पिंपळ झाडा विषयी संपूर्ण माहिती Pimpal Tree Information In Marathi

Pimpal Tree Information In Marathi आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्व चराचरातील सृष्टीमधील प्रत्येक गोष्टीला देवत्व प्राप्त करून दिले जाते. वृक्ष देखील आपल्यासाठी देव असून, पिंपळ, वड, उंबर यांसारख्या अनेक वृक्षांना देवाचे स्वरूप मानून त्याची पूजा देखील केली जाते. त्यातीलच एक महत्त्वाचे झाड म्हणजे पिंपळाचे झाड होय.

Pimpal Tree Information In Marathi

पिंपळ झाडा विषयी संपूर्ण माहिती Pimpal Tree Information In Marathi

नागपंचमीच्या दिवशी विशेष महत्त्व असलेले हे झाड आरोग्यदायी फायद्याच्या दृष्टिकोनातून देखील फारच महत्त्वाचे आहे. या झाडाचे सर्वच अवयव अतिशय वेगाने वाढ दर्शवत असतात, त्यामुळे अल्पावधीतच मोठी सावली उत्पन्न करण्यासाठी या झाडाला ओळखले जाते.

पृथ्वीवर असणाऱ्या इतर कोणत्याही झाडापेक्षा सर्वात जास्त वेगाने ऑक्सिजन शुद्ध करण्यासाठी या पिंपळाच्या झाडाला ओळखले जाते. इतर झाडे ही काही वेळापूर्तीच ऑक्सिजन शुद्ध करत असतात, मात्र पिंपळाचे झाड अखंड २४ तास ऑक्सिजन निर्माण करत असते. व कार्बन डाय-ऑक्साइड घेत असते.

पिंपळाचे झाड आरोग्यदायी असण्याबरोबरच धार्मिक स्वरूपाचे महत्त्वाचे देखील आहे. त्याच सोबत सावलीसाठी देखील अतिशय उत्तम समजले जाते. या झाडाखाली बसूनच भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती झाली असे सांगितले जाते. त्यामुळे या झाडाला बोधी वृक्ष या नावाने देखील ओळखले जाते. आजच्या भागामध्ये आपण या पिंपळाच्या झाडाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावपिंपळ
प्रकारझाड
शास्त्रीय नावFicus religiosa
वंशफिकस
कुटुंब किंवा कुळMoraceae
किंगडमप्लांटी

पिंपळाच्या झाडाचे ऐतिहासिक माहिती:

हिंदू धर्मामध्ये खूपच पवित्र आणि आदरस्वरूप समजले जाणारे पिंपळाचे झाड अतिशय गुणकारी आहे. या झाडाच्या उत्पत्ती बद्दल अनेक मनोरंजक कथा सांगितल्या जातात.हृदयाच्या आकाराची पाने असलेले हे झाड सिंधू संस्कृतीमध्ये उगम पावले असावे असे सांगितले जाते.

ज्याचा कालखंड इसवी सन पूर्व ३००० ते इसवी सन पूर्व १७०० पर्यंत समजला जातो. सर्वप्रथम मोहनजोदारो शहराच्या उत्खननादरम्यान या झाडाचे अवशेष सापडले होते. वैदिक कालखंडामध्ये या पिंपळाच्या झाडापासून धार्मिक विधी केला जात असावा, असे देखील काही पुरावे सापडत असतात.

भगवान विष्णू यांनी राक्षस सोबत झालेल्या युद्धामध्ये लपण्याकरिता पिंपळाच्या झाडाचा आश्रय घेतला, असे देखील काही दंतकथांमध्ये सांगितले जाते, म्हणून या पिंपळ झाडामध्ये भगवान विष्णू वास करत असतात, आणि भगवान विष्णूची उपासना करण्याकरिता या पिंपळाच्या झाडाची उपसना करण्याचा सल्ला अनेक लोकांना दिला जातो.

