Rabindranath Tagore Information In Marathi एक उत्तम साहित्यकार म्हणून बंगालच्या रवींद्रनाथ टागोर यांना ओळखले जाते. या रवींद्रनाथ टागोर यांनी अतिशय उत्तम साहित्य निर्मिती केली असली तरी देखील त्यांच्याबद्दल फार कमी लिहिले गेलेले आहे. अतिशय प्रतिभावान लेखक म्हणून त्यांना आज देखील ओळखले जाते.
रवींद्रनाथ टागोर यांची संपूर्ण माहिती Rabindranath Tagore Information In Marathi
मोजक्याच खास शैलीमध्ये लिहिणाऱ्या लोकांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत शिकणे आणि लिहिणे हे कार्य केलेले आहे. आज देखील त्यांची आठवण मोठ्या प्रमाणावर काढली जाते. अशा या रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवन चरित्राबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती बघणार आहोत…
नाव | रवींद्रनाथ टागोर |
संपूर्ण नाव | रवींद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर |
जन्मस्थळ | कलकत्ता |
जन्म दिनांक | ७ मे १८६१ |
वडिलांचे नाव | देवेंद्रनाथ टागोर |
आईचे नाव | शारदा देवी |
भाषा | बंगाली |
ओळख | लेखक तथा चित्रकार |
गाजलेली साहित्यरचना | गीतांजली |
सर्वोच्च पुरस्कार | नोबेल पुरस्कार |
मृत्यु दिनांक | ७ ऑगस्ट १९४१ |
रवींद्रनाथ टागोर यांचे प्रारंभिक जीवन:
दिनांक ७ मे १८६१ या दिवशी कलकत्त्यातील एका लहानशा गावामध्ये बंगाली कुटुंबात रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला. त्यांच्या आई-वडिलांना एकूण १३ अपत्य होती. यातील सर्वात लहान आपत्य म्हणून रवींद्रनाथ टागोर यांना ओळखले जाते. त्यांच्या लहानपणीच त्यांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले गेले, त्यामुळे त्यांना फार मोठा धक्का बसला होता.
त्याचबरोबर त्यांचे वडील हे सामाजिक नेता असल्यामुळे ते नेहमी फिरतीवर असत. त्यामुळे आई वडील यांचे प्रेम रवींद्रनाथ टागोर यांना लहानपणापासूनच लाभले नाही. त्यांच्या घरी नोकर चाकर असल्यामुळे रवींद्रनाथ टागोर यांचे सर्व लालन पालन ही नोकर मंडळीच करत असत.
रवींद्रनाथ टागोर यांचे शैक्षणिक आयुष्य:
लहानपणापासून अतिशय उत्तम बुद्धिमत्ता आणि प्रतिभा असणारे रवींद्रनाथ टागोर खूपच हुशार होते. प्राथमिक शिक्षण सेंट जेवियर शाळा कलकत्ता येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी १८७८ यावर्षी लंडन विश्वविद्यालयामध्ये वडिलांच्या आग्रहाखातीर त्यांनी बॅरिस्टर होण्यासाठी प्रवेश मिळविला.
मात्र तिथे त्यांचे मन रमत नसे. लहानपणापासूनच लेखन क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे बॅरिस्टर पदवी त्यांनी घेतली नाही, व ते पुन्हा भारतामध्ये १८८० यावर्षी परतले. पुढे तीन वर्षानंतर त्यांचा मृणालिनी यांच्यासोबत विवाह झाला व ते सांसारिक जीवन जगू लागले.
रवींद्रनाथ टागोर यांचा लेखन प्रवास:
इंग्लंड वरून परतल्यानंतर रवींद्रनाथ टागोर विवाह करून आपल्या संसारीक आयुष्यामध्ये रमले होते. मात्र या दरम्यान त्यांनी गरिबी जवळून बघितली. लहानपणापासून कशाचीही कमी नसणाऱ्या रवींद्रनाथ टागोर यांना या गरीब समाजाच्या व्यथा बघून खूप हळहळ वाटली, आणि त्यांनी या बंगालच्या गरिबीवर अनेक लघु कथा लेखन केले.
पुढे १९०१ यावर्षी त्यांनी शांतीनिकेतन या ठिकाणांची निर्मिती करून तिथे शाळा ग्रंथालय इत्यादी गोष्टींची निर्मिती केली. पुढे त्यांच्या मुलांचा व पत्नीचा देखील मृत्यू झाला, आणि वडील देखील त्यांना १९०५ या वर्षी सोडून गेले. त्यामुळे एकटे पडल्यासारखे झाले. त्यातून त्यांनी आपली लिखाणाची आवड जोपासली आणि साहित्य क्षेत्रामध्ये फार मोलाची भूमिका बजावली.
त्यांची साहित्य क्षेत्रातील गती बघता त्यांना नोबेल या अंतराष्ट्रीय पारितोषकांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार गीतांजली या ग्रंथरचने करिता देण्यात आला होता. त्याच बरोबर त्यांना १९१५ या वर्षी नाईट हुड ही पदवी इंग्रज शासनाद्वारे देण्यात आली. मात्र त्याच वेळेस जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते, आणि अशा या अमानुष इंग्रजांकडून मला ही पदवी नको म्हणून त्यांनी ती पदवी परत केली होती.
