुवास असणारीच नाही, तर अतिशय आरोग्यदायी देखील आहे. वजन कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी ला खूप पसंती दिली जाते, कारण या स्ट्रॉबेरी फळांमध्ये अतिशय कमी कॅलरी असल्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते.

मात्र शरीराला कॅलरी पुरवठा केला जात नाही. त्यासोबतच आजकाल अतिशय घातक ठरू बघणाऱ्या कर्करोगावर स्ट्रॉबेरीने उपचार केला जाऊ शकतो. स्ट्रॉबेरी मध्ये कर्करोगाशी लढणारे गुणधर्म आहेत, असे एका अभ्यासांती सिद्ध झालेले आहे. तसेच शरीरामध्ये अनियंत्रित स्वरूपात वाढणाऱ्या पेशी देखील स्ट्रॉबेरी रोखत असते.

हृदयाच्या आरोग्याला उत्तम ठेवण्याबरोबरच दातांचे आरोग्य व हाडांचे आरोग्य देखील अबाधित राखणे याकरिता स्ट्रॉबेरी चे फळ ओळखले जाते. डोळे सुजले असतील तरी देखील स्ट्रॉबेरी खाल्ल्यामुळे डोळ्यांचे कार्य चांगले होत असते, मात्र याबद्दल अजून संशोधन होणे गरजेचे आहे.

त्यासोबतच रक्तदाब नियंत्रण, मेंदूचे आरोग्य सुधारणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, पुरुषांच्या वैवाहिक जीवनात फायदा मिळवून देणे, गरोदर महिलांच्या आरोग्याला उपयुक्त ठरणे, बद्धकोष्ठता दूर करणे, इत्यादी अनेक फायदे या स्ट्रॉबेरी फळाचे समजले जातात.

स्ट्रॉबेरीची निवड आणि साठवणूक:

बाजारातून स्ट्रॉबेरी फळ खरेदी करताना ते नेहमी रसाळ व ताजे असले पाहिजे, याकरिता तुम्ही ते दाबूनही पाहू शकता. त्याचबरोबर ज्या स्ट्रॉबेरी फळाला डाग पडला असेल, असे फळ निवडणे देखील टाळले पाहिजे. घरी आणल्यानंतर न धुता ही फळे तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता, मात्र धुतल्यानंतर ही फळे लवकर खराब होत असतात. फ्रीजमध्ये ठेवताना याला तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा भांड्यामध्ये देखील ठेवू शकता. मात्र त्यामध्ये हवा खेळती राहील याची देखील खबरदारी घेणे गरजेचे ठरते.

स्ट्रॉबेरी चे तोटे:

स्ट्रॉबेरी मध्ये फायबर असल्यामुळे अतिसेवन केल्यास अतिसार देखील जाणवतो. त्याचबरोबर काहीसे आंबटसर असणारे ही फळे खोकल्याचा आजार देखील निर्माण करू शकतात. यातील क जीवनसत्व पोटदुखी देखील निर्माण करत असते. सोबतच शरीरातील लोहाचा निचरा करण्यासाठी देखील हे फळ कारणीभूत ठरत असते. त्यामुळे ॲनिमिया असणाऱ्या रुग्णांना हे फळ देऊ नये असे सांगितले जाते. या फळामुळे शरीरातील पोटॅशियम देखील वाढते, ज्यामुळे हृदय कमकुवत होऊ शकते.

निष्कर्ष:

अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला स्ट्रॉबेरी हे फळ आवडत असते. स्ट्रॉबेरी फळ अतिशय रसाळ असल्याबरोबरच, अतिशय उत्तम स्वादाचे असते. त्यामुळे प्रत्येक जण या फळाला पसंत करत असतात. अगदी छोटेसे असणारे हे फळ महाराष्ट्रामध्ये मुख्यतः महाबळेश्वर या ठिकाणी उगवले जातात. या फळाच्या निर्मितीकरिता मुख्यतः थंड हवामान अतिशय उपयुक्त समजले जात असते.