पिंपळाचे झाड:

पिंपळाचे झाड हे अतिशय विस्तारलेल्या स्वरूपाचे वाढणारे झाड असून, उन्हाळ्यामध्ये या वृक्षाद्वारे पानगळ केली जात असते. अर्थात अर्ध सदाहरित स्वरूपाचे असणारे हे झाड अगदी विशाल काय वृक्षामध्ये कधी बदलते, हे कळत सुद्धा नाही. सुमारे ३० मीटरपर्यंत उंच वाढू शकणारे हे झाड तीन मीटर व्यासाच्या खोडाइतके वाढू शकते.

या झाडावर अनेक पक्षी आपली घरटे बनवत असतात, कारण या झाडाची सावली अतिशय उत्तम असते. मात्र उन्हाळ्यामध्ये पानगळ झाल्यानंतर या झाडाखाली सावली उपलब्ध राहत नाही.

हवामान व आयुष्यमान:

पिंपळाच्या झाडा करिता उष्ण व दमट हवामान चांगले मानवत असते. पिंपळाचे झाड कोणत्याही स्वरूपाच्या हवामानामध्ये स्वतःच वाढत असते, मात्र भारतीय उपखंडामध्ये या झाडाची वाढ अतिशय उत्तम रित्या होत असते. माती बाबतीत म्हणायचे झाल्यास पाणी धरून ठेवण्याची क्षमता उत्तम असणारी चिकन माती या झाडांसाठी अतिशय उत्तम समजली जाते. सरासरी ९०० ते १५०० वर्षे जगणारे हे झाड कधीकधी जास्तही जगते.

पिंपळाचे सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व:

संपूर्ण भारतभर सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व दिले जात असते. बौद्ध लोकांमध्ये आणि हिंदू लोकांमध्ये देखील पिंपळाचे झाड देवा समान असून, बुद्ध यांना या झाडाखाली बोधिसत्वज्ञान प्राप्त झाले होते, तर हिंदू लोक भगवान विष्णू यांचा अवतार म्हणून या वृक्षाला पूजत असतात. त्यांच्यामते भगवान विष्णूची उपासना म्हणजेच पिंपळ वृक्षाची उपासना करणे होय.

पिंपळाचे झाडाचे फायदे:

पिंपळाचे झाड आरोग्य दृष्ट्या अनेक स्वरूपाने फायदेशीर असून, या झाडाच्या सालीपासून दम्यावर आधारित औषधे बनवली जाऊ शकतात. त्याचबरोबर शरीराला खाज येणे, त्वचेचा रंग सुधारणे, टाचांच्या भेगा, अतिसार इत्यादी अनेक समस्यांकरिता पिंपळाच्या झाडाच्या विविध भागांचा वापर केला जातो.

पिंपळझाडाबद्दल काही तथ्य माहिती:

  • पिंपळाचे झाड हिंदू व बौद्ध धर्माबरोबरच जैन धर्म लोकांद्वारे देखील पुजले जाते.
  • कोणत्याही ठिकाणी तग धरण्यासाठी व उगण्यासाठी हे झाड ओळखले जाते. अगदी इमारतीच्या छोट्या भेगेमध्ये किंवा खडकावर देखील हे झाड सहजतेने उगत असते.
  • सर्वात जास्त प्रमाणावर कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेण्याबरोबरच ऑक्सिजन सोडण्यासाठी हे झाड ओळखले जाते.
  • याची हृदयाच्या आकाराची पाने अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतात, ज्यांचा वापर चित्रकलेसाठी देखील केला जाऊ शकतो.
  • हिंदू धर्मानुसार पिंपळाचे झाड म्हणजे साक्षात भगवान विष्णू यांचा अवतार आहे, असे समजले जाते व त्याची पूजा केली जाते.

निष्कर्ष:

भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले झाड म्हणून पिंपळाच्या झाडाला ओळखले जाते. अगदी अलीकडेच काळामध्ये बुद्ध यांनी या झाडाखाली बसून ज्ञानाची प्राप्ती केली असे देखील सांगितले जाते. त्यामुळे याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जात असते.

