एन एस एस विषयी संपूर्ण माहिती NSS Information In Marathi

NSS Information In Marathi सेवा म्हटलं की आपल्याला संत तुकडोजी महाराज, विनोबा भावे, गाडगेबाबा यांसारखे संत आठवतात. या लोकांनी आपली संपूर्ण हयात समाजाच्या सेवेकरिता व्यतित करून सेवा क्षेत्राला फार मोठे पाठबळ दिलेले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील सेवा करता यावी, तसेच त्यांना सेवेचे मूल्य समजून त्यांनी याबाबत जागरूक व्हावे याकरिता एक कार्यक्रम राबविला आहे.

NSS Information In Marathi

एन एस एस विषयी संपूर्ण माहिती NSS Information In Marathi

ज्याला राष्ट्रीय सेवा योजना किंवा एनएसएस म्हणून ओळखले जाते. त्याचे संपूर्ण स्वरूप नॅशनल सर्विस स्कीम असे असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्याकरिता त्या योजनेचा पाया घातला गेलेला आहे. या योजनेच्या निर्मितीमध्ये दौलतसिंग कोठारी, सर्वपल्ली राधाकृष्णन, सीडी देशमुख, पंडित जवाहरलाल नेहरू, व्ही के आर व्ही राव, के जी सय्यदिन इत्यादी महत्त्वाच्या नेत्यांचा मोठा वाटा आहे.

सेवा क्षेत्रामुळे भारताला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले जाऊ शकते, हा मानस ठेऊन या योजनेची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्या योजनेच्या निर्मितीचा दिनांक २४ सप्टेंबर १९६९ हा होता. त्यावेळी अवघ्या ३७ विद्यापीठांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. आजच्या भागामध्ये आपण एनएसएस अर्थात राष्ट्रीय सेवा योजनेबद्दल माहिती घेणार आहोत…

नावएन एस एस
मराठी नावराष्ट्रीय सेवा योजना
संपूर्ण स्वरूप नॅशनल सर्व्हिस स्कीम
स्थापना२४ सप्टेंबर १९६९
उद्देशमहाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये सेवेचे महत्त्व रुजविणे
सहभागीमहाविद्यालयीन विद्यार्थी

भारत सरकारच्या अधिपत्याखाली एन एस एस या कार्यक्रमाचे आयोजन व संचलन केले जाते. त्यासाठी भारतातील युवा व्यवहार आणि क्रीडा विभाग कार्य बघत असतो. एक सदृढ राज्य निर्माण करणे, आणि समाजाला विकसित करणे ही भावना मनामध्ये ठेवून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. तिची स्थापना २४ सप्टेंबर १९६९ या दिवशी करण्यात आली होती.

एन एस एस म्हणजे नेमके काय:

भारतीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय यांनी चालवलेली एक सार्वजनिक योजना किंवा सार्वजनिक रित्या सेवेसाठी आखलेला कार्यक्रम म्हणून एन एस एस ओळखले जाते. महात्मा गांधी यांचा जन्मशताब्दी वर्ष असताना ही योजना सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सेवेचे महत्त्व समजण्याबरोबरच त्यांना व्यक्तिमत्व विकास करण्यामध्ये देखील फार मोलाची मदत मिळत आहे.

ही एक ऐच्छिक प्रकारची योजना असून, यामध्ये अनेक तरुण स्वयं प्रेरणेने सहभागी होत आहेत. सुरुवातीला योजनेची सुरुवात करताना ही योजना प्रायोगिक तत्त्वावर अवघ्या ३७ विद्यापीठांमध्ये अवलंबली गेली होती. ज्या अंतर्गत ४०,००० विद्यार्थ्यांना सर्वप्रथम सहभागी करून घेतले गेले.

एन एस एस अंतर्गत असणारे स्काऊट गाईड:

एन एस एस च्या अंतर्गत स्काऊट गाईड हा देखील प्रयोग राबिवला जातो. या अंतर्गत निवडणुकीदरम्यान फार महत्त्वाची भूमिका बजावली जाते. या योजनेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी नसून, शालेय विद्यार्थी अर्थात १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी ही योजना असते.

निवडणुकीच्या कालावधीमध्ये अन्न, पाणी, विविध पेय वाटप करणे, ज्येष्ठ नागरिकांना सुसह्य अशी मदत करणे, त्याचबरोबर निवडणुकीदरम्यान कार्य करणे यासाठी स्काऊट गाईड ओळखले जाते.

राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे:

  • समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून सेवेचे बीज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे.
  • समाजातील सदस्य म्हणून प्रत्येक व्यक्तीला आधार देणे, व प्रत्येकाची काळजी करणे.
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपली समाजाप्रती असणारी जबाबदारी तसेच नागरिकांपप्रती असणारी विविध कर्तव्य याची जाणीव करून देणे.
  • समाजातील विविध समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करणे, तसेच त्या नियंत्रणात आणण्यासाठी कायमस्वरूपी काय केले जाऊ शकते याबद्दल चर्चा घडवून आणणे.
  • एकतेचा संदेश देऊन टीमवर्क केल्याने काय गोष्टी हस्तगत केल्या जाऊ शकतात याबद्दल जाणीव करून देणे.
  • रोजगार निर्मितीसाठी विविध कौशल्य आत्मसात करण्यास प्रोत्साहित करणे.
  • समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर एकात्मता राहून शांतता प्रस्थापित व्हावी याकरिता प्रशिक्षण देणे.

