Panhala Fort Information In Marathi महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्याच्या पश्चिम दिशेला अवघ्या २० किलोमीटर अंतरावर प्रवास केल्यास एक सह्याद्रीच्या कुशीत वसलेला उत्तम किल्ला आढळून येतो, पन्हाळा असे त्याचे नाव. विजापूर पासून महाराष्ट्राच्या मध्यभागामध्ये व्यापारी मार्ग या पन्हाळा किल्ला मार्गे जात असे.
पन्हाळा किल्ल्याची संपूर्ण माहिती Panhala Fort Information In Marathi
हा किल्ला अतिशय मोक्याच्या जागी असल्यामुळे या किल्ल्यासाठी अनेक लोक नेहमी युद्ध करत असत. अनेक वेळा मोगल, मराठी, ब्रिटिश, इंडिया कंपनीसह अनेक लोकांनी या किल्ल्यासाठी युद्ध केलेले आहेत.
पावनखिंडीच्या लढाईसाठी ओळखला जाणारा हा किल्ला अतिशय भक्कम स्वरूपाचा असून, महाराणी ताराबाई यांनी देखील या ठिकाणावरून आपला राज्यकारभार चालवला होता. या किल्ल्याला सापांचा किल्ला या नावाने देखील संबोधले जाते. एक ऐतिहासिक ठिकाण असल्याबरोबरच कोल्हापूरमधील थंड हवेचे ठिकाण म्हणून देखील या पन्हाळ्याला ओळखले जाते.
समुद्रसपाटीपासून सुमारे ८४५ मीटर उंच असल्यामुळे, येथे अतिशय थंड हवा अनुभवायला मिळत असते. सुमारे सव्वा सात किलोमीटरच्या परिक्षेत्रात विस्तारलेला हा किल्ला अतिशय सुंदर असून, पावसाळ्यामध्ये येते अतिशय हिरवेगार वातावरण तयार होत असते.
या किल्ल्याच्या बांधकामाबद्दल हे क्वचित माहिती उपलब्ध नसली, तरी देखील काही शिलालेखांच्या आधारे शिलाहार राजाची दुसरी राजधानी म्हणून या किल्ल्याचा उल्लेख केला जातो. या किल्ल्यावर अगदी यादव राजवटी पासून बहमणी राजे, आदिलशाही, मोगल शाही, मराठीशाही, इत्यादी लोकांनी राज्य केलेले आहे. शेवटी हा किल्ला मराठा साम्राज्याच्या ताब्यामध्ये होता.
नाव | पन्हाळा |
प्रकार | किल्ला |
ठिकाण | कोल्हापूर, महाराष्ट्र |
बांधकाम वर्ष | अंदाजे ११७८ ते १२०९ |
स्थापक | शिलाहार राजा भोज दुसरा |
प्रसिद्ध | पावन खिंड ची लढाई |
उंची | समुद्र सपाटीपासून ८४५ मीटर |
परिक्षेत्र | सव्वा सात किलोमीटर |
सध्या मालकी | भारत सरकार |
प्रकार | गिरीदुर्ग |
सत्ता | मराठा, यादव, शिलाहार, मोगल, विजापूर |
काही उपलब्ध शिलालेख आणि ताम्रपटांच्या संदर्भानुसार ११७८ ते १२०९ या कालावधीच्या दरम्यान शिलाहार येथील राजा भोज द्वितीय यांनी सुमारे १५ किल्ल्यांचे बांधकाम केले होते. त्यातीलच एक किल्ला म्हणून पन्हाळा किल्ला ओळखला जातो. या किल्ल्यामध्ये विशालगड देखील सामील असावा असे सांगितले जाते.
ज्यावेळी विजापूरच्या आदिलशाहीमध्ये हा किल्ला होता, तेव्हा समुद्रकिनाऱ्यापासून विजापूर पर्यंत जाणाऱ्या मार्गावर चौकीच्या स्वरूपात हा किल्ला फार महत्त्वाचा ठरत होता. अनेक राजवटींच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हस्तगत करून अनेक वर्ष स्वराज्यामध्ये ठेवला होता. जवळपास २० वर्षांच्या कालावधीमध्ये या किल्ल्याने स्वराज्याचे फार मोठे संरक्षण केले आहे.