रवींद्रनाथ टागोर यांचे पुरस्कार:
साहित्य क्षेत्रातील महान व्यक्ती म्हणून रवींद्रनाथ टागोर यांना ओळखले जाते. त्यांनी अनेक प्रकारच्या भाषेमध्ये साहित्य निर्मिती केलेली असून, त्यांना यासाठी अनेक पुरस्कार देखील देण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये नोबेल पारितोषिक, नाईट हूड, भारतरत्न पुरस्कार, डी लिट होनोरिस कोसा यांसारख्या अतिशय प्रसिद्ध पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
रवींद्रनाथ टागोर यांची कौटुंबिक माहिती:
रवींद्रनाथ टागोर यांना कुटुंबाचे सौख्य कधीही लाभले नाही. कदाचित ते त्यांच्या नशिबी नव्हते असे देखील म्हटले जाते. त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईने त्यांची साथ सोडली, त्यांच्या वडील नेहमी कामानिमित्ताने घराबाहेर असत त्यामुळे त्यांना कौटुंबिक प्रेम किंवा जिव्हाळा लाभला नाही. पुढे लग्नानंतर पत्नी सोबत आली, मात्र काहीच वर्षांमध्ये पत्नी व मुले यांचे देखील निधन झाले. त्यामुळे कौटुंबिक सौख्य रवींद्रनाथ टागोर यांना लाभले नाही.
रवींद्रनाथ टागोर आणि शांती निकेतन:
रवींद्रनाथ टागोर यांचे नाव घेतले की त्यांचे शांतिनिकेतन प्रत्येकालाच आठवते. रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलांची मोठी संपत्ती होती, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनीचा देखील समावेश होता. त्यांनी १९०१ यावर्षी या जमिनीवर शांतिनिकेतन ही संस्था बांधण्याचा विचार केला. ज्या अंतर्गत नवीन युवक व प्रौढ यांना देखील शिक्षण देणे, शेती व्यवस्था शिकविणे, छोट्या छोट्या कुटीर उद्योगांचे प्रशिक्षण देणे, हस्तकला करण्याबद्दल मार्गदर्शन करणे, यांसारख्या गोष्टी पुरविल्या जात असत.
रवींद्रनाथ टागोर यांचे सामाजिक जीवन:
लेखन कार्य करत असतानाच रवींद्रनाथ टागोर समाजासाठी देखील कार्य करत होते. त्यांनी १६ ऑक्टोबर १९०५ या दिवशी वंग नावाची एक चळवळ सुरू करून स्वदेशी गोष्टींना प्राधान्य देण्याचे ठरविले. त्याचबरोबर त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यामुळे सरकारने दिलेला पुरस्कार परत करत सरकारचा निषेध नोंदविला होता. त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध देखील प्रचंड लिखाण केलेले असून, इंग्रज शासनाविरुद्ध मोठे कार्य देखील केलेले आहे. स्वातंत्र्य कार्यामध्ये देखील त्यांचे फार मोठे योगदान आहे.
निष्कर्ष:
काही लोक अतिशय तेजस्वी व प्रतिभावाने स्वरूपाचे असतात. त्यांची साहित्यरचना वाचल्यानंतर आपल्याला देखील मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटते. अतिशय विपुल शब्दसंपदा असणारी ही लोक, लेखन क्षेत्रामध्ये फार मोठे नाव मिळवत असतात. अशा लेखकांमध्ये रवींद्रनाथ टागोर यांचा देखील समावेश होतो.
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपल्या लेखनातून सर्वत्र प्रसिद्ध झालेले रवींद्रनाथ टागोर त्यांनी लिहिलेल्या गीतांजली या रचनेसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. आजच्या भागामध्ये आपण या रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवन चरित्र विषयी माहिती जाणून घेतलेली आहे.
त्यामध्ये त्यांचा जन्म, त्यांचे प्रारंभिक आयुष्य, त्यांच्याविषयी कौटुंबिक माहिती, तरुणपणातील रवींद्रनाथ टागोर, देवेंद्रनाथ टागोरांचे शैक्षणिक आयुष्य, तसेच खाजगी आयुष्य, त्यांनी केलेल्या शांतिनिकेतन या ठिकाणाची स्थापना, त्यांनी लिहिलेले प्रसिद्ध साहित्य आणि चित्र,तसेच समाजासाठी त्यांनी केलेले विविध कार्य, आणि त्यांना मिळालेले विविध पुरस्कार, इत्यादी माहिती बघितली आहे. सोबतच त्यांच्या निधनाविषयी देखील जाणून घेतले आहे.
FAQ
रवींद्रनाथ टागोर यांचे संपूर्ण नाव काय होते?
रवींद्रनाथ टागोर यांची संपूर्ण नाव रवींद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर असे होते.
रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी व कोणत्या दिवशी झाला होता?
रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म कलकत्ता या ठिकाणी दिनांक ७ मे १८६१ या दिवशी झाला होता.
रवींद्रनाथ टागोर यांच्या आईचे व वडिलांचे नाव काय होते?
रवींद्रनाथ टागोर यांच्या आईचे नाव सौ शारदा देवी, तर वडिलांचे नाव श्री देवेंद्रनाथ टागोर असे होते.
रवींद्रनाथ टागोर यांनी कोणकोणत्या भाषेमध्ये आपली साहित्य निर्मिती केलेली आहे?
रवींद्रनाथ टागोर यांनी मुख्यतः बंगाली आणि इंग्रजी या भाषेमध्ये आपली साहित्य रचना केलेली असून, काही प्रमाणात हिंदी भाषेमध्ये देखील त्यांची ग्रंथ संपदा आढळून येते.
रवींद्रनाथ टागोर यांना कोणत्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे?
जागतिक पातळीवर सर्वोच्च सर्वोच्च समजला जाणारा नोबेल पुरस्कार देऊन रवींद्रनाथ टागोर यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.