जयंत नारळीकर यांची संपूर्ण माहिती Jayant Narlikar Information In Marathi

Jayant Narlikar Information In Marathi अलीकडील काळात होऊन गेलेले अतिशय दिग्गज भारतीय शास्त्रज्ञ, ज्यांनी भौतिकशास्त्र विषयांमध्ये मोलाचे योगदान देऊन भारताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे कार्य केले, असे जयंत नारळीकर त्यांच्या नारळीकर सिद्धांत करीता ओळखले जातात. प्रमाणाच्या स्थिर स्थितीच्या सिद्धांताचे जनक म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. त्यांनी सर्वसामान्य लोकांकरिता विज्ञान विषयांमध्ये अनेक योगदान देऊन, फार मोठे कार्य केलेले आहे, व विज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार देखील केलेला आहे. त्यांचे विविध भाषेवरील प्रभुत्व देखील वाखाणण्याजोगे होते.

Jayant Narlikar Information In Marathi

जयंत नारळीकर यांची संपूर्ण माहिती Jayant Narlikar Information In Marathi

एक उत्तम लेखक असणाऱ्या जयंत नारळीकर यांनी हिंदी, इंग्रजी, मराठी, यांसारख्या विविध भाषांमध्ये अनेक पुस्तके लिहिलेली असून, त्या अंतर्गत विज्ञान विषयातील अनेक महत्त्वाच्या संकल्पना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केलेले आहे.

त्यांनी भौतिकशास्त्र विषयांमध्ये केलेल्या विविध कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले असून, भारतातील अतिशय प्रतिष्ठित समजले जाणारे पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेले आहेत.

आजच्या भागामध्ये आपण या जयंत नारळीकरांबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत, त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा…

नावजयंत नारळीकर
संपूर्ण नावजयंत विष्णू नारळीकर
जन्म दिनांक१९ जुलै १९३८
जन्म ठिकाणकोल्हापूर
ओळखभारतीय भौतिक शास्त्रज्ञ
शिक्षणगणित विषयातील पीएचडी पदवी (बनारस हिंदू विद्यापीठ)
इतर कार्यवैज्ञानिक साहित्याचे लेखन
संबंधित संस्थाभारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो
मुख्य पुरस्कारपद्मभूषण आणि पद्मविभूषण
वडिलांचे नावविष्णू
आईचे नावसुमती
पत्नीचे नावमंगला
मुलींची नावेगीता, लीलावती आणि गिरिजा

दिनांक १९ जुलै १९३८ या दिवशी महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जयंत नारळीकर यांचा जन्म झाला होता. लहानपणापासूनच जयंत नारळीकर यांना घरामधून शिक्षणाचे संस्कार मिळाले होते. कारण त्यांच्या आई संस्कृत विषयांमधील अतिशय विद्वान, तर वडील बनारस हिंदू विद्यापीठामध्ये गणित विषयाचे प्राध्यापक होते.

त्यामुळे शैक्षणिक वारसा त्यांना लहानपणापासूनच लाभलेला होता. त्यांनी आपले प्रारंभिक किंवा प्राथमिक शिक्षण सेंट्रल हिंदू बॉईज स्कूल येथून पूर्ण करत, पुढे बनारस हिंदू विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला व तिथून आपली पदवी मिळवली. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून देखील गणित विषयांमध्ये अभ्यास केलेला असून, खगोलशास्त्र व भौतिकशास्त्र हे त्यांच्या फार जवळचे विषय होते.

जयंत नारळीकर यांच्या करिअरची सुरुवात:

पृथ्वी एका वायूच्या स्फोटातून निर्माण झाली, असे सिद्धांत मांडणाऱ्या जयंत विष्णू नारळीकर यांनी शास्त्रज्ञ क्षेत्रामध्ये आपली कारकीर्द फार जोमाने सुरू केली होती. त्यांनी विविध सिद्धांत मांडून, विज्ञान क्षेत्रामध्ये मोठा मैलाचा टप्पा पार पाडला होता. त्यांनी आईन्स्टाईन ने मांडलेल्या सापेक्षता सिद्धांतावर आधारित एक होयल – नारळीकर नावाचा सिद्धांत मांडून त्यामध्ये फार मोठे कार्य केले होते.

त्याचबरोबर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ठिकाणी देखील कार्य करून फार मोठे संशोधन देखील केलेले आहे. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिक्षक म्हणून देखील भूमिका पार पाडली आहे.

शास्त्रज्ञ म्हणून जयंत नारळीकर:

जगप्रसिद्ध स्टीफन हॉकिंग हे जयंत नारळीकरांच्या चांगल्या परिचयातील होते. या दोघांनी एकाच क्षेत्रातील शिक्षण घेतले असल्यामुळे त्यांची चर्चा फार रंगत असे. वयाने थोडेसे वरिष्ठ असलेले त्यांचे हे मित्र त्यांच्या संशोधन कार्यामध्ये त्यांना फार मदत करत असत.

जयंत नारळीकरांनी भारतामध्ये शिक्षण घेऊन परतल्यानंतर अनेक महत्त्वाचे कार्य केले, त्याचबरोबर भारत देशासाठी योगदान देऊन काहीतरी मोठे कार्य करावे असे त्यांना लहानपणापासूनच वाटत असे. टाटा इन्स्टिट्यूट मध्ये खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्याचबरोबर त्यांनी इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड एस्ट्रो फिजिक्स येथे संचालकपदी कार्य केलेले असून, अनेक कथा कादंबऱ्या लिहिण्यामध्ये देखील त्यांना ओळखले जाते.

