निसर्गाची संपूर्ण माहिती Nature Information In Marathi

Nature Information In Marathi आपल्याला एखाद्या विशिष्ट ठिकाणी थांबणे फार अल्हाददायक वाटत असते तर या उलट एखाद्या ठिकाणी आपण खूप बोर होत असतो हा परिणाम तेथे असणाऱ्या निसर्गाच्या प्रकाराचा असतो. ज्या ठिकाणी अतिशय अल्लाददायक निसर्ग असेल त्या ठिकाणी मानसाला करमत असते याउलट जेथे निसर्ग अगदीच रखरखीत असेल किंवा धूळ ऊन आणि कोरडेपणा यांनी भरलेला असेल अशा ठिकाणी माणसाला क्षणभर देखील थांबावे वाटत नाही. निसर्ग मानवासाठी देवताच्या रूपाने समजला जातो.

Nature Information In Marathi

निसर्गाची संपूर्ण माहिती Nature Information In Marathi

निसर्ग हा अगदी चराचरांमध्ये लपलेला असून ज्या ठिकाणी माणसाने हस्तक्षेप केला नाही त्या ठिकाणी निसर्ग सौंदर्य काही औरच दिसून येत असते. सौंदर्य हा निसर्गाचा मूलभूत गुणधर्म आहे त्यामुळे ज्या ठिकाणी निसर्ग चांगला भरलेला असेल त्या ठिकाणी सौंदर्याची निर्मिती आपोआपच होत असते. आजच्या भागामध्ये आपण आपल्या आसपास असणाऱ्या अल्हाददायक निसर्गाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.

आपल्या आसपास असणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीसाठी काहीतरी ठोस कारण असतेच त्याचप्रमाणे निसर्गातील प्रत्येक गोष्टीमागे कारण असल्यामुळेच आज निसर्ग इतक्या चांगल्या पद्धतीने आपल्याला आढळून येत आहे. निसर्ग म्हणजे काय तर खळखळ वाहणाऱ्या नद्या, खोलच खोल दऱ्या, नभाला भिडणारे पर्वत किंवा डोंगर, स्वच्छ निरभ्र आकाश, हंगामामध्ये कोसळणारा पाऊस, रात्री शीतल भासणारा चंद्र, दिवसाचा रखरखणारा सूर्य या सर्वांचा समावेश निसर्गामध्ये होत असतो आणि या निसर्गातील प्रत्येक गोष्टींचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकमेकांशी संबंध असल्यामुळेच या निसर्गाला एका एकत्र बांधून ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालेले आहे.

पर्यावरण हा निसर्गाचा एक प्रकार असून पर्यावरणाअंतर्गत वेगवेगळ्या सजीव सृष्टीचे संचालन केले जाते मात्र मानवाच्या हव्यासापाई आणि वाईट कृत्यामुळे निसर्गाला फार मोठा धोका निर्माण होत असून निसर्ग संवर्धनाची फार मोठी गरज निर्माण झालेली आहे. निसर्ग मानवा द्वारे नष्ट होत राहिला तर येत्या काही दिवसांमध्ये मानवसृष्टी देखील पाठोपाठ नामशेष झाल्यापासून राहणार नाही.

निसर्गाची पर्यावरण प्रणाली म्हणजे काय?

पर्यावरण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून या पृथ्वीवर असणाऱ्या अगदी उघड्या डोळ्यांनी न दिसलेल्या बारीक जीवाणू विषाणूपासून महाकाय प्राण्यांपर्यंत सर्वांचा एकमेकांशी असलेला संबंध म्हणजे पर्यावरण होईल यामध्ये प्राणी, वनस्पती यांच्याबरोबरच या जीवनाकरता आवश्यक असणाऱ्या पाणी हवा यांसारख्या घटकांचा देखील समावेश होतो.