या फळाला अतिशय जपावे लागत असल्यामुळे शक्यतो अगदी थोड्या प्रमाणावर या फळाची शेती प्रत्यक्ष शेतकऱ्या द्वारे केली जात असते. त्याचबरोबर या फळाच्या निर्मिती करिता मोठ्या प्रमाणावर भांडवल देखील गुंतवावे लागते. एक एकर स्ट्रॉबेरीची शेती करण्याकरिता जवळपास चार लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असतो.

त्यातही योग्य दर मिळाला नाही, तर अगदी तुटपुंजा उत्पन्नावर समाधान मानावे लागते. त्यामुळे महाबळेश्वर येथील शेतकरी नेहमी कमीत कमी प्रमाणात या वनस्पतीची लागवड करत असतात. आजच्या भागामध्ये आपण या स्ट्रॉबेरी फळाबद्दल संपूर्ण माहिती बघितली असून, स्ट्रॉबेरी मुळे होणारे फायदे स्ट्रॉबेरी चा वापर कसा व कोठे करावा, अति प्रमाणात स्ट्रॉबेरी खाल्ल्याचे तोटे, स्ट्रॉबेरी चे विविध प्रकार आणि प्रजाती, तसेच आरोग्यदायी उपयुक्तता, स्ट्रॉबेरी फळ वापरण्याच्या पद्धती, स्ट्रॉबेरी फळांमध्ये असणारे विविध घटक, त्याचबरोबर स्ट्रॉबेरी साठवून ठेवण्याच्या विविध पद्धती, व जास्तीत जास्त दिवस स्ट्रॉबेरी कशी फ्रेश ठेवावी, याबद्दल देखील माहिती बघितलेली आहे. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरीचा केला जाणारा वापर इत्यादी माहिती देखील घेतलेली आहे.

FAQ

स्ट्रॉबेरीचे पीक महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी जास्त प्रमाणावर घेतले जात असते?

स्ट्रॉबेरीच्या पिकाला थंड हवामान आवश्यक असण्याबरोबरच, पर्वतीय मृदेची देखील आवश्यकता असते. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची पूर्तता करणाऱ्या महाराष्ट्रातील महाबळेश्वर या ठिकाणी स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात असते.

स्ट्रॉबेरी फळाचा आकार व रंग कसा असतो?

स्ट्रॉबेरी फळाचा आकार अतिशय लहान असून, त्यावर छोटे छोटे काटे किंवा बियाणे आढळून येतात व त्याचा रंग गुलाबीसर लाल असतो.

साधारणपणे एक किलो स्ट्रॉबेरी फळाची किंमत किती असते?

स्ट्रॉबेरी फळाची किंमत ही त्याच्या प्रतवारीनुसार ठरत असते. सर्वात कमी प्रतीच्या स्ट्रॉबेरी ची किंमत अगदी २५ ते ३० रुपयांपासून होलसेल दरामध्ये सुरू होते. तर उत्तम प्रतीच्या स्ट्रॉबेरी ची किंमत अगदी ३५० ते ४०० रुपये प्रति किलो पर्यंत देखील असते.

सामान्य व्यक्तीने दिवसभरात किती स्ट्रॉबेरीची फळे खाणे योग्य समजले जाते?

एका सामान्य व्यक्तीने दिवसभरात मध्यम आकाराच्या आठ स्ट्रॉबेरीच्या फळाचे सेवन करणे सामान्य समजले जाते. यामुळे कर्करोगाचा धोका कमी करण्याबरोबरच मधुमेहाचे देखील प्रमाण कमी केले जाऊ शकते. मात्र या फळाच्या अति सेवनामुळे खोकल्यासारखा आजार देखील बळावू शकतो.

स्ट्रॉबेरी फळाचे सेवन कोणकोणत्या रूपात केले जाऊ शकते?

स्ट्रॉबेरी फळाचे सेवन फळ म्हणून खाण्याबरोबरच सलाड मध्ये देखील वापरले जाते. त्याचबरोबर आईस्क्रीम, मिठाई यांच्यासारख्या पदार्थासह साठवून ठेवता येतील अशा जॅम सरबत अशा पदार्थांच्या प्रकारात देखील स्ट्रॉबेरी फळ खाल्ले जाऊ शकते.

Leave a Comment