Onion Information In Marathi स्वयंपाक घरामध्ये नेहमी आढळून येणारा पदार्थ म्हणून कांद्याकडे बघितले जाते. कांद्याच्या भावामध्ये अगदी थोडासा बदल झाला तरी देखील सर्वसामान्य व्यक्तींकडून मोठा ओरड ऐकायला मिळतो. प्रत्येक भाजीमध्ये, मग ती कोरडी असो की पातळ या कांद्याचे अस्तित्व असतेच.
कांदा विषयी संपूर्ण माहिती Onion Information In Marathi
अगदी सॅलेड पासून सौंदर्य प्रसादानांमध्ये कांद्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. भारतामध्ये प्रत्येक पाककृतीमध्ये कांद्याचा थोडा तरी वापर करणे क्रमप्राप्तच ठरते. कांद्याशिवाय स्वयंपाक घर हे अगदी सुने सुने वाटत असते. कांदा हा चीन नंतर भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर उगवला जातो. अतिशय उत्कृष्ट रंग, चव व त्यामध्ये आढळणारे अनेक पौष्टिक तत्व यामुळे कांद्याला सर्व स्तरातून पसंत केले जात असते.
कापताना डोळ्यातून पाणी आणणारा हा कांदा खायला आवडत नाही, असे क्वचितच कोणी असेल. आजच्या भागामध्ये आपण सर्वांच्या प्रिय कांदा या भाजी बद्दल माहिती घेणार आहोत…
नाव | कांदा |
हिंदी नाव | प्याज |
इंग्रजी नाव | ओनियन |
शास्त्रीय नाव | एलियम सेपा |
रंग | लालसर मात्र आतून पांढरा |
किंगडम | प्लांटी |
साधारण कालावधी | चार महिने |
लागवडीचे टप्पे | नर्सरी आणि मुख्य जमीन |
कांदा देशाच्या समृद्धीचे किंवा भरभराटीचे प्रतीक म्हणून देखील ओळखला जात आहे. कांदा हा अनेक क्षेत्रांमध्ये वापरला जात असला, तरी देखील स्वयंपाक घरामध्ये त्याचा फार मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. अगदी मोठ्या प्रमाणावर साठवणूक करून देखील या कांद्यापासून उत्पादन मिळवणे सुरू झालेले आहे. सर्वप्रथम इजिप्त देशांमध्ये या कांद्याची लागवड केली गेली असे पुरावे सापडतात.
या इजिप्त मधून रशिया, युरोप, वेस्टइंडीज अमेरिका असे करत करत पाश्चात्त्य देशांमध्ये पोहोचलेला हा कांदा आज मोठ्या प्रमाणावर उत्पादित केला जात आहे. कांदाच्या उत्पादनामध्ये आज चीन हा देश आघाडीवर समजला जातो. त्या खालोखाल भारत तर पुढे रशिया, अमेरिका, आणि स्पेन यासारख्या देशांचा समावेश होतो. ज्या ठिकाणी उत्पादित झाला, त्या ठिकाणापेक्षा अनेक दूरवरच्या ठिकाणी किंबहुना इतर देशांमध्ये देखील निर्यात करून या कांद्याचा उपभोग घेतला जातो.
कांद्यामध्ये उपलब्ध पोषक तत्व:
थंड स्वरूपाचा असणारा कांदा शरीरासाठी देखील खूप फायदेशीर ठरत असतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्वे असतात. त्याचबरोबर कॅल्शियम, पोटॅशियम, झिंक, कॉपर, आयर्न, यासारखे खनिजे, सोबतच जीवनसत्व क आणि ब, फायबर, गंधकाची विविध संयुगे देखील असतात. एक कांदा खाल्ला असता त्यामधून खाणाऱ्याच्या शरीराला सुमारे २१० कॅलरी इतकी ऊर्जा प्राप्त होत असते.
कांदा वापरण्याच्या पद्धती:
कांदा उत्पादित झाल्यानंतर तो कोणत्या प्रकारचा आहे, त्यानुसार साठवायचा की लगेच वापरात आणायचा हे ठरविले जाते. शक्यतो पावसाळ्यामध्ये लागवड केल्या गेलेला कांदा हा जास्त काळ साठवून ठेवला जात नाही. साठवणूक झाल्यानंतर किंवा बाजारामधून घरी आणल्यानंतर वापरापूर्वी या कांद्याच्या वरील लाल रंगाचे आवरण काढले जाते, जे शक्यतो खाण्यामध्ये वापरात आणत नाहीत.
त्यानंतर आतील पाकळ्या उभ्या व आडव्या चिरून मोकळ्या केल्या जातात, व सॅलड किंवा विविध प्रकारच्या स्वयंपाक पदार्थांमध्ये वापरला जातो. अनेकजण ह्या कांद्याच्या बाहेरील आवरण काढून टाकत असले, तरीदेखील त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फ्लेहोनाईडस हा घटक आढळून येतो. जो शरीरासाठी फायदेशीर समजला जातो.
अनेक ठिकाणी या कांद्यापासून सॅलड बनवले जाते, तर काही ठिकाणी जास्त प्रमाणात शिजवून त्याचे सूप देखील बनवले जाते. हे सूप खूपच पौष्टिक स्वरूपाचे असते. त्याचबरोबर कांद्यापासून बारीक पावडर करून मसाला देखील बनवला जात असतो. कांदा खाण्याचा अनेक पद्धती असल्या, तरी देखील सॅलड स्वरूपात खाल्लेला कांदा शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतो असे सांगितले जाते. कारण तो कुठल्याही प्रक्रिया विना कच्चा शरीरामध्ये जात असतो.
