Star Anise Information In Marathi भारताला मसाल्यांचा देश म्हणून ओळखले जाते. संपूर्ण जगाला चवदार जेवण बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मसाल्यांची देणगी ही भारताने दिलेली आहे, असे म्हटले जाते. अगदी पूर्वीच्या काळी सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय व्यापार या मसाल्यांच्या माध्यमातूनच सुरू झाला असल्याचे सांगितले जाते.
चक्रफुल मसाल्या विषयी संपूर्ण माहिती Star Anise Information In Marathi
आज भारतासह अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मसाल्याचा वापर केला जातो. ज्या मसाल्यांच्या निर्मितीसाठी विविध पदार्थ वापरले जातात त्यातील एका पदार्थाबद्दल अर्थात चक्रफुल या पदार्थाबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती बघणार आहोत…
नाव | चक्रफुल |
इंग्रजी नाव | स्टार अनिस |
प्रकार | मसाल्याचा पदार्थ |
स्वरूप | उष्ण व तिखट |
वापराचा सल्ला | मर्यादित वापर |
कुटुंब | इलिसीयासी |
भागांची संख्या | आठ |
उपलब्ध जीवनसत्व | जीवनसत्व इ, सी, आणि ए |
उत्पादक देश | भारत, जमेका, कंबोडिया, आणि फिलिपाईन्स |
मराठी मध्ये चक्रफुल या नावाने ओळखले जाणारे स्टार अनिस एक उष्ण स्वरूपाचा मसाला आहे. त्यामुळे त्याचा मर्यादित वापर करण्याचा सल्ला दिला जातो. असे असले तरी देखील योग्य प्रमाणात वापर केल्यास या चक्रा फुलापासून असंख्य फायदे मिळवता येऊ शकतात. त्याबाबत या लेखांमध्ये संपूर्ण चर्चा केलेली आहे.
चक्रफुल हे एक मसाल्याचा पदार्थ असून, अगदी ताऱ्याप्रमाणे दिसत असते. त्याला सुमारे आठ टोके असतात किंवा बिंदू असतात, म्हणून त्याला चक्रफुल असे नाव पडलेले असावे असे सांगितले जाते. हे एक इलिसियासी कुटुंबातील मसाल्याचे पदार्थ असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषक तत्व आढळून येतात, त्यामुळे अनेक ठिकाणी चहा बनवताना त्यामध्ये चक्रफुल आवर्जून घातले जाते.
विविध प्रकारचे उपयुक्त आम्ल, जीवनसत्व, खनिजे, प्रतिजैविके, अँटिऑक्सिडंट व दाहविरोधी गुणधर्म इत्यादींनी भरपूर असलेले हे चक्रफुल भारतीय स्वयंपाक घरामध्ये नेहमी आढळून येत असते.
या चक्रफुलाचा उगम भारतामधील नसून, आपल्या शेजारील देशांमध्ये अर्थातच चीनमध्ये झालेला आहे. त्यामुळे त्याला चायनीज स्टार म्हणून देखील ओळखले जाते. असे असले तरी देखील भारतासह चीन, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, कंबोडिया यांसारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर या चक्रफुलाचे उत्पादन घेतले जाते. भारताचा विचार केला तर अरुणाचल प्रदेश हे राज्य चक्रफुलाच्या उत्पादनामध्ये आघाडीवर समजले जाते.
चक्रफुल सेवनाचे विविध उपयोग:
एक मसाल्याचा पदार्थ असणारे चक्रफुल आरोग्यासाठी देखील खूपच उपयुक्त आहे. या चक्रफुलाचे विविध प्रकारे उपयोग केले जाऊ शकतात, त्यातील सर्वात उत्तम उपयोग म्हणून चक्रफुलाचा चहा अतिशय प्रसिद्ध आहे.
या चक्र फुलाला बारीक करून त्याची पावडर स्वयंपाकामध्ये वापरली जाऊ शकते. मसाला दुधाच्या निर्मितीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर चक्रफुल वापरली जाते.
