Krantisinh Nana Patil Information In Marathi भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे व ग्रामीण समुदायाचे नेते असलेले नाना पाटील सर्वांच्या परिचयाचे आहेत. प्रतिसरकार म्हटलं की साताऱ्याच्या नाना पाटलांचे नाव सर्वात प्रथम येते. त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध प्रतिसरकारी स्थापन करून, स्वतःची संपूर्ण व्यवस्था निर्माण केली होती. त्यांनी सामाजिक सुधारणांमध्ये देखील फार मोलाचे कार्य केलेले असून, कृषी, सामाजिक, राजकीय, इत्यादी क्षेत्रांमध्ये देखील त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत अनेक बदल केलेले आहेत. त्यांचा समाजामध्ये असलेला वेगळा दरारा, आणि सर्वांशी असलेले आपुलकीचे संबंध यामुळे अल्पावधीतच सर्वप्रिय नेते म्हणून त्यांचा उदय झाला होता.
क्रांतीसह नाना पाटील यांची संपूर्ण माहिती Krantisinh Nana Patil Information In Marathi
महाराष्ट्र मध्ये त्यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहेच, मात्र महाराष्ट्र बाहेरील भारतामध्ये देखील ते खूपच प्रसिद्ध होते. अतिशय विलक्षण निर्णय क्षमता, कर्तुत्व, ताकद, एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास करण्याची हातोटी, इत्यादी गुणधर्म असणारे नाना पाटील एक शूर स्वातंत्र्य सैनिक म्हणून ओळखले जातात. आजच्या भागामध्ये आपण या क्रांतीसेना नाना पाटलांबद्दल संपूर्ण माहिती बघून, त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणार आहोत…
नाव | नाना पाटील |
ओळख | प्रतिसरकार |
पदवी | क्रांतिसिंह |
जन्मदिनांक | १० ऑक्टोबर १९०० |
जन्म ठिकाण | शिरोळ, महाराष्ट्र |
पहिली चळवळ | असहकार चळवळीत भाग |
स्थापक अध्यक्ष | रयत क्रांती दल |
राजकीय कारकीर्द | मुंबई विधानसभा सदस्य: राज्यसभा संसद सदस्य |
वडील | रामचंद्र पाटील |
आई | गोजीराबाई पाटील |
मृत्यु दिनांक | ६ डिसेंबर १९७६ |
आयुष्य | ७६ वर्ष |
दिनांक १० ऑक्टोबर १९०० या दिवशी बहे बोरगाव या सांगली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावी क्रांतिसिंह नाना पाटील जन्मले. वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेले क्रांतिसिंह नाना पाटील लहानपणापासूनच अतिशय धार्मिक विचारांचे होते, मात्र जसजसे त्यांचे वय वाढत चालले तसं तसे त्यांना राजकारणाविषयी समज येऊ लागली.
इंग्रज अधिकारी कशा रीतीने भारतावर अन्याय करत आहेत, याचे आकलन झाल्याने त्यांनी या क्षेत्रात कार्य करण्याचे ठरवले. त्यांचे गाव अतिशय लहानसे खेडे होते, परिणामी येथे शिक्षणाच्या सोयी मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी शिक्षणाकरिता भ्रमंती केली होती. त्यामुळे कसं बसे सातवी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी तलाठी पदी कार्य करायला सुरुवात केली, आणि नंतर मात्र ते पूर्णतः समाजकारणामध्ये उतरले.
स्वातंत्र्य कार्यातील भूमिका:
तलाठी म्हणून कार्य करताना त्यांनी स्वातंत्र्य मिळण्याची देखील स्वप्न बघितली होती. गांधीजींनी सुरू केलेल्या अनेक चळवळींचा त्यांच्या मनावर चांगला परिणाम झाला होता. परिणामी त्यांनी स्वतंत्र्य चळवळीत सक्रियरित्या सहभाग घेण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी आपली तलाठी ही नोकरी सोडली.
गांधीजींनी १९२१ मध्ये असहकार चळवळ सुरू केली होती. या चळवळीमध्ये सहभागी होत त्यांनी फार मोठे नेतृत्व केले होते. त्यामुळे त्यांची युवा तरुणांचे नेते म्हणून ओळख झाली होती. त्याचबरोबर त्यांनी अनेक इंग्रज विरोधी सभा घेत, नवीन तरुणांना स्वातंत्र्याचे महत्त्व समजून सांगितले होते. अनेक मिरवणुका काढणे, रॅली आयोजित करणे, वसाहतवादी ब्रिटिशांना हुसकावून लावण्यासाठी विविध कार्य करणे यासाठी ते ओळखले जात.
क्रांतिसिंह नाना पाटलांनी रयत क्रांती दल या नावाची एक संघटना स्थापन करून, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी फार मोठे कार्य केले होते. यालाच शेतकरी क्रांती पक्ष म्हणून देखील ओळखले जाते. हा पक्ष मुख्यतः शेतकरी आणि शेतमजूर यांच्या कल्याणाकरिता तयार करण्यात आला होता.
ज्यामुळे शेतकरी वर्गाचे सक्षमीकरण करणे सहज शक्य झाले. त्यांनी शेतकऱ्यांना ब्रिटिश सरकारकडून होणाऱ्या त्रासाच्या विरोधात अनेक निदर्शने केली होती. त्याचबरोबर सक्रिय राजकारणात सहभाग नोंदवत, त्यांनी जमिनीच्या बाबतीत सुधारणा कायदे लागू केले होते. सोबतच शेतकऱ्यांच्या सातबारावर असणारे कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते.
