कडूनिंब झाडा विषयी संपूर्ण माहिती Neem Tree Information In Marathi

Neem Tree Information In Marathi कोणताही आजार असो एक गुणकारी औषधी वनस्पती म्हणून कडुलिंबाकडे बघितले जाते. अगदी सकाळी दात घासण्यापासून झोपताना कडुनिंबाचा वापर केला जातो. अतिशय उत्तम गुणधर्म असणारे हे कडुनिंबाचे झाड संस्कृत मध्ये अनिष्ट या नावाने ओळखले जाते. याचा अर्थ कधीही नष्ट न होणारे असा होतो.

Neem Tree Information In Marathi

कडूनिंब झाडा विषयी संपूर्ण माहिती Neem Tree Information In Marathi

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कडुनिंबाची झाडे आढळत असून, काही ठिकाणी त्याचे औषधी गुणधर्माकरिता लागवड देखील केली जात असते. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्व प्राप्त असणारे हे झाड अनेक औषधांमध्ये वापरले जाते.

कडुनिंबाच्या अगदी मुळापासून शेंड्यापर्यंत प्रत्येक घटकांमध्ये औषधी गुणधर्म लपलेले असून, अगदी या झाडाची पाने जरी चावून खाल्ली तरी देखील फायदेशीर ठरत असतात. कडुलिंबाच्या वृक्षांमध्ये जवळपास १३० पेक्षाही जास्त प्रकारच्या जैविक घटक आढळून येत असतात.

ज्यामुळे हे अतिशय गुणकारी व आरोग्यदायी होण्यास मदत मिळत असते. अगदी कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याची क्षमता असणारे हे कडुलिंब प्राणवायू शुद्ध करण्यामध्ये देखील फार आघाडीवर असते. दररोज कडूनिंबाच्या पानांचे सेवन करणे किंवा चावून खाणे सुचविले जाते. यामुळे शरीर निरोगी राहण्याबरोबरच शरीरामधील विविध दुर्गंधींना बाहेर काढण्यासाठी देखील मदत मिळते असे सांगितले जाते. आजच्या भागामध्ये आपण या कडूनिंब वनस्पती विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावकडुलिंब
बोली भाषेतील नावलिंब
शास्त्रीय नाव एझाडिरेक्टा इंडिका
किंगडमप्लाटी
रंगहिरवा
वापरऔषध निर्मिती
ओळखआरोग्यासाठी वनस्पती
चवकडू
फळनिंबोळी

आपल्याला जी स्वच्छ हवा किंवा प्राणवायू मिळतो, त्यामध्ये कडुलिंब या वनस्पतीचा फार मोठा वाटा आहे. कारण नेहमी वातावरण स्वच्छ करत प्राणवायू सोडण्यासाठी कडुलिंबाचे झाड ओळखले जाते. त्याचबरोबर वातावरणातील विविध जिवाणू आणि विषाणू यांना देखील स्वच्छ करण्याचे कार्य या कडुलिंब वनस्पती द्वारे केले जाते. अँटी फंगल आणि एंटीबॅक्टरियल गुणधर्म असणारे हे वृक्ष खूपच आरोग्यदायी असून, त्याला लीलाक

या नावाने देखील ओळखले जाते. अतिशय कडू असणारे हे झाड गुलमोहराच्या झाडाप्रमाणेच असते. तब्बल १८ ते २० मीटर उंच वाढू शकणारे हे कडुनिंबाचे झाड अतिशय झपाट्याने वाढत असते.  मात्र त्याच्या वाढीवर आजूबाजूच्या हवामानाचा मोठा परिणाम दिसून येत असतो.

मुख्यतः नैसर्गिक स्वरूपाने वाढणारे हे झाड अनेक ठिकाणी व्यावसायिक स्तरावर लागवड देखील केली जाते. याचा वापर विविध औषधे बनवण्यामध्ये केला जातो. त्याचबरोबर या झाडाच्या निंबोळी पासून, शेतीसाठी विविध खते व औषधे बनवली जात असतात. अतिशय कडू असणारे हे वृक्ष तेवढेच आरोग्यदायी देखील असते.

