लालबहादूर शास्त्री यांची संपूर्ण माहिती Lal Bahadur Shastri Information In Marathi

Lal Bahadur Shastri Information In Marathi कुठल्याही देशाची प्रगती ही त्याच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर अवलंबून असते. कुठलाही देश प्रगती करायचा असेल तर त्या देशाचे नेतृत्व योग्य हातामध्ये दिले गेले पाहिजे. असेच एक भारताचे नेतृत्व म्हणून कार्य केलेले भारतमातेचे सुपुत्र म्हणून लालबहादूर शास्त्री यांना ओळखले जाते.

Lal Bahadur Shastri Information In Marathi

लालबहादूर शास्त्री यांची संपूर्ण माहिती Lal Bahadur Shastri Information In Marathi

भारताचे द्वितीय पंतप्रधान म्हणून त्यांनी कार्य केले होते. ज्यावेळी भारताचे विद्यमान पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले, त्यावेळी लालबहादूर शास्त्री यांना पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आले होते. एक अतिशय निष्णात व हुशार व्यक्ती त्याचबरोबर नावाप्रमाणेच बहादूर असणारे लालबहादूर शास्त्री हे त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते, जेव्हा भारताचे पाकिस्तानसोबत युद्ध झाले होते.

या युद्धाच्या वेळी त्यांनी अतिशय धाडसाने या घटनेला हाताळले होते. जय जवान आणि जय किसान असा नारा देणारे लालबहादूर शास्त्री देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी खूपच प्रयत्न करणरे व्यक्ती होते. त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. आजच्या भागामध्ये आपण या लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावलाल बहादूर शास्त्री
जन्मस्थळवाराणसी, उत्तर प्रदेश, मुघलसराय
जन्म दिनांक२ ऑक्टोबर १९०४
वडीलमुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव
पत्नीललिता देवी
अपत्यएकूण सहा, ज्यातील दोन मुली व चार मुले
राजकीय संदर्भभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मृत्यु दिनांक११ जानेवारी १९६६

उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे २ ऑक्टोबर १९०४ या दिवशी शिक्षक असलेल्या शारदा प्रसाद श्रीवास्तव, आणि गृहिणी असलेल्या रामदुलारी यांच्या पोटी लालबहादूर शास्त्री यांचा जन्म झाला होता. त्यांना वडिलांची छत्रछाया अवघ्या एक वर्षांसाठीच लाभली होती. पुढे लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या आईने घडविले होते.

त्यांच्या आईने अगदी काबाडकष्ट करून लालबहादूर शास्त्री यांना शिक्षणामध्ये कसलीही कमी पडू दिली नाही, त्यामुळे लालबहादूर शास्त्री यांनी देखील चांगले शिक्षण घेतले. त्यांनी अगदी हरिश्चंद्र हायस्कूल आणि काशी विद्यापीठ यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये देखील शिक्षण घेतलेले आहे.

त्यांनी संस्कृत मध्ये आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करून, शास्त्री ही पदवी मिळवली होती. त्यामुळे लाल बहादूर शास्त्री यांच्या नावामध्ये शास्त्री हा शब्द येत असतो. त्यांनी ललिता शास्त्री यांच्यासोबत १९२८ यावर्षी विवाह केला.

जय जवान जय किसान, त्याचबरोबर मरो नाही मारो यांसारखे ब्रीदवाक्य किंवा नारे देणारे शास्त्रीजी भारताचे द्वितीय पंतप्रधान म्हणून ओळखले जातात. त्यांनी सर्वप्रथम भारत सेवक संघ या संस्थेमध्ये सामील होत, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपले योगदान देण्यास सुरुवात केली.

ते गांधीवादी विचारसरणीचे असल्यामुळे, त्यांना शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यावर संपूर्ण विश्वास होता. त्यांनी स्वतंत्र्यासाठी फार मोलाचे कार्य केले होते, परिणामी त्यांना बऱ्याचदा तुरुंगवास देखील सहन करावा लागला होता. त्यांनी भारत छोडो आंदोलन, दांडी यात्रा, असहकार चळवळ यासारख्या विविध स्वतंत्र कार्यामध्ये सहभाग नोंदवत मोलाचे कार्य केले होते.

भारतासाठी फार मोलाचे कार्य करणारे लाल बहादूर शास्त्री उत्तर प्रदेशाच्या संसदेमध्ये सचिव म्हणून देखील कार्यरत होते. त्यांना वाहतूक व पोलीस या खात्याची जबाबदारी देऊन त्यांना याबद्दल संपूर्ण अधिकार बहाल केले होते. त्यांनी पोलिसांकडून गर्दी नियंत्रण करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या पद्धतींमध्ये अमुलाग्र बदल केला, आणि लाठीचार्ज करणे ऐवजी पाण्याचे फुगे फेकण्याचे आदेश दिले.

पुढे त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्त होण्याचा मान देण्यात आला. त्यांनी काँग्रेसच्या जडणघडणीमध्ये फार महत्त्वाचे कार्य केलेले आहे, त्यांच्यामुळे काँग्रेस पक्षाला १९५२, १९५७ आणि १९६२ या तीनही पंचवार्षिक निवडणुकांमध्ये चांगले घवघवीत यश संपादन करण्यात मदत मिळाली होती.

