पोस्ट ऑफिस विषयी संपूर्ण माहिती Post Office Information In Marathi

Post Office Information In Marathi आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. अगदी घरातीलच एका खोलीमधून दुसऱ्या खोलीमध्ये संपर्क साधण्याकरिता माणूस उठण्याची कष्ट घेत नाही, तर संदेशाच्या माध्यमातून अथवा कॉल च्या माध्यमातून एकमेकांना संपर्क करत असतात. मात्र पूर्वीच्या काळी एकमेकांना संदेश पोहोचविणे, किंवा दूरवर असणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधने अतिशय अवघड काम होते. दूर राहणाऱ्या जवळच्या नातेवाईकांसाठी पोस्ट किंवा टपाल हे एक फार महत्त्वाचे साधन किंवा दुवा ठरत होते.

Post Office Information In Marathi

पोस्ट ऑफिस विषयी संपूर्ण माहिती Post Office Information In Marathi

पोस्ट ऑफिस लोकांच्या विविध संदेशांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आले होते, मात्र आजकाल पोस्ट ऑफिस हे आर्थिक क्षेत्रांमध्ये देखील शिरले असून, त्या अंतर्गत ठेव स्वीकारण्याची देखील काम करत असते. त्याचबरोबर विविध ऑफिशियल कागदपत्रे पाठविणे, म्हणजे ऑर्डर पाठविणे, काही माल अथवा पार्सल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचविणे इत्यादी कार्य देखील पोस्टमार्फत केले जाते.

या पोस्टमध्ये आर्थिक सेवेमध्ये पेन्शन योजना, बचत योजना, लॉकर सुविधा इत्यादी अनेक सुविधा प्रधान केल्या जातात. हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या आपल्या नातेवाईकांना कुठलीही वस्तू पाठवायची असेल, तरी आपल्याला लगेच पोस्टाची आठवण होते. अशा या मध्ययुगीन कालावधीमध्ये फार गाजलेल्या आणि लोकांच्या गळ्यातील ताईत ठरणाऱ्या पोस्ट ऑफिस बद्दल आजच्या भागांमध्ये आपण माहिती बघणार आहोत…

नावपोस्ट ऑफिस
मराठी नावटपाल कार्यालय
स्थापनाइंग्रजांद्वारे
मुख्य कार्यएक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी संदेश  पोहोचविणे
कार्यक्षेत्रदळणवळण
सध्याची कार्यआर्थिक क्षेत्रामधील व्यवहार
रंगलाल

पोस्ट ऑफिस ही सार्वजनिक दळणवळणाची एक सुविधा असून, भारताने या पोस्ट ऑफिस चे जाळे संपूर्ण भारतभर विस्तारलेले आहे. त्यामुळे भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यापासून कुठेही आपल्याला पत्र, मनी ऑर्डर किंवा पार्सल पाठवायचे असतील, तरी अगदी सहज शक्य होत असते.

पोस्ट ऑफिस ने आर्थिक क्षेत्रामध्ये प्रवेश करून देखील आपली सेवा सुरू केलेली आहे. यामध्ये पोस्टल आर डी, ई पोस्ट सेवा खूपच प्रसिद्ध आहे. आणि अनेक लोक या सेवेवर विश्वास ठेवून गुंतवणूक देखील करत आहेत. त्याचबरोबर विविध सरकारी फॉर्म पुरविणे, या फॉर्म भरण्यासाठी मदत पुरविणे, पासपोर्ट काढणे, सरकारी खर्चाच्या बिलाची रक्कम अदा करणे, विजेचे बिल, पाणी बिल भरणे, यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. पोस्ट ऑफिस मधील सर्वोच्च अधिकाऱ्याला पोस्टमास्तर या नावाने ओळखले जाते.

पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी मिळवताना

पोस्ट ऑफिस मध्ये विविध पदानुसार अनेक प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध असतात. यामध्ये तुम्ही अवघ्या दहावी ची परीक्षा दिल्यानंतर देखील प्रवेश घेऊ शकता. यासाठी दहावी इयत्तेवर आधारित प्रवेश दिला जातो. ज्या ठिकाणी कुठलीही परीक्षा नसते.

मात्र दहावीच्या गुणांवर आधारित निवड केली जाते, त्यामुळे जास्तीत जास्त दहावीला गुण असतील तर तुम्ही सहजरित्या या नोकरीमध्ये सहभागी होऊ शकता. केंद्र सरकारची नोकरी असल्यामुळे, तुम्हाला येथे चांगले फायदे देखील उपभोगता येतात. दहावी पास झालेल्या व्यक्तींसाठी जीडीएस अर्थात ग्रामीण डाक सेवक किंवा एम टी एस म्हणजेच मल्टी टास्किंग स्टाफ इत्यादी पदावर कार्य करता येऊ शकते.

पोस्ट ऑफिस आणि आर्थिक व्यवहार:

बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिस देखील आर्थिक किंवा वित्तीय सेवा पूरवत आहे. यामध्ये तुम्ही बचत खाते सुरू करून, तुमची बचत येथे जमा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही येथे एफ डी किंवा आरडी या प्रकारच्या ठेवी देखील ठेवून पैशांना चांगल्या ठिकाणी गुंतवण्याचा पर्यायही निवडू शकता.

येथील बचत खात्यासाठी तुम्हाला डेबिट कार्ड देखील पुरविले जाते. या अंतर्गत कुठल्याही एटीएम मशीनद्वारे तुम्ही तुमचे पैसे काढू शकता, त्याचबरोबर ऑनलाईन स्वरूपात देखील तुम्ही तुमच्या खात्याला व्यवस्थापित करू शकता. मात्र या एटीएम चा वापर करण्यासाठी तसेच पैसे काढण्यासाठी मर्यादा देखील ठरवून देण्यात आलेल्या आहेत.

डाक कर्मचाऱ्यांचे वेतन:

पोस्ट ऑफिस मध्ये कार्य करणाऱ्या एक ते पाच वर्ष अनुभवी व्यक्तींना प्रति वर्ष दोन लाख रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते. त्याचबरोबर क्लार्क साठी हेच वेतन अडीच लाख रुपये प्रति वर्ष देखील असू शकते. त्याचबरोबर मोठ्या हुद्द्यावरील अधिकाऱ्यांना अधिकचा भत्ता देखील प्राप्त होत असतो. पोस्ट खात्यातील पोस्ट मास्तरला प्रति महिना साडेसात ते साडेनऊ हजार रुपयांपर्यंत पगार मिळत असतो.

पोस्ट ऑफिस मध्ये सहभागी होण्यासाठी फॉर्म:

पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या व्यक्तींना सर्वप्रथम ऑनलाइन स्वरूपात नोंदणी करून फॉर्म भरावा लागतो. यासाठी जी डी एस ही अधिकृत वेबसाईट किंवा संकेतस्थळ वापरावे लागते. तेथील मुख्य पानावरच साईन अप चा पर्याय दिसून येतो. येथे तुम्ही नोंदणी करून आवश्यक ती माहितीने फॉर्म भरू शकता. यासाठी महिलांना कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही, मात्र काही वेळेला पुरुषांसाठी फी आकारले जाऊ शकते.

मित्रांनो, काही वेळेला आपल्याला पोस्ट ऑफिस बद्दल तक्रारी असतात. या तक्रारींचे निवारण करण्याकरिता तुम्ही पोस्ट ऑफिसच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन, किंवा १९२४ या विनाशुल्क क्रमांकावर कॉल करून तक्रार करू शकता.