या सर्वांचे एकमेकांशी योग्य संतुलन राहिले तर जीवसृष्टी आणि पर्यायाने संपूर्ण पर्यावरण आणि निसर्ग व्यवस्थित रित्या चालत असतो. मात्र मानव हा असा प्राणी आहे ज्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर हेवा आहे आणि यामुळेच निसर्गाचे संवर्धन होण्याऐवजी निसर्गाचा समतोल ढासळत चाललेला आहे.

मानवाचा निसर्गाला होणारा धोका?

मानव हा निसर्गावर अवलंबून असला तरी देखील समोर दिसणारा हव्यास मानवाला या गोष्टीची जाणीव होऊन देत नाही त्यामुळे मानव निसर्गातून मोठ्या प्रमाणावर संपत्ती काढून घेत आहे त्यामुळे या निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर देखील होत आहे. कोणतीही गोष्ट मर्यादेच्या आत केली तर ती चांगली असते मात्र मानवाने या निसर्गमातेकडून नेहमीच ओरबाडून घेण्याची वृत्ती ठेवली आहे परिणामी निसर्ग धोक्यामध्ये येत आहे.

निसर्गाचे महत्त्व:

मानव या पृथ्वीतलावर निर्माण होण्याच्या खूप वर्षे आधी निसर्गाची निर्मिती झालेली आहे. त्यावेळी असणाऱ्या विविध सजीवांनी या निसर्गाला संरक्षण प्रदान केल्यामुळे मानवापर्यंत या सर्वांचे फायदे पोहोचू शकले. निसर्गामुळे मानवाला रोजच्या जीवनामध्ये अनेक फायदे होत असतात ज्यामध्ये अगदी सकाळी उठल्यानंतर जेवण करण्यापासून २४ तास स्वच्छ प्राणवायू मिळण्यापर्यंत अनेक फायद्यांचा समावेश होत असतो. निसर्गामुळे मानव जीवन जगतो असे म्हटले तरी देखील वावगे ठरणार नाही.

निसर्ग संवर्धनाची गरज:

मानवाच्या क्रियाकलपामुळे निसर्ग मोठ्या प्रमाणावर ऱ्हास पावलेला आहे ज्यामध्ये अनेक प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होणे, जंगले नष्ट होणे, हवा, वायू,पाणी इत्यादी गोष्टी दूषित होणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो त्यामुळे निसर्ग हा आदीसारखा बहारदार राहिलेला नाही. पूर्वीप्रमाणेच निसर्गाचे सौंदर्य पुन्हा आणायचे असेल तर मानवाने निसर्गाला धोका पोहोचतील अशा गोष्टी करणे टाळले पाहिजे ज्यामध्ये प्रदूषण हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.

प्रदूषणामुळे निसर्गाला फार मोठा धोका पोहोचलेला असून पुढील काळामध्ये मानवाला स्वच्छ प्राणवायू मिळेल की नाही त्याचबरोबर पिण्याचे पाणी उरेल की नाही याबद्दल शाश्वती नाही. मानवाने भूगर्भातून अनेक खनिजे आणि इंधन बाहेर काढल्यामुळे त्या घटकांची देखील कमतरता भासायला लागली आहे त्यामुळे पुढील पिढीसाठी ह्या गोष्टींची कमतरता भासण्याची शक्यता देखील फार मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि यामुळेच निसर्ग संवर्धन प्रत्येक नागरिकांच्या मनावर बिंबवणे गरजेचे झालेले आहे.

निष्कर्ष:

आपल्यातील अनेकांना पर्यटनाची आवड असेल आपण पर्यटन करताना नेहमी निसर्गसौंदर्याने नटलेल्या ठिकाणांचा विचार करताना दिसतो असे कोणीही नसेल की ज्यांना अगदी रखरखीत वाळवंटामध्ये किंवा सुकलेल्या टेकडीवर बसायला आवडेल. अगदी कुणी डोंगरावर किंवा टेकडीवर फिरायला जायचा विचार केला तरी देखील तेथे हिरवळ असावी, अंधतदायक वारा असावा, शतदा असावी अशी आपली अपेक्षा असते.