कढीपत्त्याच्या झाडाप्रमाणे एका काडीला अनेक पाने जोडलेली असतात. सावलीसाठी देखील अतिशय उत्तम समजले जाणारे हे झाड, दरवर्षी मोहोर देत असते. गुढीपाडव्याच्या या मोहराला धार्मिक महत्त्व असून, गुढीपाडव्याच्या सणांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असतो.

कडुलिंबाचे फायदे:

मानवाच्या प्रत्येक कार्यासाठी कडुनिंब अतिशय महत्त्वाचे असून, आयुर्वेद या ग्रंथांमध्ये देखील कडुलिंबाच्या वृक्षाला महत्त्व दिलेले आहे. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून झालेल्या आजारांना आटोक्यात आणण्यासाठी देखील या कडूनिंबाचा वापर केला जात असतो.

अनेक ठिकाणी असे देखील सांगितले जाते, की कर्करोगासारख्या महाकाय आजारांना देखील कडुनिंबाच्या सेवनामुळे बरे केले जाऊ शकते. ज्या रुग्णांना कर्करोग होण्याचा धोका असेल, त्यांनी दररोज कडूनिंबाची पाने चावून खाल्ल्यास हा धोका बराच प्रमाणात कमी देखील केला जाऊ शकतो? त्याचप्रमाणे कडुलिंबाच्या विविध भागांपासून अनेक उत्पादने मिळवली जातात, त्यामध्ये अगदी दात घासण्याचा ब्रशचा देखील समावेश होत असतो.

अनेक लोक सकाळी उठल्याबरोबर कडूलिंबाची पाने खात असतात, तर काही लोक अंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाची पाने वाटून टाकत असतात. यामुळे त्वचेला देखील फार मोठा फायदा होत असतो. कडूलिंबापासून बनवण्यात येणारे तेल, रस, अर्क, इत्यादींचे देखील अतिशय उत्तम फायदे असून, मोठ्या प्रमाणावर यांचा वापर केला जात असतो.

कडुलिंब वापरण्याने होणारे तोटे:

अति तेथे माती या उक्तीप्रमाणे कडुलिंबाचे अति प्रमाणात सेवन करणे देखील घातक ठरू शकते. मात्र हे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घेणेदेखील तेवढेच गरजेचे असते. अन्यथा चुकीच्या प्रमाणात कडुनिंब खाल्ल्या गेल्यास पोटाला त्रास जाणवू शकतो.

त्याचबरोबर कडुनिंबाचा रस दररोज पिल्यास आरोग्याला अपायकारक ठरू शकते. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील असेल, अशा लोकांनी कडुनिंबाचा वापर त्वचेवर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे फारच गरजेचे ठरते. अन्यथा त्वचेला इजा होण्याबरोबरच ऍलर्जीची समस्या उद्भवू शकते.

कडुनिंबाची लागवड आणि काळजी:

९०% कडुनिंबाची झाडे ही निसर्गतः शेतावर उगवत असतात, त्यामुळे त्यांना फारशी काळजी घेणे गरजेचे असत नाही. मात्र ज्यावेळी व्यावसायिक स्तरावर कडुलिंबाची लागवड केली जाते, तेव्हा प्रत्येक झाड महत्त्वाचे असते. म्हणून या झाडांना योग्यरीत्या वाढ मिळावी त्यासाठी खूपच काळजी घेणे गरजेचे असते.

लहान असेपर्यंत या वनस्पतीला पाणी दिले गेले पाहिजे. त्याचबरोबर व्यावसायिक स्वरूपावर लागवड करायची असेल तर हे झाड झपाट्याने वाढणे फायद्याचे असते. त्याकरिता काही प्रमाणावर खते देखील टाकणे गरजेचे असते. कडुलिंब हे झाड स्वतःच एक कीटकनाशक असल्यामुळे यावर शक्यतो कोणत्याही कीड किंवा रोगांचा प्रादुर्भाव होत नसला, तरी देखील खते व पाणी यांची काळजी घेणे फारच गरजेचे दिसून येते. जेणेकरून झाड नेहमी टवटवीत राहण्यास मदत मिळेल.

