ओडिसा राज्याची संपूर्ण माहिती Odisha State Information In Marathi

Odisha State Information In Marathi भारत हा अनेक राज्यांमध्ये विभागला असला तरी देखील या सर्व राज्यांना एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य केंद्र सरकार द्वारे केले जात असते. पूर्वीच्या काळी ओरिसा या नावाने प्रसिद्ध असलेले भारतातील एक राज्य हल्ली ओडिसा या नावाने ओळखले जाते. भारताच्या ईशान्य भागामध्ये वसलेल्या सात राज्यांमध्ये पोलिसा राज्याचा समावेश होतो.

Odisha State Information In Marathi

ओडिसा राज्याची संपूर्ण माहिती Odisha State Information In Marathi

बंगालच्या उपसागराच्या काठावर असलेले हे राज्य छत्तीसगड जवळ असून अतिशय निसर्ग सौंदर्याने मढलेले हे राज्य खूपच सुंदर आहे. अनेक लोक पर्यटनासाठी या ओडिसा राज्याचा समावेश करत असतात आणि ऐतिहासिक मंदिरे असणारे हे राज्य सर्वात मनोरंजक व आश्चर्यकारक राज्य आहे.

मुख्यतः ग्रामीण लोकसंख्या जास्त असलेले राज्य आजकाल औद्योगीकरण क्षेत्रामध्ये देखील मोठी प्रगती करत आहे. या ओडिसा राज्याची राजधानी म्हणून भुवनेश्वर शहराला ओळखले जाते. येथे कोणार्क स्वर्ण मंदिर असून जगन्नाथ पुरी हे प्रसिद्ध देवस्थान देखील याच राज्यामध्ये वसलेले आहे.

आजच्या भागामध्ये आपण या उत्कृष्ट पर्यटन राज्य असण्याबरोबरच मोहक निसर्ग सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या परिसराचा म्हणजे ओडिसा राज्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. सोबतच येथील काही पर्यटन स्थळांबद्दल देखील माहिती बघणार असून भात शेती बद्दल तथ्य जाणून घेणार आहोत.

नावओडिसा
प्रकारराज्य
राजधानीभुवनेश्वर
अधिकृत राज्यभाषाओरिया
स्थापना दिन१ एप्रिल १९३६
साधारण क्षेत्रफळ१.५५ लाख चौरस किलोमीटर
मुख्य शहरांची नावेकटक, भद्रक, भुवनेश्वर, बालासोर व संबळपूर.
पर्यटन स्थळेभुवनेश्वर, कोणार्क सुवर्ण मंदिर, जगन्नाथ पुरी मंदिर आणि चिल्का सरोवर.

ओडिसा राज्याबद्दल ऐतिहासिक माहिती:

ऐतिहासिक काळामध्ये कलिंग या नावाने ओळखले जाणारे ओडिसा राज्य अतिशय पूर्वीपासून अस्तित्वात असून अनेक प्राचीन साहित्यामध्ये व महाकाव्यांमध्ये देखील त्याचा उल्लेख आढळून येत असतो. पौराणिक माहितीनुसार कलिंगा नावाच्या एका मुलाने येथे प्रवास केल्यामुळे या प्रदेशाला हे नाव पडले असावे.

या प्रवासादरम्यान त्यांनी येथील दर्या व पर्वत बघितले त्यामुळे तो अतिशय प्रभावी झाला व तो येथेच स्थायिक होईल असा त्याने निर्णय घेतला होता. त्याच्या नावाने या राज्याला ओळखले जात असे. येथे सम्राट अशोक यांनी देखील मोठे राज्य केलेले असून येथे त्यांनी एक खडक स्तंभ देखील बनवलेला आहे.

मंदिरांचे राज्य म्हणून ओळखले जाणारे ओडिसा सोळाव्या शतकानंतर मुस्लिम राजवटीच्या ताब्यामध्ये गेले होते, त्यामुळे मुस्लिम लोकांनी येथे जवळपास ७००० मंदिरांची नासधूस करून मंदिरांना नष्ट केले होते, तरी देखील येथे आज मोठ्या प्रमाणावर मंदिरे आढळून येत असतात. त्यानंतर येथे १८०३ मध्ये ब्रिटिशांनी ताबा दाखवत आपले राज्य सुरू केले होते.

स्वातंत्र्यानंतर मात्र या सर्व राज्यांची पुनर्रचना करण्यात आल्यामुळे याचे पूर्वीचे नाव रद्द झाले व त्याला स्थापनेवेळी पुन्हा ओरिसा या नावाने ओळखले जाऊ लागले. निर्मिती वेळी त्याचे नाव ओरिसा असे होते मात्र २०११ मध्ये त्याचे नाव बदलून पुन्हा ओडिसा असे करण्यात आले.

ओरिसा राज्यातील संस्कृती व भाषाशैली:

ओरिसा हे राज्य अनेक स्वरूपाच्या जाती-जमातींसाठी ओळखले जाते, यामध्ये जवळपास ६२ प्रकारच्या वेगवेगळ्या समुदायांचे लोक राहत असून प्रत्येक समुदायाने स्वतःची अशी विशिष्ट संस्कृती व शैली विकसित केल्यामुळे परिसर राज्यांमध्ये अतिशय मिश्र स्वरूपाची संस्कृती आढळून येत असते.

हे  एक एकात्मिक स्वरूपाचे राज्य असून येथे सर्व जाती-धर्माचे लोक अतिशय गुण्या गोविंदाने नांदताना आढळून येत आहेत. या ठिकाणी मुख्यतः ओरिया ही भाषा बोलली जात असून तिला येथील राजभाषा म्हणून दर्जा देण्यात आलेली आहे, मात्र वेगवेगळ्या समुदायांच्या वेगवेगळ्या भाषा असून वेगवेगळ्या प्रदेशानुसार देखील विविध भाषा बोलल्या जात असतात. मोठ्या प्रमाणावर बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये दुसरा क्रमांक सांभाळपुरी या भाषेचा लागतो.