क्रांतिसिंह नाना पाटलांचे राजकीय क्षेत्रातील योगदान:
कुठल्याही प्रश्नांना वाचा फोडायचे असेल तर सक्रिय राजकारणामध्ये सहभागी असले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी मुंबई विधानसभेचे सदस्यत्व मिळवले होते. सोबतच त्यांनी संसदेमध्ये राज्यसभा सदस्य म्हणून देखील कार्य केलेले आहे. आणि या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी समाजातील अनेक घटकांच्या कल्याणाकरिता योगदान दिलेले आहे.
नाना पाटलांचे प्रतिसरकार:
क्रांतिसिंह नाना पाटलांनी स्थापन केलेल्या प्रतिसरकारच्या स्थापनेमध्ये १९४२ या वर्षी झालेले चलेजाव आंदोलन हे फार महत्त्वाची भूमिका बजावत असते. ज्यावेळी गांधीजी यांनी १९४२ च्या मुंबई अधिवेशनात चलेजाव आंदोलन घोषित केले, त्या आंदोलनाला संपूर्ण भारतातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.
मात्र इंग्रजांनी हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी फार प्रयत्न केले. अनेक महत्त्वाच्या नेत्यांना अटक केल्यामुळे या आंदोलनाचा जोर ओसरू लागला. ही चळवळ सुरू ठेवायची असेल, तर भूमिगत राहून कार्य केले पाहिजे, असे नाना पाटलांचे मत होते. त्यामुळे त्यांनी साताऱ्याच्या परिसरामध्ये या योजनेला भूमिगत रित्या जिवंत ठेवले. पुढे या योजनेमध्ये सहभागी झालेल्या लोकांना एकत्र करून त्यांनी प्रति सरकार स्थापन केले होते.
या प्रतिसरकारच्या माध्यमातून नाना पाटलांनी नवीन युवकांची एक संघटना उभी केली, जी इंग्रज सरकार पुढे एक आव्हान म्हणून उभी राहिली होती. समाजातील वाईट प्रथा परंपरेचा बिमोड करण्याबरोबरच, जनतेला सर्व सोयी सुविधा पुरवण्यासाठी देखील हे प्रतिसरकार ओळखले जात असे.
निष्कर्ष:
स्वतंत्र्यासाठी अनेक लोकांनी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यामध्ये काही लोकांनी शांततेच्या मार्गाने, तर काही लोकांनी जहाल मतवादी मार्गांनी कार्य केलेले आहे. मात्र क्रांतिसिंह नाना पाटील यांनी या दोन्हींचा मध्य साधत विद्रोह माध्यमातून स्वातंत्र्य मिळवण्याचे कार्य केले होते. त्यांनी इंग्रजांचे अस्तित्व झुगारून स्वतः आपल्या नवीन सरकारची अर्थात प्रतिसरकारची स्थापना करून जनतेला विविध सोयी सुविधा पुरविल्या होत्या.
क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाणारे नाना पाटील यांनी राजकीय क्षेत्रामध्ये देखील महत्त्वाची क्रांती करत शेतकऱ्यांसाठी फार मोलाचे कार्य केलेले आहे. त्यांच्या विचारांचा प्रभाव आज देखील समाजावर आढळत असून, त्यांचे कार्य खूप अमर आहे. शेतकरी कामगार पक्षांमध्ये प्रवेश करत, त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी असणाऱ्या सर्व चळवळींना पाठिंबा दर्शवत इंग्रजांना भारतातून पळवून लावण्यासाठी फार कष्ट घेतले होते. अशा या क्रांतिसिंह नाना पाटलांबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती बघितली आहे.
ज्यामध्ये त्यांचे प्रारंभिक आयुष्य, व शैक्षणिक आयुष्य, सोबतच स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी दिलेले योगदान, त्यांनी केलेल्या विविध संस्थांची स्थापना, (ज्यामध्ये रयत क्रांती दलाचा समावेश होतो) सोबतच त्यांनी कृषी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या विविध सुधारणा, राजकीय क्षेत्रामध्ये दिलेले योगदान, त्यांच्या विचारांचा समाजावर झालेला प्रभाव, त्यांनी स्थापन केलेले प्रतिसरकार, इत्यादी गोष्टीबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे.
FAQ
नाना पाटलांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
नाना पाटील यांना क्रांतिसिंह किंवा प्रति सरकार या दोन नावाने देखील ओळखले जाते.
क्रांतीसह नाना पाटील यांचा जन्म कोणत्या दिवशी, व कोणत्या ठिकाणी झाला होता?
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म दिनांक १० ऑक्टोबर १९०० या दिवशी सांगलीच्या बहे बोरगाव या ठिकाणी झाला होता.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या आईचे व वडिलांचे नाव काय होते?
क्रांतीसिंह नाना पाटलांच्या आईचे नाव गोजराबाई पाटील, तर वडिलांचे नाव रामचंद्र पाटील असे होते.
क्रांतिसिंह नाना पाटलांना कोणत्या कार्यासाठी ओळखले जाते?
क्रांतिसिंह नाना पाटील यांना शेतकऱ्यांसाठी केलेल्या विशेष योगदानाकरिता, सोबत खेड्यातील लोकांच्या शिक्षणाकरिता, आणि त्यांनी स्थापन केलेल्या प्रति सरकार करिता ओळखले जाते.
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला होता
क्रांतिसिंह नाना पाटील यांचा मृत्यू दिनांक ६ डिसेंबर १९७६ दिवशी झाला होता.