एन एस एस मध्ये सहभागी होण्याच्या प्रक्रिया:

महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी शाळा किंवा महाविद्यालय स्वतः या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत असतात. मात्र विद्यार्थी देखील महाविद्यालयामध्ये एनएसएस प्रमुखाला संपर्क करून स्वयंसेवक होण्यासाठी विनंती करू शकतात. या अंतर्गत तुम्हाला एकूण दोन वर्षांसाठी समाजसेवा करावी लागते, जी किमान २४० तास असली पाहिजे. यानंतर विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देखील मिळते, जे पुढील कारकीर्दीसाठी फायदेशीर ठरत असते.

एन एस एस च्या चिन्हाबद्दल माहिती:

एन एस एस याचे एक स्वतंत्र चिन्ह असून, जे कोणार्कच्या सुवर्ण मंदिरापासून प्रेरित झालेले आहे. हे रथचक्राच्या स्वरूपातील असून, त्यातील रंग लाल व जांभळा आहे. यातिल लाल रंग हा सक्रियतेचे किंवा उत्साहाचे लक्षण असून, निळा रंग दृढ निश्चय प्रतिनिधित्व इत्यादी गोष्टी सुचित करत असतो. अर्थात अतिशय सक्रियपणे समाजामध्ये जाऊन प्रतिनिधित्व करणे व समाजासाठी कार्य करणे हे या चिन्हाचे खरे उद्दिष्ट समजले जाते.

एन एस एस द्वारे विविध पुरस्कार दिले जातात, ज्यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कार, विद्यापीठ स्तरीय पुरस्कार, जिल्हा व महाविद्यालय स्तरावरील पुरस्कार इत्यादींचा समावेश होतो.

निष्कर्ष:

संत तुकडोजी महाराज तसेच गाडगेबाबा यांनी सेवा करण्याचा संदेश संपूर्ण जगामध्ये दिला होता. प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून सेवेची सुरुवात केली, तर संपूर्ण भारतातील पर्यायाने जगभरातील कोणीही दुःखी राहणार नाही. आणि यामुळेच भारताला महासत्ता होण्याकडे वाटचाल करण्यास मदत मिळेल.

मित्रांनो सेवा ही कुठल्याही क्षेत्रामध्ये केली जाऊ शकते. तसेच तिचे स्वरूप देखील वेगवेगळे असते. त्यामध्ये आर्थिक, सामाजिक, भावनिक कुठल्याही प्रकारे एकमेकांची सेवा केली जाऊ शकते. त्यामुळे समाज सदृढ आणि निकोप होण्यास व समाजाच्या वाढीस फार मदत मिळते. आजच्या भागामध्ये आपण एन एस एस या सेवेची संबंधित असलेल्या योजनेबद्दल किंवा कार्यक्रमाबद्दल माहिती घेतलेली आहे.

त्यामध्ये तुम्हाला एनएसएस चा फुल फॉर्म, एनएसएस म्हणजे काय, एन एस एस चे स्काऊट गाईड काय असते, या योजनेचे उद्दिष्टे काय आहेत, या योजनेमध्ये सामील होण्यासाठी काय केले जाऊ शकते, तसेच क्रिया योजनेचे बोधवाक्य, फॉर्म, चिन्ह, पार्श्वभूमी, इत्यादी बद्दल देखील माहिती बघितली आहे. या योजनेचा उद्देश, तसेच त्याद्वारे पुरवण्यात येणारे विविध पुरस्कार इत्यादी बद्दल सखोल माहिती बघितली आहे.

FAQ

एन एस एस चा फुल फॉर्म किंवा संपूर्ण स्वरूप काय आहे?

एन एस एस चा फुल फॉर्म अर्थात संपूर्ण स्वरूप नॅशनल सर्व्हिस स्कीम असे आहे.

एन एस एस ला मराठी मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

एन एस एस ला मराठी मध्ये राष्ट्रीय सेवा योजना या नावाने ओळखले जाते.

एन एस एस मध्ये कोण सहभागी होऊ शकते?

एन एस एस ही योजना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सेवेचे महत्त्व पेरण्याकरिता बनवण्यात आलेली आहे, त्यामुळे या योजनेमध्ये केवळ महाविद्यालयीन विद्यार्थीच सहभागी होऊ शकतात.

एन एस एस या योजनेचे बोधवाक्य म्हणून कोणत्या वाक्याला ओळखले जाते?

एन एस एस चे बोधवाक्य म्हणून नॉट मी बट यु म्हणजेच मीच नाही तर तुम्ही देखील सेवा केली पाहिजे असे आहे.

एन एस एस योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता फॉर्म कुठून भरला पाहिजे?

एन एस एस चा फॉर्म भरण्याकरिता या योजनेची एक अधिकृत शासकीय वेबसाईट किंवा संकेतस्थळ आहे, त्यावर नोंदणी करून आवश्यक माहिती भरून व लागणारी कागदपत्रे जमा करून तुम्ही यामध्ये सहभागी होऊ शकता. यासाठी तुम्हाला पन्नास रुपये शुल्क देखील देणे गरजेचे ठरते.

Leave a Comment