धार्मिक महत्त्व असले, तरी देखील आरोग्याच्या दृष्टीने देखील फारच उपयुक्त असणारे हे झाड सावली देण्यासाठी देखील फार उत्तम असते. या झाडाच्या विविध घटकांचा वापर करून त्वचारोग, बद्धकोष्ठता, किडनी रोग, दमा, गोवर, कांजण्या, नपुंसकत्व, यांसारखे आजारावर इलाज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर सापांनी चावल्यास देखील या झाडाचा मोठा वापर केला जात असतो.

पतंजली आयुर्वेद या कंपनीच्या माहितीनुसार पिंपळाचे झाड फायदेशीर घटकांनी प्रचंड भरलेले असते. त्यामुळे त्याला औषधी महत्त्व प्राप्त होत असते. या झाडापासून निर्माण होणाऱ्या फांद्या, पाने, साल, फळे, बिया, यासारख्या प्रत्येक घटकांमध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात.

जेणेकरून वेगवेगळ्या स्वरूपाचे रोग बरे केले जाऊ शकतात. आज आपण पिंपळाबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ज्यामध्ये त्याचे महत्त्व व फायदे, विविध आजारांवर पिंपळाच्या झाडाचा केला जाणारा उपाय, त्वचारोग आणि वंध्यत्व यासाठी पिंपळाचे झाड कसे वापरावे, या पिंपळ झाडापासून बनवण्यात आलेली विविध औषधे, त्याचे उपयोग, आयुर्वेदामध्ये पिंपळ झाडाचे विशद केलेले महत्त्व, आणि अलीकडील काळामध्ये देखील विविध आयुर्वेदिक कंपन्या द्वारे पिंपळाच्या झाडाची मोठी मागणी, याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. सोबतच पिंपळाच्या झाडाबद्दल असलेली काही तथ्य माहिती देखील बघितली आहे…

FAQ

पिंपळाच्या झाडाला शास्त्रीय भाषेमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

पिंपळाच्या झाडाला शास्त्रीय भाषेमध्ये फिकस रेलीजिओसा या नावाने ओळखले जाते.

पिंपळाच्या कोणकोणत्या अवयवांमध्ये किंवा झाडाच्या भागांमध्ये औषधी गुणधर्म असतात?

पिंपळाचे सर्वच झाड आरोग्यदायी गुणधर्माचे असून, याच्या फांद्या, साल, पाने इत्यादी सर्वच अवयवांमध्ये औषधी गुणधर्म आढळून येत असतात.

पिंपळाचे झाड कोणकोणत्या फायद्यांनी युक्त असे आहे?

पिंपळाच्या झाडापासून अनेक प्रकारचे फायदे होतात, ज्यामध्ये हृदयविकार बरा करणे, सर्दी खोकला घालविणे, दम्यावर उपचार, खोकला मध्ये उपयोग, दातांचे आरोग्य सुधारणे, कावीळ बरी करणे, नागिन खरुज यांसारख्या आजारांना दूर ठेवणे, आणि पोटाच्या अवयवांसाठी वापर करणे इत्यादी अनेक वापर आहेत.

पिंपळाच्या पानाबद्दल काय खास वैशिष्ट्ये सांगता येईल?

पिंपळाची पाने अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून, ही पाने जपून ठेवले असता त्याच्या केवळ शिरा उरत असतात. या शिरा विविध रंगांनी रंगवून ही पाने जपून ठेवली जातात.

पिंपळाचे झाड सरासरी किती आयुष्य जगू शकते?

पिंपळ हे अतिशय जास्त कालावधीसाठी जगणारे झाड असून, साधारणपणे ९०० ते १५०० वर्षांपर्यंत हे झाड जगत असते. मात्र काही झाडांचे आयुष्य तीन हजार वर्षांपर्यंत देखील नोंदवले जाते.

Leave a Comment