माकड प्राण्याची संपूर्ण माहिती Monkey Animal Information In Marathi

Monkey Animal Information In Marathi मानव हा माकड प्राण्यापासूनच निर्माण झाला आहे असे अनेक सिद्धांतांमध्ये सांगितले जाते, आणि हे सिद्धांत खरे देखील आहेत. कारण की अनेक बाबतीमध्ये मानव व माकड हे दोन प्राणी अतिशय साम्य दाखवणारे असतात. शरीर रचना तर अतिशय सारखी दिसून येते.

Monkey Animal Information In Marathi

माकड प्राण्याची संपूर्ण माहिती Monkey Animal Information In Marathi

माकड हा एक सस्तन प्राणी असून, संपूर्ण शरीर केसांनी व्यापलेले असते. मानवाप्रमाणेच पाठीचा कणा असला तरी देखील त्याला शेपटी हा अवयव अधिकचा असतो. मानवाचा पूर्वज म्हणून ओळखला जाणारा हा प्राणी अतिशय लवचिक स्वरूपाचा असून, सरसर झाडांवर चढणे आणि फांद्यांवरून इकडून तिकडे उड्या मारणे त्यांना सहजरित्या शक्य असते.

माकडांचे जगभरात अनेक प्रकार आढळून आले, तरीदेखील या प्रत्येकामध्ये विविध गोष्टींमध्ये साम्य आढळून येते. त्याचप्रमाणे जीवनशैलीमध्ये खूप विविधता देखील आढळते. विविध प्रजातींच्या व विविध ठिकाणांवरील माकडांच्या रंगांमध्ये आकारामध्ये अधिक विविधता दिसून येत असते. माकडाला एक बुद्धिमान आणि सामाजिक स्वरूपाचा प्राणी म्हणून देखील ओळखले जाते. आजच्या भागामध्ये आपण या माकड प्राण्याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावमाकड
प्रकारप्राणी
इंग्रजी नावमंकी
शास्त्रीय नावCercopithecidae
उपप्रकारसस्तन प्राणी
साधारण आयुष्यमानदहा ते पन्नास वर्षांपर्यंत
वंशजमानव
किंगडमॲनिमलिया

माकडांच्या प्रजाती:

माकडांना मुख्यतः दोन गटांमध्ये विभाजित केले जातात. त्यामध्ये ओल्ड वर्ल्ड मंकी आणि न्यू वर्ल्ड मंकी या दोन गटांचा समावेश होत असतो. यातील ओल्ड वर्ड मंकी प्रकारातील माकडे आशिया व आफ्रिका खंडामध्ये आढळून येतात, व त्यांच्या नाकपुड्यांची दिशा ही खालील बाजूने आढळून येते.

तर न्यू वर्ल्ड मंकी या प्रकारातील माकडे ही दक्षिण अमेरिकेत आढळण्याबरोबरच त्यांच्या नाकापुढ्यांची दिशाही काहीशी वरच्या दिशेने असलेली आढळून येते. यामध्ये गोरिला माकडाचा देखील समावेश होतो. माकडांच्या काही प्रजाती या गालावरील चरबीमध्ये देखील अन्न साठवून ठेवण्यास सक्षम असतात. या माकडांमधील नाक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते, ज्याचा वापर करून ते मादी माकडाला आकर्षित करून घेण्यास सक्षम असतात.

माकडांचे वास्तव्य:

माकडे संपूर्ण जगभर आढळत असली, तरी देखील ऑस्ट्रेलिया आणि अंटार्टिका या खंडांमध्ये त्यांच्या प्रजाती आढळत नाहीत. या माकडांच्या योग्य वाढीसाठी मुख्यतः उष्ण व आर्द्र हवामान आवश्यक असते, त्यामुळे उष्णकटिबंधीय पर्जन्य वनांमध्ये या माकडांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येते.

अमेरिकेच्या ॲमेझॉन जंगलामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर माकडे अस्तित्वात असून, आफ्रिकेच्या कॉंगो बेसिन मध्ये देखील यांच्या अनेक प्रजाती दिसून आलेले आहेत. काही माकडांच्या प्रजाती वाळवंटामध्ये तर काही प्रजाती या सवाना जंगला सह बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये देखील आढळून येत असतात.

या बर्फाच्छादित प्रदेशात आढळणाऱ्या माकडांच्या प्रजाती तेथील हवामानाकरिता जुळवून घेतलेल्या असतात. काही संशोधनात असे दिसून आलेले आहे, की थंडीमध्ये ही माकडे उष्ण पाण्यामध्ये बसून आपली थंडी घालवत असतात.

माकडांचे खाणपान:

मानवाप्रमाणेच माकडे देखील विविध अन्न खात असतात. यामध्ये फळे, पालेभाज्या, फुले, वनस्पतींची पाने, इत्यादी गोष्टींचा समावेश होत असतो. त्याचबरोबर काही माकडांच्या प्रजाती मांसाहारी देखील असून, त्यांच्याद्वारे सरपटणारे लहान कीटक यांची शिकार देखील केली जाते.

माकडांच्या खाण्याबद्दल वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास मानव आणि माकड असे दोनच प्राणी आह, जे केळी खाताना त्यांची साल काढून टाकत असतात. यावरून माकडाच्या बुद्धीची देखील कल्पना केली जाऊ शकते. माकडे कोणत्या परिसरात राहतात, यानुसार त्यांच्या आहारामध्ये बदल जाणवत असतो.