पन्हाळगड किल्ल्यावरील महत्त्वपूर्ण वास्तू:
पन्हाळगड किल्ला बघायला गेल्यानंतर तिथे अनेक प्रकारच्या इतरही वास्तू दिसून येतात. मोराच्या विविध स्मारकांनी सज्ज असलेला हा किल्ला विजापूरच्या स्थापत्य कलेमध्ये बांधला आहे, असे देखील सांगितले जाते. या ठिकाणी अनेक बघण्यासारखे ठिकाणे असून, अंधार बावडी ही तीन मजल्यांची विहीर खूपच अप्रतिम अशी आहे.
त्याचबरोबर येथे राजवाडा, धान्य कोठार, अंबरखाना, कलावंतीचा राजवाडा, विविध दरवाजे, सजावटीचे खोली, राजदिंडी यांसारखे अनेक ठिकाण बघितले जाऊ शकतात.
पन्हाळा किल्ल्यावर जाताना घ्यावयाची काळजी:
पन्हाळा हा किल्ला थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे, येथे नेहमी उपदार कपडे घालूनच ट्रेकिंग साठी तयार व्हायला हवे.
हा किल्ला बघताना एक तासापेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. परिणामी तुम्हाला मध्ये भूक किंवा तहान लागत असेल तर सोबत एक पाण्याची बाटली आणि खाण्यासाठी थोडेसे अन्न घेणे गरजेचे ठरते.
हा किल्ला अतिशय आकर्षक आहे. त्यामुळे येथील अनेक दृश्य बघणाऱ्याला मंत्रमुग्ध करत असतात. त्यामुळे या प्रवासामध्ये सोबत कॅमेरा बाळगणे खूपच गरजेचे ठरते.
पन्हाळा किल्ला बघण्यासाठी विशिष्ट वेळा ठरवलेल्या आहेत. त्यामुळे त्या योग्य वेळेतच तुम्ही किल्ल्यावर भेट दिली पाहिजे. त्याचबरोबर लवकरात लवकर माघारी देखील यायला हवे. हा कालावधी सूर्य उगवे पासून संध्याकाळी सूर्यमावळेपर्यंत असतो.
पन्हाळा किल्ल्याच्या परिक्षेत्रात असणारी मनोरंजक ठिकाणे:
एका सहलीमध्ये केवळ एकच ठिकाण फिरणे असे कोणी करत नाही. त्यामुळे पन्हाळा किल्ल्याच्या सहलीला जात असाल, तर आजूबाजूच्या अनेक ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. ज्यामध्ये रामतीर्थ धबधबा, दाजीपूर अभयारण्य, छत्रपती शाहू महाराज संग्रहालय, महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा मंदिर, रंकाळा तलाव, कळंबा तलाव, आणि डी वाय पी सिटी मॉल इत्यादी अतिशय उत्कृष्ट फिरण्यासारखी ठिकाणे आहेत. त्यामुळे तुमच्या आनंदात नक्कीच भर पडेल.
पन्हाळा किल्ल्यावर जाताना:
प्रत्येक जागेचे काहीतरी खास वैशिष्ट्य असते, आणि एका विशिष्ट वेळेतच तेथे भेट दिली तर अधिक आनंद प्राप्त करून घेता येऊ शकतो. पन्हाळा किल्ल्यावर भेट देण्यासाठी विशिष्ट अशी वेळ नसली, तरी देखील ऑक्टोबर पासून मार्च महिन्यापर्यंत या ठिकाणी भेट दिल्यास येथील हवामान तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकते.
येथे जाण्याकरिता कोल्हापूर पासून तुम्ही टॅक्सी किंवा बसचा पर्याय निवडू शकता. किंवा स्वतःच्या वाहनाने देखील येथे पोहोचू शकता. मात्र त्यासाठी कोल्हापूरपर्यंत तुम्हाला रेल्वे किंवा रस्ता मार्गाने पोहोचावे लागेल. तुम्हाला विमान प्रवासाने येथे पोहोचायचे असेल तर सर्वात जवळील विमानतळ म्हणून पुणे विमानतळाला ओळखले जाते. मात्र हे देखील खूपच लांब आहे.
