मेघनाद साहा यांची संपूर्ण माहिती Meghnad Saha Information In Marathi

Meghnad Saha Information In Marathi विज्ञान हा जगण्याचा मूलमंत्र आहे असे आपण अनेक ठिकाणी ऐकले असेल. विज्ञानाच्या साहाय्याने अनेकांनी फार मोठी प्रगती केलेली आहे, तर काहींनी नाव देखील कमावलेले आहे. विज्ञान क्षेत्रातील फार मोठी कामगिरी बजावणाऱ्या एका व्यक्तीबद्दल अर्थात मेघनाद सहा यांच्या बद्दल आज आपण माहिती बघणार आहोत…

Meghnad Saha Information In Marathi

मेघनाद साहा यांची संपूर्ण माहिती Meghnad Saha Information In Marathi

ते एक उत्कृष्ट भौतिकशास्त्रज्ञ आणि भारतीय खगोलशास्त्रज्ञ असण्याबरोबरच कॅलिबर शास्त्रज्ञ देखील होते. त्यांनी अनेक संस्था स्थापन केलेल्या असून, त्यामध्ये इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स त्याच बरोबर इन्स्टिट्यूट ऑफ थर्मल न्यूक्लिअर फिजिक्स या संस्थांचा समावेश होतो. त्यांनी आयनीकरण सिद्धांत आणि साहा समीकरण यांच्या माध्यमातून विज्ञान क्षेत्रामध्ये फार मोलाची कामगिरी बजावली आहे.

त्यांनी मांडलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निष्कर्षावरून पुढे अनेक शास्त्रज्ञांनी देखील मोलाचे शोध लावलेले आहेत. अशा या भारतीय शास्त्रज्ञांना तारे व ग्रह यांच्या संशोधनाकरिता फार लोकप्रियता प्राप्त झाली होती.

चला तर मग अशा या महत्वपूर्ण व्यक्तीच्या जीवन चरित्राला सुरुवात करूया…

नावमेघनाद साहा
संपूर्ण नावमेघनाद जगन्नाथ साहा
जन्म स्थळपूर्व बंगालमधील शेवर्तली
जन्म दिनांक६ ऑक्टोबर १८९३
आईभुवनेश्वरी देवी
वडीलजगन्नाथ साहा
शैक्षणिक उपलब्धीबी एस सी आणि एम एस सी
निधन१६ फेब्रुवारी १९५६

दिनांक ६ ऑक्टोबर १८९३ या दिवशी भुवनेश्वर देवी व जगन्नाथ साहा या दांपत्याला त्यांचे पाचवे अपत्य प्राप्त झाले. ते दुसरे तिसरे कोणी नसून जगप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ समजले जाणारे मेघनाद साहा होते.

अगदी गरीब कुटुंबात जन्माला आल्यामुळे त्यांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर फार मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यांना अतिशय कमी संसाधनांमध्ये आपले शिक्षण पूर्ण करावे लागले होते. त्यांच्या वडिलांचे किराणाचे दुकान होते, त्यामुळे मेघनाथ साहा यांनी शिक्षण घेण्यापेक्षा आपल्या घरच्या दुकानांमध्येच काम करावे असे त्यांच्या वडिलांना वाटत असे.

मात्र मेघनाद साहा यांना शिक्षणाची भारी हौस होती. शिक्षणासाठी त्यांनी सर्वप्रथम आपल्या जन्मगावी प्राथमिक विद्यालयात प्रवेश घेतला. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरता ढाका या ठिकाणी जाण्याचे ठरविले. या शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या गावातील डॉक्टर असणारे अनंत कुमार दास यांनी फार मोलाची ची मदत केली होती. त्यांनी मेघनाथ साहा यांच्या होस्टेल व मेस या दोन्हीही गोष्टींची तरतूद स्वतः केली होती.

पुढे ब्रिटिशांनी बंगालचे विभाजन करण्याचा मानस आखला. ते वर्ष होते १९०५. त्यामुळे संपूर्ण बंगाल वासियांसोबतच मेघनाद साहा यांना देखील फार राग आला होता. त्यावेळी पूर्व बंगालचे राज्यपाल असणारे एक अधिकारी त्यांच्या शाळेत भेट देण्यासाठी आले असता, त्यांनी आपल्या स्वंगड्यांसोबत मिळून या दौऱ्याचा फार मोठा निषेध नोंदवला. आणि या दौऱ्यावर बहिष्कार घालण्याची सर्वांना सूचना केली. त्यांनी असे केल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले, आणि त्यांना आपल्या शिष्यवृत्तीसाठी देखील मुकावे लागले.

 त्यांना या शाळेतून काढून टाकण्यात आले असले, तरी देखील त्यांची शिकण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून त्यांनी पुढे जुबिली स्कूल या ठिकाणी प्रवेश नोंदविला. पुढे १९९० यावर्षी झालेल्या कलकत्ता विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये त्यांना गणित या विषयांमध्ये सर्वात जास्त गुण मिळाले होते.

त्यांनी आपले ढाका कॉलेजमधील शिक्षण सुरू असतानाच, गणित विषयांमधील पदवी मिळवत दुसऱ्या क्रमांकाचे उत्तीर्ण झाले होते. ज्यामुळे त्यांना गणितासाठीचे पारितोषिक देखील प्राप्त झाले होते. शिक्षण घेत असतानाच त्यांनी अनुशीलन समितीमध्ये देखील सहभाग नोंदविला होता, ज्यामुळे त्यांचा सुभाष चंद्र बोस, राजेंद्र प्रसाद यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तींशी देखील संबंध आला होता.