विविध प्रकारच्या तयार खाद्यपदार्थांमध्ये जसे की जाम, जेली, इत्यादींमध्ये हे पदार्थ टिकवण्याकरिता चक्रफुलाचा वापर केला जातो. काही ठिकाणी तर दात घासण्यासाठी देखील चक्रफुल पावडर स्वरूपात वापरले जाते, विविध प्रकारचे गोड पदार्थ आणि मिठाई यामध्ये चांगला सुगंध व चव आणण्याकरिता चक्रफुल महत्त्वाची भूमिका बजावत असते.
चक्रफुल खाण्यामुळे होणारे आरोग्यदायी फायदे:
विविध आजार कमी करण्यामध्ये चक्रफुल फारच मोलाची भूमिका बजावत आहे, असे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झालेले आहे.
ज्या लोकांना नेहमीच गॅस किंवा अपचन इत्यादी समस्या जाणवत असतील, अशा लोकांना चक्रफुल सेवन करण्याचा सल्ला डॉक्टरांद्वारे दिला जातो. ज्यामुळे अन्नपचण्याबरोबरच अतिरिक्त गॅस कमी होण्यास देखील मदत होते. मात्र असे असले तरी देखील या बाबींमध्ये अधिक संशोधन गरजेचे आहे. या चक्रफुलाच्या अधिक सेवनाने पचन व्यवस्थित होण्याऐवजी अपचन देखील होऊ शकते.
शरीरावर कुठल्याही प्रकारची जळजळ होत असेल, त्या ठिकाणी दाह विरोधी म्हणून देखील या चक्रफुलाचा वापर प्रभावी ठरलेला आहे. एका संशोधनानुसार चक्रफुलात असणारे इथेनॉल दाह विरोधी गुणधर्म दाखवत असते, त्यामुळे फुफुसांच्या जळजळीवर हा एक अतिशय उत्तम उपाय आहे असे सिद्ध झालेले आहे.
चक्रफुलामध्ये अँटिबायोटिक अर्थात प्रती जैविक गुणधर्म देखील आढळून आलेले आहेत. त्यामुळे शरीरावर हल्ला करणाऱ्या विविध बुरशी, विषाणू, जिवाणू, किंवा परजीवी यांना एकत्र संपवण्याकरिता चक्रफुलाचा महत्त्वाचा वाटा आहे.
अनेकांना बुरशीजन्य संसर्ग किंवा आजार दिसून येत असतात, त्यामुळे त्वचेवर नेहमी खाज येणे, त्वचा लाल पडणे, पुरळ उठणे, यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. शरीरामध्ये तयार होणाऱ्या विविध फ्युजेरियम प्रजातीच्या बुरशीना नष्ट करण्याचे गुणधर्म या चक्रफुलामध्ये आढळून येत असतात.
आज काल बळावत चाललेला आजार म्हणून कर्करोगाला किंवा कॅन्सरला ओळखले जाते. या कॅन्सर विरोधी सर्वात प्रभावी उपाययोजना म्हणून केमोथेरपी समजली जाते, मात्र या चक्राफुलाचा आहारामध्ये नियमित समावेश केल्यामुळे तसेच या चक्रफुलाच्या तेलाचा वापर केल्यामुळे कर्करोगाच्या विरोधी शरीरास लढण्यास मदत होत असते. कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये रुग्णांना याचा मोठा फायदा दिसून आलेला आहे.
चक्र फुलाच्या सेवनाने होणारे नुकसान किंवा तोटे:
चक्रफुल हे एक गरम किंवा उष्ण आणि तिखट स्वरूपाचे मसाल्याचे पदार्थ असल्यामुळे अति प्रमाणात सेवन केल्यास अन्ननलिका व जठर इत्यादी ठिकाणी जळजळ जाणवू शकते. त्याचबरोबर अस्वस्थता देखील निर्माण होऊ शकते.