त्यांच्या आसपास असणाऱ्या विविध अन्नाच्या उपलब्धतेनुसार माकडे आहार घेत असतात. त्याचबरोबर आहार घेण्याच्या बाबतीत माकडे अतिशय चोखंदळ असून, त्यांच्या आवडीचे पदार्थ खाण्यास ते प्राधान्य देत असतात. त्याचबरोबर काही पक्षांची अंडी देखील या माकडांद्वारे खाल्ली जात असते.

माकडातील प्रजनन:

सुमारे १६० ते १७० दिवसाच्या गर्भधारणा कालावधीनंतर सस्तन असणारे हे माकड प्राणी आपल्या पिल्लांना जन्म देत असतात. माकड हंगामी प्रजनन करण्यास प्राधान्य देत असतात, त्यामुळे मुख्यतः फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान या माकडांद्वारे पिल्लांना जन्म दिला जात असतो. तर ते सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यांच्या दरम्यान आहे मिलन करत असतात.

तथ्य माहिती:

  • जगभरात माकडांच्या २६० पेक्षा ही जास्त प्रजाती आढळून येतात.
  • माकड हा प्राणी पृथ्वीवर सुमारे ५० दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात आहे असे सांगितले जाते.
  • माकडे गालावरील चरबीमध्ये अन्न साठवण्यास सक्षम असतात.
  • वेगवेगळ्या प्रजातीनुसार माकडांच्या दातांची संख्या ३२ ते ३६ इतकी आढळून येत असते.
  • माकडांना मानवाप्रमाणेच हाताची बोटे असतात, त्यामुळे त्यांना वस्तू पकडणे सोयीचे होते.

निष्कर्ष:

मेंढी आणि शेळी, गाय आणि म्हैस या प्राण्यांमध्ये ज्याप्रमाणे साम्य दिसते, त्याचप्रमाणे मानव व माकडे या प्राण्यांमध्ये देखील साम्य दिसून येत असते. मानव हा माकडांचा वंशज आहे असे देखील म्हटले जाते. बऱ्याच गुणधर्मांमध्ये माकड व मानव सारखे भासत असले, तरी देखील या आजकाल दोन वेगवेगळ्या प्रजाती म्हणून अस्तित्वात आहेत.

मानव हा ज्याप्रमाणे विचार करू शकतो, त्याचप्रमाणे माकड बुद्धिमान असला तरी देखील त्याचे विचार क्षमता काहीशी कमी असते. मात्र तो मानवाप्रमाणेच कार्य करण्यास सक्षम असतो. त्याच्या हाताची बोटांची रचना देखील मानवाप्रमाणेच असल्यामुळे विविध गोष्टी उचलणे किंवा दुसरीकडे ठेवणे हे कार्य त्याला सहज जमत असते.

हा प्राणी झाडावर चढण्यासाठी देखील ओळखला जातो. माकड नेहमी झाडावरच आढळते असे सांगितले जाते. अतिशय लवचिक असल्यामुळे ही माकडे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर अगदी जोरजोरात उड्या मारत खेळत असतात. हुप हुप असा आवाज करत ही माकडे आपले अन्न मिळवत असतात.

हे प्राणी सामाजिक स्वरूपाचे असल्यामुळे शक्यतो टोळीच्या स्वरूपात राहणे पसंत करत असतात. आजच्या भागामध्ये आपण याच माकड प्राण्याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली असून, त्याच्या विविध प्रजाती बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. सोबतच माकडाचे निवासस्थान, त्यांचे खाद्य संस्कृती किंवा खानपान, अन्न मिळवण्याची प्रक्रिया, त्यांचे जीवनक्रम, माकडामधील प्रजनन व्यवस्था, आणि माकडाच्या विविध दुर्मिळ प्रजाती इत्यादी बद्दल माहिती बघतानाच माकडांना पाळीव प्राणी म्हणून वापरले जाऊ शकते का? याबद्दल देखील जाणून घेतलेले आहे. आणि शेवटी काही मनोरंजक तथ्य माहिती देखील घेतलेली आहे.

FAQ

माकड या प्राण्याला कोणाचा पूर्वज म्हणून ओळखले जाते?

माकड या प्राण्याला मानवाचा पूर्वज म्हणून ओळखले जाते, कारण त्याच्या पाठीच्या कण्यामध्ये आणि हाताच्या बोटांमध्ये मानवासारखे बरेच साम्य दिसून येते.

माकडाला किती दात असतात?

माकडाच्या दातांची संख्या ही त्यांच्या प्रजाती नुसार भिन्न असते, मात्र सरासरी ३२ ते ३६ दातांची संख्या या माकड प्राण्यांमध्ये आढळून येत असते.

माकड कोणकोणत्या स्वरूपाचे अन्न खात असतात?

माकड मानवाप्रमाणेच वैविध्यपूर्ण अन्न खात असले, तरी देखील शिजवून खाण्याची कला त्यांच्यामध्ये अजून तरी आत्मसात झालेली नाही. त्यामुळे माकड झाडावरील फळे, भाज्या, आणि झाडाची पाने इत्यादी गोष्टी खात असतात.

माकडाबद्दल काय तथ्य सांगता येईल?

माकड हा अतिशय बुद्धिमान प्राणी असून, विविध हत्यार वापरण्याची कला देखील माकड सहजतेने अवगत करून घेऊ शकतात. त्याचप्रमाणे ही माकडे अतिशय आळशी म्हणून देखील ओळखली जातात. जी आयुष्यातील सुमारे ८० टक्के कालावधी विश्रांतीमध्ये व्यतित करत असतात.

माकड पाळले जाऊ शकते का?

माकड पाळले जाऊ शकते, अनेक सर्कस मध्ये माकडांचा खेळ देखील केला जात आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला माकडाचे खेळ करणारे लोक देखील आढळून येत असतात.

Leave a Comment