जयंत नारळीकरांचे लेखन:

अनेक भाषा अवगत असणारे जनता नारळीकर लेखन कार्यामध्ये देखील फार पुढे होते. त्यांनी कृष्णविवर, धुमकेतू, नवलखा हार, यांसारख्या अनेक विज्ञान विषयातील कथा लिहून जनसामान्यांना विज्ञान विषयाविषयी जागरूक केलेले आहे. त्याचबरोबर त्यांनी उजव्या सोंडेचा गणपती, अहंकार, छुपा तारा, तरश्म, विषाणू, पोटाची भेट, यासारखे अनेक विज्ञान विषयातील लेखन देखील केलेले आहे.

जयंत नारळीकरांचे पुरस्कार:

जयंत नारळीकरांनी विनिमय क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले असून, अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा स्मित पुरस्कार त्यांना १९६२ या वर्षी प्रदान करण्यात आला होता. त्याचबरोबर ॲडम्स प्राईस देखील त्यांनी १९६७ या वर्षी मिळविले होते.

त्यांना १९७९ मध्ये शांतीस्वरूप पुरस्कार, तसेच इंदिरा गांधी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेला आहे. १९९० मध्ये कलिंग पुरस्कार प्राप्त झालेले जयंत नारळीकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी देखील ओळखले जातात. त्यांना एमपी बिर्ला पुरस्कार, भटनागर पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांसाठी ओळखले जाते.

जयंत नारळीकरांनी लिहिलेल्या कथा:

जयंत नारळीकरांना विज्ञान विषयांमध्ये फार रुची किंवा आवड होती, आणि या विषयातील ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावे याकरिता त्यांनी विज्ञान विषयाच्या ज्ञानाला कथेच्या स्वरूपात मांडलेले आहे. त्यांनी यासाठी अनेक अंतराळ संबंधात असलेल्या कथा देखील लिहिलेल्या आहेत.

ज्यामध्ये यक्षांची देणगी, अंतलातील भस्मासुर, टाईम मशीन, विषाणू, अभयारण्य, यांसारख्या कथासंग्रहांचा समावेश होतो. अतिशय सामान्य भाषेमध्ये लिहिलेल्या या कथा विज्ञान विषयावरील आहेत, असे प्रथमदर्शनी कोणाला वाटतच नाही. कारण अतिशय वेगळ्या शैलीने विज्ञान विषय हाताळणाऱ्या या जयंत नारळीकरांना लेखनाची हातोटी चांगलीच उमगली होती.

निष्कर्ष:

विज्ञान हा या संपूर्ण सृष्टीचा पाया आहे असे म्हटले जाते, आणि या विज्ञान क्षेत्रामध्ये अनेक संकल्पना असून या विज्ञानाचा आवाका फार प्रचंड मोठा आहे. मानवाने विज्ञानाच्या जोरावर अनेक गोष्टींचा शोध लावला असला, तरी देखील तो संपूर्ण सृष्टीच्या काही टक्के इतका देखील नाही.

त्यामुळे विज्ञान क्षेत्रामध्ये अनेक शोध लावण्याची मोठी संधी असून, शास्त्रज्ञांनी या क्षेत्रामध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान देऊन फार मोठे कार्य केलेले आहे. आजच्या भागामध्ये आपण जयंत विष्णू नारळीकर या भारतीय भौतिक शास्त्रज्ञ असणाऱ्या व्यक्तीबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे.

ज्यामध्ये त्यांचे चरित्र, त्यांचे बालपण, त्यांच्या करिअरची सुरुवात, शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा प्रवास, इस्त्रोमध्ये दिलेले योगदान, त्यांनी लिहिलेली विविध पुस्तके, त्यांना मिळालेले पुरस्कार, सन्मान, त्याचबरोबर त्यांच्याविषयी काही तथ्य माहिती देखील जाणून घेतली आहे.

FAQ

जयंत नारळीकर यांचे संपूर्ण नाव काय होते?

जयंत नारळीकर यांचे संपूर्ण नाव जयंत विष्णू नारळीकर असे होते.

जयंत नारळीकरांचा जन्म कोणत्या दिवशी व कोणत्या ठिकाणी झाला होता?

जयंत नारळीकर यांचा जन्म दिनांक १९ जुलै १९३८ या दिवशी महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाला होता.

जयंत नारळीकर यांनी कोणते शिक्षण घेतले होते, व ते कोणत्या विद्यापीठातून घेतले होते?

जयंत नारळीकर यांनी गणितातील पीएचडी या पदवीचे शिक्षण घेतले होते, व त्यांनी हे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठातून पूर्ण केले होते.

जयंत नारळीकर यांच्या पत्नीचे व अपत्यांचे नाव काय आहे?

जयंत नाळीकर यांच्या पत्नीचे नाव मंगला सदाशिव राजवाडे, तर त्यांच्या तीन मुलींची नावे गिरिजा, गीता व लीलावती असे आहेत.

जयंत नारळीकर यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे, व त्यांनी कोणत्या संस्थेसाठी फार कार्य केलेले आहे?

जयंत नारळीकर यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारा समजल्या जाणाऱ्या पद्मविभूषण आणि पद्मभूषण या दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले असून, त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो यासाठी फार मोठे कार्य केलेले आहे.

Leave a Comment