निष्कर्ष:

आज चुटकीसरशी एकमेकांशी संपर्क साधता येत असला, तरी देखील पूर्वीच्या काळी असे करता येत नव्हते. कितीही महत्त्वाचा संदेश असला तरी देखील आधी पोस्ट ऑफिस मधून लिफाफा आणून, त्यात लिहिलेले पत्र टाकावे लागे.  त्यावर तिकीट चिकटवणे, पत्रपेटीत टाकणे इत्यादी कार्य खास वेळ काढून करावी लागत असत.

मात्र लोक ते आनंदाने करत असे. हे पत्र एकदा टाकल्यानंतर साधारणपणे आठवड्याभरानंतर समोरच्याच्या हातात पडत असे, त्यामुळे प्रत्येकाला त्यावेळी पत्राची फार किंमत होती. तसेच समोरच्याच्या पत्राची आतुरतेने वाट पाहिली जात असे.

आज सर्व काही मोबाईल फोन मुळे हातावर आलेले असल्यामुळे, याची कुणालाही किंमत उरलेली नाही. आजच्या भागामध्ये आपण याच विसाव्या शतकात सर्वांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बद्दल घडवून आणणाऱ्या पोस्ट ऑफिस बद्दल माहिती बघितलेली आहे.

यामध्ये पोस्ट ऑफिस म्हणजे नेमके काय, पोस्ट ऑफिस मध्ये सहभागी व्हायचे असेल तर काय करावे लागते, येथील कर्मचाऱ्यांचा पगार, येथे नोकरी मिळवण्याची पद्धत, पोस्ट ऑफिस मधील आर्थिक व्यवहार बद्दल माहिती, तेथील विविध प्रकारचे फॉर्म, या नोकरीत सहभागी होण्यासाठीच्या परीक्षा व अभ्यासक्रम, इत्यादी बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे.

सोबतच पोस्ट ऑफिस बद्दल काही तक्रार असेल तर त्याबद्दल कोणाकडे दाद मागता येऊ शकते, ही माहिती देखील बघितलेली आहे.

FAQ

पोस्ट ऑफिस हे भारत सरकारच्या कोणत्या विभागांतर्गत कार्य करत असते?

पोस्ट ऑफिस हे भारताच्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान या विभागाच्या किंवा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करत आहे.

भारतामध्ये साधारणपणे पोस्ट ऑफिस ची संख्या किती आहे?

भारतामधील पोस्ट ऑफिस ची संख्या साधारणपणे १ लाख ५४ हजार पेक्षाही बरीच अधिक आहे.

सद्यस्थितीमध्ये भारतीय पोस्ट खात्यामध्ये किती लोक नोकरी करत आहेत?

सद्यस्थितीमध्ये भारतीय पोस्ट खात्यामध्ये चार लाख लोकांपेक्षाही अधिक लोक नोकरी करत आहेत.

आर्थिक क्षेत्रामध्ये पोस्ट ऑफिस कोणकोणत्या स्वरूपाचे कार्य करत असते?

हार्दिक क्षेत्राचा विचार केल्यास पैसे ट्रान्सफर करणे, बचत खाते पुरविणे, विमा सेवा देणे, ऑनलाईन खरेदी साठी मदत करणे, मुदत ठेव, आरडी ठेव, डिमांड ड्राफ्ट, मनी ऑर्डर इत्यादी सेवा देखील पुरवण्याची कार्य पोस्ट ऑफिस द्वारे केले जाते.

टपालामध्ये भारतीय पोस्ट ऑफिस ने कोणकोणत्या सेवा आजकालच्या काळामध्ये सुरू केलेले आहेत?

टपालाच्या संदर्भात विचार केल्यास भारतीय पोस्ट ऑफिसचे जाळे फार मोठ्या स्वरूपात विस्तारलेले असून, प्रत्येक गावामध्ये एक तरी पोस्ट ऑफिस दिसून येते. त्यामुळे स्पीड पोस्ट, पार्सल सेवा, कुरिअर सेवा इत्यादी गोष्टी या पोस्ट ऑफिस द्वारे पुरविल्या जातात.

Leave a Comment