शनिवार वाड्या विषयी संपूर्ण माहिती Shaniwar Wada Information In Marathi

Shaniwar Wada Information In Marathi पुणे शहराचे वैभव म्हणून ओळखली जाणारी वस्तू म्हणजे शनिवार वाडा होय. मित्रांनो, पुणे शहर हे शनिवार वाड्याच्या नावाने ओळखले जाते. पेशवे काळात बांधण्यात आलेला हा शनिवार वाडा तत्कालीन पुणे शहरातील अतिशय प्रसिद्ध इमरातीपैकी एक होता. या शनिवारवाड्याची स्थापना १७३२ मध्ये पेशव्यांच्या मार्फत करण्यात आली होती.

 Shaniwar Wada Information In Marathi

शनिवार वाड्या विषयी संपूर्ण माहिती Shaniwar Wada Information In Marathi

मराठी वास्तू कलेचा एक उत्तम नमुना म्हणून या शनिवार वाड्याकडे बघितले जाते. तत्कालीन पुणे शहरे हे आज इतके पसरलेले नव्हते, त्यामुळे किल्ल्याच्या बांधकामावेळी अवघ्या शहराइतके बांधकाम या शनिवार वाड्याचे होते. अतिशय रहस्यमय गोष्टींनी आणि पराक्रमी घटनांनी युक्त असलेला हा शनिवार वाडा किल्ला पेशवेकालीन राज्यकारभाराचा पुरावा म्हणून ओळखला जातो.

आज पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पर्यटन स्थळांमध्ये शनिवार वाडा अतिशय उत्तम असून, तो लाल महालाच्या अगदीच जवळ आहे. आजच्या भागामध्ये आपण या ऐतिहासिक वास्तू बद्दल अर्थात शनिवार वाड्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

नावशनिवार वाडा
स्थापना वर्ष१७३२
स्थापकबाजीराव पेशवा प्रथम
ठिकाणमनपा भवन समोर, नदीकाठी, पुणे
साधारण उंची २1 फूट
जवळचे प्रेक्षणीय स्थळलाल महाल

शनिवार वाडा ही पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली ऐतिहासिक इमारत असून, मराठा साम्राज्याच्या दैदिप्यमान इतिहासाचा वारसा जपत ही इमारत सुमारे २९० वर्ष दिमाखात उभी आहे. १७३२ मध्ये या वास्तूची निर्मिती केल्या गेल्यापासून १८१८ मध्ये इंग्रजांनी यावर वर्चस्व मिळवेपर्यंत ती मराठा शासकांच्या अर्थात पेशव्यांच्या ताब्यामध्ये होती.

तटबंदी स्वरूपाचा असणारा हा शनिवार वाडा पर्यटकांकरिता सकाळी आठ ते संध्याकाळी साडेसहा पर्यंत खुला असतो। येथे भारतीय व परदेशी अशा दोन्ही प्रकारच्या नागरिकांकडून शुल्क आकारले जाते. मराठा इम्पेरियल आर्किटेक्चर स्वरूपाचे बांधकाम शैली असलेला हा किल्ला अतिशय रहस्यमय कथांनी भरलेला आहे. असे असले तरी देखील येथे लाखो पर्यटक दरवर्षी भेट देऊन आनंद मिळवत असतात. पुणे शहराला भेट देणाऱ्या लोकांनी नक्कीच या ठिकाणाला भेट दिली पाहिजे.

शनिवार वाडा किल्ल्याबद्दल ऐतिहासिक माहिती:

पहिला बाजीराव पेशवा हे छत्रपती शाहू महाराजांच्या अधिपत्याखाली कार्य करत असत. त्यांनी प्रशासकीय सोयीसाठी या किल्ल्याची १७३२ या वर्षी निर्मिती केली होती. अर्ध्या दगडांनी आणि अर्धा विटांनी बनवलेला हा किल्ला खूपच सुंदर असून, ब्रिटिशांनी देखील या किल्ल्यावर अनेक वर्ष राज्य केलेले आहे. 

अनेक रहस्यमय कथा या किल्ल्यामध्ये घडलेल्या असून, अनेकदा या किल्ल्याला आग देखील लागलेली आहे. ज्यामध्ये त्याचे महत्त्वाचे मजले देखील जळून खाक झालेले आहेत. अनेक वर्ष पेशव्यांनी या किल्ल्यावर वास्तव्य केले असले, तरी देखील १८१८ मध्ये झालेल्या अँग्लो मराठा युद्धात ब्रिटिशांनी हा किल्ला मिळवला, आणि तेव्हापासून या किल्ल्यावर युनियन जॅक फडकू लागला.

भारतीयांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा युनियन जॅक उतरवून तेथे पुन्हा तिरंगा झेंडा लावण्यात आला. या शनिवार वाडा किल्ल्याच्या समोरच अतिशय उंच तिरंगा असून, तो देखील एका प्रेक्षणीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

शनिवार वाड्याची वस्तू कला:

मराठा साम्राज्याच्या शासकांद्वारे बांधण्यात आल्यामुळे या किल्ल्याची स्थापत्य शैली देखील मराठा इम्पिरियल आर्किटेक्चर स्वरूपातीलच आहे. या किल्ल्याच्या बांधकामागरिता जुन्नर तालुक्यातून सागवान लाकूड, जेजुरी परिसरातून चुनखडी, आणि पिंपरी चिंचवडच्या क्षेत्रातून दगड मागवले गेले होते. अतिशय प्रचंड आणि विस्तीर्ण स्वरूपात विस्तारलेला हा किल्ला अवघ्या दोन वर्षातच बांधून तयार झाला होता.