निष्कर्ष:

पूर्वीच्या काळी कोणालाही ताप आला, किंवा थोडेसे काही दुखायला लागले, की घरातील आजी लगेचच कडुनिंबाची आणि तुळशीची दोन-दोन पाने खायला देत असे. काही काळापुरते तोंड कडू पडले, तरी देखील यामुळे शरीरासाठी मोठा फायदा होत असे.

कारण यामध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म शरीराला निरोगी करण्यास फार महत्वाची भूमिका बजावत असत. कडुलिंबाच्या सेवनाचे फायदे अगदी आयुर्वेद ग्रंथांमध्ये देखील विशद करण्यात आलेले असून, संस्कृत भाषेमध्ये त्याला अरिष्ट या नावाने देखील ओळखले जाते.

अतिशय उत्तम आरोग्यदायी फायदे असणारे हे कडुनिंब वृक्ष भारतामध्ये सर्रास आढळून येत असते. महाराष्ट्रामध्ये तर याचे फार मोठे प्रमाण असून, प्रत्येकाच्या शेताच्या बांधावर किमान एक तरी कडुनिंबाचे झाड आपल्याला आढळून येत असते. त्यामुळे सहजतेने उपलब्ध होणारे हे झाड आरोग्यदायी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर याची अनेक ठिकाणी लागवड देखील केली जाते.

ज्याचा वापर औषध निर्मिती कंपन्या द्वारे केला जातो. आजच्या भागामध्ये आपण कडुलिंब या वनस्पती विषयी संपूर्ण माहिती बघितलेली असून, त्यामध्ये कडुलिंब वनस्पतीचे फायदे, त्याच्या बिया आणि इतर गोष्टींचा उपयोग, पानाचे, तेलाचे, फायदे, वापरण्याचे प्रमाण व पद्धत, त्याचबरोबर कडुलिंब वापराने होणारे तोटे, केसांच्या आरोग्यासाठी कडुलिंबाचे उपयोग, कडुनिंबाला बोनसाई करण्याची पद्धत, आणि कडुलिंबा वनस्पतीची काळजी इत्यादी गोष्टींवर माहिती बघितली आहे.

FAQ

कडुलिंबाच्या झाडाचे शास्त्रीय नाव काय आहे?

कडुलिंबाच्या झाडाचे शास्त्रीय नाव एझाडीरेक्टा इंडिका असे आहे.

कडुलिंबाची पाने सेवन करण्याने कोणता फायदा होतो?

रोज कडुलिंबाचे पाने सेवन केली असता कर्करोगाला दूर ठेवले जाऊ शकते.

कडूनिंबापासून कोणकोणते उत्पादने बनवली जाऊ शकतात?

कडुलिंब हे बहु गुणी वनस्पती आहे. त्यापासून कडुलिंब तेल, निंबोळी अर्क, निंबोळी पेंड, खते, औषधे, कीटकनाशके इत्यादी अनेक गोष्टी बनवल्या जाऊ शकतात.

कडुलिंबाच्या तेलामध्ये कोणते गुणधर्म आढळून येतात?

कडुनिंबाचे तेल हे जीवनसत्व आणि फॅटी ऍसिड यांनी भरपूर असल्यामुळे ते त्वचेला पोषण देण्याबरोबरच आर्द्रता प्रदान करण्याचे देखील कार्य करत असते.

कडुलिंबाच्या पानाची चव कशी असते?

कडुलिंबाच्या पानाची चव ही कडू असते, त्यातील एझाडीरेक्टा या घटकामुळे कडुलिंबाला कडू चव प्राप्त होत असते.

Leave a Comment