निष्कर्ष:
महाराष्ट्र मध्ये अनेक किल्ले बघायला मिळतात. यातील काही किल्ले सर्वसाधारण नसले, तरी देखील बलाढ्य किल्ल्यांमध्ये मोजकेच किल्ल्यांचा समावेश होतो. मराठा साम्राज्यांमध्ये दीर्घकाळ सेवा बजावणारा किल्ला म्हणून पन्हाळा किल्ल्याला ओळखले जाते.
महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या स्थित असणारा हा किल्ला मराठ्यांनी अनेक वर्ष निकराने लढला होता. या किल्ल्याला ताब्यात घेण्यासाठी अनेक राजवटींनी फार प्रयत्न केलेले असून, मराठ्यांनी सर्व प्रसिद्ध अशी पावनखिंडची लढाई करून हा किल्ला वाचावला होता.
त्यामुळे गनिमी फारच संतापले होते, परिणामी बाजीप्रभू देशपांडे यांना आपल्या प्राण्याची आहुती द्यावी लागली होती. समुद्रसपाटीपासून उंचीवर असल्यामुळे येथे नेहमी थंड हवेचे वारे वाहत असतात. एक ऐतिहासिक स्थळ असल्याबरोबरच ट्रेकिंग साठी ओळखले जाणाऱ्या पन्हाळा किल्ल्याबद्दल आज आपण माहिती बघितली आहे.
त्यामध्ये या किल्ल्याचा इतिहास, या किल्ल्यावर असणाऱ्या विविध महत्त्वाच्या वास्तू, किल्ला उघडण्याची व बंद होण्याची योग्य वेळ, आसपास असणारी काही बघण्यासारखे ठिकाणे, किल्ल्याला भेट देण्याची उत्तमोत्तम वेळ, भेट देण्याचे रस्ते व येथील काही नियम, सोबतच पन्हाळा किल्ल्याबद्दल मनोरंजक माहिती या गोष्टी बघितलेल्या आहेत.
FAQ
पन्हाळा हा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये वसलेला आहे?
पन्हाळा हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वसलेला एक उत्तम किल्ला आहे. आणि तो कोल्हापूरच्या पश्चिम दिशेला अवघ्या २० किलोमीटर अंतरावर आहे.
पन्हाळा किल्ला कोणत्या घटनेसाठी सर्व प्रसिद्ध समजला जातो?
पन्हाळा किल्ला अनेक वर्ष मराठा साम्राज्याच्या ताब्यामध्ये होता. त्या किल्ल्यावर गणिमांनी हल्ला केल्यानंतर तेथून छत्रपती शिवाजी महाराज कसे निसटले, याचा प्रसंग सांगणारे पावनखिंडीचे युद्ध, आणि यामध्ये शिवाजी महाराजांचे रूप घेतलेल्या मावळ्याबद्दलच्या घटनेसाठी हा किल्ला सुप्रसिद्ध आहे.
पन्हाळा किल्ला समुद्रसपाटीपासून साधारणपणे किती उंचीवर वसलेला आहे?
पन्हाळा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ८४५ मीटर उंचीवर वसलेला आहे, त्यामुळेच येथे नेहमी थंड वारे वाहत असते. कोल्हापुरातील थंड हवेचे ठिकाण म्हणून या ठिकाणाला ओळखले जाते.
पन्हाळा या किल्ल्याचा साधारण घेर किती किलोमीटरचा आहे?
पन्हाळा या किल्ल्याचा साधारण घेर हा सव्वा सात किलोमीटरचा आहे.
पन्हाळा हा किल्ला कोणी बांधला होता?
पन्हाळा हा किल्ला कोणी बांधला याबाबत स्पष्ट उल्लेख आढळत नसला, तरी देखील काही शिलालेखांच्या व ताम्रपटाच्या माध्यमातून असे आढळून येते की ११९१ ते ११९२ या दरम्यान राजा भोज द्वितीय यांनी या किल्ल्याचे बांधकाम केले असावे.