मेघनाचा सहा यांचे करिअर:

विज्ञान विषयाचे प्राध्यापक म्हणून १९१७ या वर्षी कलकत्ता विद्यापीठामध्ये देखील कार्य केले होते. ज्या ठिकाणी त्यांचा फिजिक्स हा मुख्य विषय होता. पुढे त्यांनी अनेक अभ्यास व शोध निबंध देखील प्रसिद्ध केले, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळण्यास फार मदत मिळाली.

मेघनाथ सहा यांचे वैयक्तिक जीवन:

मेघनाथ सहा यांनी १९१८ या वर्षी विवाह केला होता. त्यांच्या पत्नीचे नाव राधा राणी असे होते. पुढे या दांपत्याला सहा अपत्य झाली. त्यामध्ये मुलांची संख्या तीन, आणि मुलींची संख्या तीन असे समान होते. त्यांच्या मुलांपैकी एक मुलगा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स या ठिकाणी शिक्षण तज्ञ म्हणून रुजू झाला, व त्या ठिकाणी त्यांनी फार मोलाचे काम केले होते.

मेघनाथ सहा यांचे शोध:

मेघनाथ साहा यांनी साहा समीकरण मांडले होते, ज्या अंतर्गत दाब व तापमान यांचा एकमेकांशी संबंध दर्शवला होता. त्याचबरोबर त्यांनी अनु मधून इलेक्ट्रॉन वेगळा कसा करता येईल, याबद्दल देखील आकडेमोडी च्या साह्याने विविध मांडणी केली होती. त्यांनी खगोल शास्त्रामध्ये देखील बरेच शोध लावलेले असून, सूर्याच्या कक्षेतील किंवा आवरणातील आयनिभवन या संकल्पनेवर त्यांनी एक शोधनिबंध लिहून तो प्रसिद्ध केला होता.

त्यांनी मांडलेल्या या आईनीकरण सिद्धांताचे अनेक ठिकाणी वापर झालेले असून, ज्योतींचे संवर्धन, रेडिओ तरंग व फोन तरंग यांचे संप्रेषण, स्फोटक पदार्थांची रचना, यासारख्या विविध ठिकाणी याचा वापर केला जात आहे. त्यांनी स्वतः पुढाकार घेत इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स ही संस्था स्थापन करून भारताला न्यूक्लिअर फिजिक्समध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी फार मोलाची मदत केली होती.

त्यांनी स्वतः या संस्थेचे संचालक पद भूषवलेले होते. पुढे त्यांचे मृत्यू झाल्यानंतर या संस्थेला त्यांच्या नावाने गौरवण्यात आले. अशा या भारतीय खगोल शास्त्रज्ञ व भौतिक शास्त्रज्ञ असणाऱ्या त्याचबरोबर भारताच्या भौतिकशास्त्र विषयात फार मोलाची कामगिरी करणाऱ्या मेघनाद साहा यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी १६ फेब्रुवारी १९५६ या दिवशी निधन झाले. त्यांच्या निधनाचे  हृदयविकार हे कारण दाखवले जाते.

निष्कर्ष:

भारत हा बुद्धिमान लोकांचा देश आहे असे म्हटले जाते. कारण भारतातील परिणामी जगातील महत्त्वपूर्ण शोध लावणाऱ्यांमध्ये अनेक भारतीय शास्त्रज्ञांचा समावेश होतो. परदेशी शास्त्रज्ञांना प्रसिद्धी मिळाली असली, तरी देखील भारतीय शास्त्रज्ञांनी देखील मोठे कार्य केलेले आहे. त्यामध्ये साहा यांच्यासारख्या खगोलशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयांमध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा देखील समावेश होतो.

आजच्या भागामध्ये आपण या मेघनाद सहा यांच्या जीवन चरित्राबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे. यामध्ये त्यांच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल माहिती, त्यांचे वैयक्तिक जीवन, वैवाहिक जीवन, त्यांनी लावलेले शोध, इत्यादी गोष्टीबद्दल माहिती बघितली आहे. सोबतच त्यांना मिळालेले पुरस्कार देखील जाणून घेतलेले आहेत…

FAQ

मेघनाथ साहा यांचे संपूर्ण नाव काय होते?

मेघनाथ सहा यांचे संपूर्ण नाव मेघनाद जगन्नाथ साहा असे होते.

मेघनाद साहा यांचा जन्म कोणत्या दिवशी, आणि कोणत्या राज्यामध्ये झाला होता?

मेघनाथ साहा यांचा जन्म ६ ऑक्टोबर १८९३ या दिवशी पूर्व बंगाल या राज्यामध्ये झाला होता. जो सध्या बांगलादेशचा भाग आहे.

मेघनाद साहा यांच्या आईचे व वडिलांचे नाव काय होते?

मेघनाथ सहा यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी, तर वडिलांचे नाव जगन्नाथ साहा असे होते.

मेघनाथ सहा यांनी कोणकोणते शिक्षण घेतले होते?

मेघनाद साहा यांनी बीएससी आणि एम एस सी असे शिक्षण घेतले होते.

मेघनाथ सहा यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला होता?

मेघनाद साहा यांचा मृत्यू १६ फेब्रुवारी १५६ या दिवशी झाला होता, अर्थात ते ४९ वर्ष जगले होते.

Leave a Comment