संपूर्ण सृष्टी ही निसर्ग सौंदर्याने नटलेली असली तरी देखील मानवाने हस्तक्षेप करत या निसर्गाचे लचके तोडलेले आहेत आणि सिमेंट काँक्रीटची जंगले उभी करून या निसर्गाला झळ पोहोचवलेली आहे. निसर्ग ही अशी देवता आहे ज्याचा आपण आदर केला तर त्यातून आपल्याला भरभरून फायदे मिळत असतात.

अगदी एखाद्या फळझाडाला केवळ पाणी द्यायचे काम केले तरीदेखील संपूर्ण वर्षभर आपल्याला मधुर फळे देण्याचे काम या झाडाकडून होत असते. अगदी कुठल्याही कामाचे झाड नसेल तरी देखील त्यापासून जळणफाटा, सावली किंवा फर्निचर साठीचे लाकूड इत्यादी गोष्टी तरी मिळवल्या जाऊ शकतात. निसर्गाला हानी न पोहोचावी याकरता अनेक नियम बनवले असले तरी देखील ज्यावेळी माणूस स्वतःला बंधनात टाकेल तेव्हाच निसर्ग सौंदर्य चांगल्या पद्धतीने पुन्हा बहरायला लागेल हे मात्र नक्की.

आजच्या भागामध्ये आपण या निसर्गाबद्दल संपूर्ण माहिती बघितली असून निसर्गाचे प्रकार, निसर्गाचा समतोल, निसर्गापासून मिळणारे विविध फायदे, निसर्गाचे मानवाला होणारे विविध उपयोग, निसर्ग संवर्धनाची गरज इत्यादी गोष्टींवर माहिती बघितली आहे.

FAQ

निसर्ग कशाला म्हटले जाते?

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या चराचरातील प्रत्येक गोष्टीला निसर्ग म्हणून संबोधले जाते मग त्यामध्ये डोंगर असो झाड असो नदी पाणी किंवा पशुपक्षी प्राणी असो सर्वांना निसर्ग म्हणूनच संबोधले जाते.

निसर्ग म्हटलं की डोळ्यासमोर सर्वात प्रथम काय येते?

निसर्ग म्हटलं की डोळ्यासमोर सर्वात प्रथम हिरवाईंने नटलेले डोंगर, बहरलेले झाडे, खळाळून वाहणाऱ्या नद्या, झऱ्याचे शुद्ध पाणी असे दृश्य डोळ्यासमोर येते.

निसर्गाचा समतोल ढासळत चाललेला आहे त्याचबरोबर निसर्ग ऱ्हास पावत चाललेला आहे यामध्ये सर्वात कारणीभूत काय आहे?

निसर्गाचा समतोल ढासळण्यामागे त्याचबरोबर निसर्गाच्या ऱ्हासामागील कारण म्हणून मानवाचे कार्य समजले जाते. मानवाने अनेक ठिकाणी निसर्गात हस्तक्षेप करून निसर्गाचा समतोल ढासळला आहे.

निसर्ग ला इंग्रजी भाषेमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

निसर्गाला इंग्रजी मध्ये मदर नेचर असे म्हटले जाते.

मानवी आयुष्यामध्ये निसर्गाचे काय महत्त्व आहे?

मानव ज्या ही संसाधनांचा वापर करतो ते सर्व निसर्गातून प्राप्त झालेले आहेत मग प्राणवायू असो अन्न असो पाणी असो किंवा निवारा आणि वस्त्र बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी अर्थात कच्चामाल असो या सर्व गोष्टी निसर्गाकडून प्राप्त झाल्या असल्यामुळे निसर्गाविना मानवाला पृथ्वीवर वास्तव्य करणे शक्यच होणार नाही त्यामुळे मानवाने निसर्गाचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे आणि त्याच्या संवर्धनाकरिता प्रयत्न केले पाहिजे.

Leave a Comment