लालबहादूर शास्त्री हे त्यांच्या कार्यासाठी संपूर्ण भारतभर ओळखले जात असत, मात्र अचानक भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यामुळे या पक्षाची धुरा आता कोण सांभाळणार असा प्रश्न आता निर्माण झाला होता.

लालबहादूर शास्त्री यांच्यामध्ये असलेल्या असाधारण क्षमता, आणि त्यांनी केलेले पूर्वीचे कार्य यावरून लालबहादूर शास्त्री यांच्याकडे पंतप्रधान पदाची सूत्रे सोपविण्यात आली. पुढे पाकिस्तानने भारतावर १९६५ या वर्षी आक्रमण केले, आणि भारतावर हवाई हल्ला करायचा प्रयत्न केला. या प्रसंगाला धीराने तोंड देत लालबहादूर शास्त्री यांनी पाकिस्तानच्या चांगल्याच नांग्या ठेचल्या होत्या.

सर्वपल्ली राधाकृष्ण आणि प्रत्येक संरक्षण दलाचे नेते यांच्यासोबत बैठक घेऊन एक रणनीती आखली, आणि त्या रणनीतीच्या आधारावर भारताला पाकिस्तानपासून बचावले. भारत अश्या अनपेक्षित हल्ल्याचा योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देईल, अशी कोणालाही कल्पना नव्हती. मात्र लालबहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वामुळे ते सहज शक्य झाले.

लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू:

लालबहादूर शास्त्री यांचे ११ जानेवारी १९६६ त्या दिवशी निधन झाले होते. मात्र त्यांच्या निधनाबद्दल आज देखील गुढ निर्माण झालेले आहे. ज्यावेळी भारत पाकिस्तान युद्ध झाले, त्यावेळी या दोन देशांमध्ये करार होऊन शांतता प्रस्थापित होईल असे रशिया व अमेरिका यांना वाटत होते. त्यासाठी या दोन्ही देशांनी भारताला दबावाखाली घेतले.

त्यामुळे भारताचे प्रतिनिधी म्हणून लाल बहादूर शास्त्री यांनी ताश्कंद या ठिकाणी पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष अयुब खान यांच्यासोबत भेट घेऊन करारावर स्वाक्षरी केली, मात्र त्याच रात्री त्यांचे अतिशय गूढ रित्या निधन झाले. ज्यावेळी त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला होता, असे सांगितले जाते. मात्र याबद्दल अनेक लोकांनी आजपर्यंत शंका उपस्थित केलेल्या आहेत.

निष्कर्ष:

एक मतदार आणि नागरिक म्हणून आपण अतिशय सहजरीत्या देशाविषयी गप्पा मारत असतो, आणि देशाच्या प्रगतीबद्दल किंवा अधोगतीबद्दल टिप्पण्या करत असतो. मात्र खऱ्या अर्थाने देशात चालवणे हे काही सोपे काम नाही. त्यासाठी अतिशय मुरब्बी व्यक्तीची गरज असते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वप्रथम अतिशय योग्य व्यक्तीच्या हातामध्ये देशाचे नेतृत्व देणे गरजेचे होते. त्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड झाली होती, मात्र त्यांच्या निधनानंतर ही जबाबदारी धीराने पैलवत लालबहादूर शास्त्री यांनी भारताच्या प्रगतीमध्ये चांगलीच वाढ केली होती.

अगदी पाकिस्तान सारख्या मुद्द्यावर देखील त्यांनी आपल्या योग्य बुद्धीचा वापर करून अतिशय महत्त्वपूर्णरित्या कार्य केले होते. आजच्या भागामध्ये आपण या लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन चरित्राविषयी जाणून घेतलेले आहे. यामध्ये त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्य बद्दल माहिती, सत्याग्रही तरुण म्हणून त्यांची ओळख, त्यांच्या नेतृत्व गुणाबद्दल माहिती, त्यांचा मृत्यू व या मृत्यूबद्दलचे विविध तर्कवितर्क, आणि रहस्य इत्यादीबद्दल जाणून घेतलेले आहे.

FAQ

लालबहादूर शास्त्री यांचा जन्म कोणत्या दिवशी व कोणत्या ठिकाणी झाला होता?

लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ या दिवशी, उत्तर प्रदेशातील मुघलसराय, वाराणसी या ठिकाणी झाला होता.

लालबहादूर शास्त्री यांच्या आईचे व वडिलांचे नाव काय होते?

लालबहादूर शास्त्री यांच्या आईचे व वडिलांचे नाव अनुक्रमे रामदुलारी आणि मुन्शी शारदा प्रसाद श्रीवास्तव असे होते.

लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला होता?

लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू ११ जानेवारी १९६६ या दिवशी झाला होता. त्यांच्या मृत्यूबद्दल आज देखील गुढ आहे.

लालबहादूर शास्त्री यांना एकूण किती अपत्य होती?

लालबहादूर शास्त्री यांना एकूण ६ अपत्य होती, ज्यामध्ये मुलांची संख्या चार तर मुलींची संख्या दोन इतकी होती.

लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या राजकारणाच्या कारकिर्दीमध्ये कोणत्या पक्षासोबत मिळून कार्य केले होते?

लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या राजकारणाच्या कारकीर्दीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षासोबत मिळून कार्य केलेले होते.

Leave a Comment