ओरिसा मधील वास्तुशाली:

अनेक जगप्रसिद्ध मंदिरे या ओडिसा राज्यामध्ये आहेत, त्यांची वास्तुशैली अतिशय वेगळ्या स्वरूपाची असून येथे अतिशय बारीक व कुशल कामाकरिता बांधकामे ओळखली जातात. येथे कलाकुसर करणाऱ्या अनेक लोकांची संख्या असून येथे सोना किंवा चांदी या धातूंवर उत्कृष्ट वायर वर्क केले जाते, ही येथील खासियत असूनही त्या कलेला फिलग्री या नावाने ओळखले जाते.

ओडिसा राज्याबद्दल मनोरंजक तथ्य:

  • ओडिसा हे राज्य अतिशय निसर्ग सौंदर्याने नटलेले असून समुद्रकिनाऱ्यासाठी देखील ओळखले जाते.
  • या राज्यामध्ये हाताने साड्या विणण्याचा मोठा उद्योग असून येथील संभल व इक्कत यातून या प्रदेशांमध्ये हा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो.
  • ओडिसा राज्यामध्ये एक लुप्त नदी असून तिचे नाव तलसारी असे आहे.
  • भारतातील बालमजुरी पूर्णपणे मिटवणारे शहर म्हणून ओडिसा येथील शहराचा उल्लेख केला जातो. येथे कोणत्याही अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतले जात नाही.
  • ओडिसा राज्यामध्ये एक हनुमान वाटिका नावाचे ठिकाण असून येथे श्रीमान हनुमान यांची फार मोठी व उंच मूर्ती बसवण्यात आलेली आहे.
  • ओडिसा या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध समुदाय एकत्र नांदताना आढळतात.

निष्कर्ष:

भारतामधील अनेक राज्यांचे आपले स्वतःचे असे वेगळे वैशिष्ट्ये असते. अतिशय आकर्षक निसर्ग सौंदर्याने नटलेले अनेक राज्य भारतामध्ये असून किनारपट्टीवरील राज्य निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत अधिकच समृद्ध समजले जातात. निसर्ग दृश्य आणि सुंदर मंदिरांसाठी ओळखले जाणारे हे ओडिसा राज्य मुख्यतः ग्रामीण लोकसंख्येने वाढलेले असले तरी देखील हल्ली येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण होत आहे, त्यामुळे या राज्याला प्रगतीपथावर राहण्यास मदत मिळाली आहे.

त्याचबरोबर येथे पर्यटन हा व्यवसाय मोठ्या जोमाने सुरू असून अनेक लोकांचे उदरनिर्वाह या पर्यटन व्यवसायावर चालत असतात. येथे जगन्नाथ पुरी व कोणार्कचे सुवर्ण मंदिर अतिशय प्रसिद्ध असून हे येथे दर वर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात, ज्या आधारावर ओडिसा राज्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर फिरत असते.

आजच्या भागामध्ये आपण याच ओडिसा राज्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतलेली असून या ओडिसा राज्याच्या स्थापनेसह त्याचा इतिहास, विविध प्रकारची संस्कृती, तिच्या मुख्य व प्राथमिक भाषा, या ओडिसा राज्यामध्ये आढळणारे विविध हंगामी सण, केले जाणारे नृत्य, इथल्या वास्तुशैलीचा प्रकार, सोबतच येथे फिरण्यासारखी महत्त्वाची ठिकाणे आणि येथील तीर्थक्षेत्र याबद्दल माहिती बघितली आहे, त्याचबरोबर ओडिसा राज्याबद्दल असणारे काही मनोरंजक तथ्य देखील जाणून घेतलेले आहे.

FAQ

ओडिसा राज्याची राजधानी कोणत्या शहराला ओळखले जाते त्याचबरोबर येथील सद्यस्थितीमध्ये असणारे राज्यपाल कोण आहेत?

ओडिसा या राज्याची राजधानी म्हणून भुवनेश्वर या ठिकाणाला किंवा शहराला ओळखले जाते तसेच येथील राज्यपालाचे नाव गणेश लाल असे आहे.

ओडिसा राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती समजले जाते?

ओडिसा राज्याचे एकूण क्षेत्रफळ १.५५ लाख चौरस किलोमीटर इतके आहे.

ओडिसा या राज्याला कोणकोणत्या राज्यांची सीमा लाभलेली आहे किंवा जवळील राज्य कोणती आहेत?

ओडिसा या राज्याजवळ सुमारे पाच राज्य असून त्यांची नावे झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा अशी आहेत.

ओडिसा राज्यामध्ये पर्यटनासाठी गेल्यानंतर येथील कोणत्या प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली पाहिजे?

दरवर्षी लाखो पर्यटकांना मनोरंजन पुरवणारे ओडिसा राज्य अनेक पर्यटन स्थळांनी संपन्न असून येथे कोणार्क सुवर्ण मंदिर, जगन्नाथ पुरी मंदिर, संभळगड आणि राहुरकेला इत्यादी स्वरूपाची उत्कृष्ट प्रेक्षणीय स्थळे आहेत.

ओडिसा राज्याचे वैशिष्ट्य काय सांगता येईल?

ओडिसा राज्य हे समुद्रकिनारी वसलेले असून बंगालच्या उपसागराची अतिशय संपन्न किनारपट्टी या राज्याला लाभलेली आहे, त्याचबरोबर हे राज्य निसर्गसौंदर्याच्या दृष्टीने  देखील प्रसिद्ध आहे.

Leave a Comment