कांद्यापासून शरीराला मिळणारे विविध फायदे:
कांदा सेवनाने आरोग्यदायी अनेक फायदे दिसून येत असतात, ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होणे, हृदयाच्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊन हृदय रोगाचा धोका कमी करणे, मधुमेही व्यक्तींना शरीरातील किंवा रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यास मदत करणे, विविध प्रकारच्या मच्छरांपासून शरीराचे संरक्षण करणे, कर्करोगावर उपचार करणे, कानदुखी मध्ये फायदेशीर, त्वचा, केस यांच्या आरोग्यासाठी, तसेच खोकल्यासाठी उपयुक्त ठरणे, इत्यादी फायदे सांगितले जातात.
त्याचबरोबर कांदा सेवनामुळे ॲनिमिया हा आजार देखील बरा केला जातो, कारण कांद्यामध्ये असणारे लोह या आजारामध्ये खूपच फायदेशीर ठरत असते. पोट दुखी मध्ये देखील कांदा वापरण्याचा सल्ला दिला जातो.
कांदा सेवनापासून होणारे विविध प्रकारचे नुकसान:
अतिप्रमाणात कांदा खाल्ला तरीदेखील तोटा होऊ शकतो. त्यामध्ये उलटी होणे, त्वचेवर जळजळ दिसणे, मुरूम किंवा पुरळ येणे, स्तनदा मातांच्या दुधामध्ये कांद्याचा स्वाद उतरणे, पोटामध्ये जळजळ जाणवने, डोळ्यांना पाणी सुटणे, रक्तदाब अनियंत्रित होणे, इत्यादी प्रकारचे नुकसान किंवा तोटे देखील होऊ शकतात.
कांद्याच्या विविध जाती:
कांदा लागवड करण्यासाठी विविध प्रकारच्या जाती वापरल्या जातात, ज्यामध्ये बसवंत ७८०, पुसा रेड, फुले समर्थ, अरका निकेतन, अरका कल्याण, ॲग्री फाउंड डार्क रेड यांसारख्या सुधारित जाती वापरण्याचा सल्ला दिला जातो.
कांदा पिकावर येणाऱ्या रोग व किडी:
कांदा हे पीक अनेक प्रकारच्या रोग व किडींना बळी पडत असते. त्यामध्ये फुल किडे, कोळी, पांढरी माशी, यांसारख्या किडी तर करपा भुरी यांसारख्या रोगांचा समावेश होतो. मुख्यत्वे कांद्यावर रस शोषणाऱ्या किडी, आणि बुरशीजन्य रोग मोठ्या प्रमाणावर आढळून येत असतात.
निष्कर्ष:
भारतीय जेवणामध्ये अनेक प्रकारच्या विविधता आपल्याला बघायला मिळत असतात. भारत हा मसालेदार आणि चवदार खाण्यासाठी ओळखला जातो. प्रत्येक राज्यानुसार भोजनाचे वेगवेगळ्या प्रकाराचे वेगवेगळे स्वरूप आपल्याला बघायला मिळते.
मात्र प्रत्येक राज्यांमध्ये समानता असलेला घटक म्हणजे कांदा होय. प्रत्येक राज्याचे भोजनामध्ये मुख्यत्वे कांद्याचा समावेश हा असतोच. काही गोड पदार्थ सोडले असता अनेक पदार्थांमध्ये कांदा आवर्जून वापरला जातो. कांदा हा जणूकाही स्वयंपाक घराचा पाया आहे, कारण त्याशिवाय स्वयंपाकाला रंगत व लज्जत येत नाही.
आज आपण या कांदा पिकाबद्दल माहिती बघितली आहे. यामध्ये कांद्याचा इतिहास, कांद्यामध्ये असणारे विविध पोषक द्रव्य, कांद्याचा वापर, कांद्यापासून होणारे शारीरिक व आरोग्यदायी फायदे, तसेच त्यापासून होणारे विविध प्रकारचे नुकसान, कांदा खाण्यात वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती, आणि काही प्रश्न इत्यादी माहिती जाणून घेतलेली आहे…
FAQ
कांद्याला कोणकोणत्या विविध नावांनी ओळखले जाते?
कांद्याला हिंदी भाषेमध्ये प्याज, इंग्रजी भाषेमध्ये ओनियन, तर शास्त्रीय भाषेमध्ये एलियम सेपा या नावाने ओळखले जाते.
कांद्याचा रंग साधारणपणे कसा असतो?
कांदा हा शक्यतो लालसर गुलाबी रंगांमध्ये आढळून येतो, मात्र काही कांदे हे पांढऱ्या रंगाचे देखील असतात. संपूर्ण कांदे हे आतून पांढऱ्या रंगाचे असतात.
कांद्याचे उगम कोणत्या देशातील समजले जाते?
कांद्याचे उगम हे इजिप्त या देशातील असल्याचे समजले जाते.
इजिप्त मधून संपूर्ण जगभरात कांद्याचा प्रसार कशा रीतीने झाला?
हा कांदा इजिप्तमधून आशिया व युरोप या खंडांमध्ये आला, या ठिकाणी खऱ्या अर्थाने कांद्याला लोकप्रियता प्राप्त झाली. आणि याचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. पुढे युरोपमधून वेस्टइंडीज या ठिकाणी कांद्याने प्रवेश करत, अमेरिकेमध्ये आपले स्थान देखील निर्माण केले.
सर्वात जास्त कांदा उत्पादक देशांमध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश होतो?
सर्वात जास्त कांदा उत्पादक देशांमध्ये रशिया, भारत, अमेरिका, चीन आणि स्पेन यांसारख्या देशांचा समावेश होतो.