गर्भवती महिलांनी मोठ्या प्रमाणावर या चक्रफुलाचे सेवन केल्यास गर्भपात होण्याची देखील शक्यता किंवा धोका नाकारता येत नाही. त्याचबरोबर उलट्या होणे, मळमळ होणे, इत्यादी गोष्टींसाठी देखील चक्रफुलाला जबाबदार धरले जाते. त्यामुळे शक्यतो आठ वर्षांच्या खालील बालकांना चक्रफुल खाण्यापासून मनाई केली जाते.
निष्कर्ष:
मसाला म्हटलं की आपल्याला हल्ली बंद सॅशे मधील पावडर स्वरूपातील मसाले आठवतात. कारण हल्ली शक्यतो स्वयंपाक घरामध्ये खडे मसाले स्वतंत्ररित्या आढळून येत नाहीत. आजकाल च्या युगामध्ये कंपन्या या सर्व मसाल्यांना योग्य त्या प्रमाणामध्ये एकत्र करून त्यापासून नवीन मसाले बनवत असतात.
हल्ली अगदी तर भाज्यांच्या नावाने देखील मसाले मिळत असतात, त्यामुळे हल्लीच्या पिढींना खड्या मसाल्यातील पदार्थ ओळखता येत नाहीत. आज आपण या खड्या मसाल्यांपैकी एक असणारा पदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चक्रफुला बद्दल माहिती बघितली आहे.
त्यामध्ये चक्रफुल म्हणजे काय, त्याच उत्पादन सर्वात जास्त कोठे होते, त्यामध्ये आढळणारे विविध पोषक घटक, या पदार्थामुळे होणारे आरोग्यदायी फायदे, यापासून तयार होणारा मसाला, याचा वापर करण्याची मर्यादा, याचे उपयोग, तसेच या पदार्थापासून होणारे नुकसान इत्यादी माहिती बघितलेली आहे. त्याचबरोबर नेहमी विचारले जाणारे प्रश्न बघितल्यामुळे तुमच्या काही शंका देखील दूर झालेल्या असतील.
FAQ
चक्रफुल या मसाल्याच्या पदार्थाला इंग्रजी मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?
चक्रफुल या मसाल्याच्या पदार्थाला इंग्रजी मध्ये स्टार अणीस या नावाने ओळखले जाते.
चक्रफुलाच्या सेवनामुळे शरीराला कोणकोणत्या स्वरूपाचे जिवणसत्व आणि इतर घटक प्राप्त होत असतात?
चक्रफुलाच्या सेवनामुळे शरीराला विविध घटक प्राप्त होतात, ज्यामध्ये जीवनसत्व अ, जीवनसत्व क आणि जीवनसत्व इ चा समावेश होतो. त्याचबरोबर कॅल्शियम, फॉस्फरस, विविध खनिज यांचा आणि उपयुक्त आम्ल इत्यादींचा देखील समावेश होतो.
चहा व चक्रफुल किंवा स्टार अनिस यांचा काय संबंध आहे?
ज्यावेळी चहा मसाला बनवला जातो, त्यामध्ये अनेक घटक टाकले जातात. त्यामध्ये मुख्य घटक म्हणून दालचिनी व या चक्रफुलाचा समावेश होतो.
चक्रफुलाचा वापर कोणकोणत्या ठिकाणी केला जातो?
चक्रफुल हे एक मसाल्याचा पदार्थ असून, याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामध्ये स्वयंपाक बनविणे, तेल काढणे, टूथपेस्ट मध्ये वापरणे, विविध परफ्युम, साबण, सौंदर्यप्रसाधने यांना सुगंधित करण्यासाठी आणि औषधे किंवा गोळ्यांमध्ये येणाऱ्या उग्र दर्पला कमी करण्याकरिता याचा वापर होतो.
अति प्रमाणात चक्रफुल खाल्ल्यास काय परिणाम होऊ शकतात?
अतिप्रमाणामध्ये चक्रफुलाचे सेवन केल्यामुळे मळमळ, उलट्या, अपचन, घशामध्ये व पोटामध्ये जळजळ होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.