५ मुख्य प्रवेशद्वार, ९ बुरुज, आणि अतिशय छान कोरीव काम केलेले सागवानी खांब हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. या किल्ल्याच्या भिंतीवर रामायणातील काही दृश्य देखील कोरलेले आहेत. येथे गणपती रंग महाल देखील उभारण्यात आलेला होता.

शनिवार वाडा किल्ल्यामध्ये काय बघावे:

शनिवार वाडा या किल्ल्यामध्ये अनेक बघण्यासारखी ठिकाणे असून, यामध्ये नऊ बुरुज, मस्तानी दरवाजा, पहिली बहादूर दरवाजा, गार्डन कॉम्प्लेक्स, खिडकी दरवाजा, गणेश रंग महाल, हजारी कारंजे, जांभूळ दरवाजा, आणि नारायण दरवाजा इत्यादी ठिकाणे बघण्यासारखी आहेत.

शनिवार वाडा बद्दल तथ्य:

शनिवार वाडा हा तत्कालीन काळामध्ये अनेक महाग वास्तूंपैकी एक होता. त्यासाठी सुमारे १६,११० रुपये खर्च आला होता.

शनिवार वाड्याचा दरवाजा अतिशय विशालकाय असून, या किल्ल्याच्या दरवाज्यातून चार हत्ती सहज जाऊ शकत होते. मात्र तो तितकाच भक्कम देखील होता. जो हत्तींना तोडणे देखील शक्य नव्हते, कारण त्याच्यावर लोखंडी खिळे लावलेले होते.

बॉलीवूड मध्ये तयार करण्यात आलेल्या बाजीराव मस्तानी, आणि द अमेजिंग रेस एशिया तीन यासारख्या सांस्कृतिक कलाकृतींमध्ये देखील शनिवार वाडा दाखवलेला आहे.

निष्कर्ष:

पुणे शहर म्हटले की सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, आणि त्याचबरोबर ऐतिहासिक गोष्टी म्हटलं की शनिवार वाडा हमखास आपल्या लक्षात येतो. शनिवार वाडा हे आज पुणे शहराचे भूषण असले, तरी देखील पूर्वीच्या काळी शनिवार वाडा हे पेशवे साम्राज्याची महत्वाची इमारत होती. अतिशय विस्तीर्ण परिसरामध्ये उभारलेला हा शनिवार वाडा किल्ला पुण्याच्या अगदी मध्यवर्ती जागेमध्ये वसलेला असून, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मार्गाने जाताना हा शनिवार वाडा आपल्याला दिसत असतो.

पुणे महानगरपालिका पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला हा शनिवार वाडा सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असून, बाहेरील पर्यटकांकरिता एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी शनिवार वाडा बघण्याकरिता पुणे महानगरपालिकेकडून तिकीट आकारले जात असले, तरी देखील काही विशेष प्रसंगी हा किल्ला बघण्यासाठी मोफत देखील असतो. ज्यामध्ये स्वातंत्र्य दिनासारख्या दिवसांचा समावेश होतो.

आजच्या भागामध्ये आपण या शनिवार वाडा किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे. यामध्ये शनिवार वाडा किल्ल्याचा इतिहास, त्याची बांधकाम शैली व वास्तू कला, येथे सांगितल्या जाणाऱ्या रहस्यमय कथा, येथे असणारे विविध शो, येथे भेट देण्याचे वेळापत्रक, येथे आकारले जाणारे शुल्क, शनिवार वाड्यात बघण्यासारखी ठिकाणे, जवळपास असणारी प्रेक्षणीय स्थळे, किल्ला बघायला जाण्यासाठी वाहतुकीच्या सोयी, येथे गोष्टींबद्दल माहिती बघितली आहे.

FAQ

शनिवार वाडा हा किल्ला कोणत्या शासकाद्वारे व कोणत्या वर्षी बांधण्यात आला होता?

शनिवार वाडा हा किल्ला बाजीराव पेशवा प्रथम या शासकाद्वारे इसवी सन १७३२ या वर्षी बांधण्यात आला होता.

शनिवार वाडा हा किल्ला कोठे वसलेला आहे?

शनिवार वाडा हा किल्ला महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील मध्यवर्ती परिसरामध्ये वसलेला असून, महा नगरपालिकेच्या कार्यालयापासून अगदीच जवळ आहे.

शनिवार वाडा किल्ल्याच्या आसपास बघण्यासारखी कोणती उत्तम ठिकाणे आहेत?

शनिवार वाडा किल्ल्याला भेट द्यायला गेल्यानंतर तुम्ही येथे असणारी आजूबाजूची अनेक पर्यटन स्थळे देखील भेट देऊ शकता. यामध्ये लाल महाल, नाना वाडा, भिडे वाडा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, इत्यादी ठिकाणांचा समावेश होतो.

शनिवार वाडा किल्ला बांधताना अर्धा दगडात व अर्धा विटेमध्ये का बांधला गेला आहे?

शनिवार वाडा किल्ला बांधायला सुरुवात केल्यानंतर तो संपूर्ण दगडामध्येच बांधण्याची योजना होती. मात्र काही लोकांनी या गोष्टीवर आक्षेप घेत असे सांगितले की पेशव्यांना दगडी महाल असू शकत नाही. तो मान केवळ राजांनाच असतो. त्यामुळे उर्वरित बांधकाम हे विटे पासून केले गेले.

शनिवार वाडा किल्ल्याजवळ कोणाच्या प्रकारचे शो आयोजित केले जातात, व किल्ला बघण्यासाठी चे काही शुल्क असते का?

शनिवार वाडा किल्ला बघायचा असेल, तर विशेष दिवस वगळता इतर वेळी शुल्क आकारले जाते. याचबरोबर किल्ल्याच्या जवळच लाईट शो आणि म्युजिक शो आयोजित केले जात असतात.

Leave a Comment