Handball Game Information In Marathi शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम करून घेणारा सांघिक स्वरूपातील एक खेळ म्हणून हँडबॉल ला ओळखले जाते. अगदी ऑलम्पिक स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेला हा खेळ खेळाडूंमध्ये अतिशय लोकप्रिय असून, सात खेळाडूंच्या दोन संघांद्वारे हा खेळ खेळला जातो.
हँडबॉल खेळाची संपूर्ण माहिती Handball Game Information In Marathi
ज्यामध्ये एक खेळाडू गोलरक्षक असतो, तर उर्वरित सहा खेळाडू हे खेळासाठी निवडलेले असतात. शक्यतो इन डोअर प्रकारातील असणारा हा खेळ मैदानावर देखील खेळला जाऊ शकतो. हा खेळ अतिशय पूर्वीपासून खेळला जात आलेला आहे. त्यामुळे याची लोकप्रियता फार वाढलेली आहे.
गोल करत हा खेळ खेळत असतात. या खेळामध्ये गोल करणे हे अंतिम ध्येय असते. या खेळाचे देखील मुख्य दोन प्रकार पडतात, ज्यामध्ये इन डोअर आणि आउट डोअर या प्रकारांचा समावेश होतो. या खेळाचा एक सामना एक तासांचा असतो. ज्यामध्ये पंधरा मिनिटांचे चार भाग पडतात. आजच्या भागामध्ये आपण या हँडबॉल खेळाबद्दल माहिती बघणार आहोत…
नाव | हँडबॉल |
प्रकार | खेळ प्रकार |
उपप्रकार | सांघिक खेळ |
संघांची संख्या | दोन |
संघातील खेळाडू | सात |
खेळाचा कालावधी | ६० मिनिटे |
मैदानाचे नाव | कोर्ट |
मैदानाचे आकारमान | ४० बाय २० मीटर |
हँडबॉल खेळाबद्दल ऐतिहासिक माहिती:
आज आपण ज्या खेळाला हँडबॉल म्हणून मोठ्या आनंदाने खेळतो त्याचा उगम डेन्मार्क या देशांमध्ये झाला असे संदर्भ आढळून येतात. मात्र या आधुनिक खेळाला नियमबद्ध करण्याचे कार्य १८९६ यावर्षी होलगर नेल्सन यांनी केले होते. व या नियमांची प्रसिद्धी किंवा प्रकाशन १९०६ मध्ये करण्यात आले. त्यानंतर १९१७ या वर्षी पुन्हा जर्मनी येथील मॅक्स हेजर व त्यांच्या दोन मित्रांनी आणखी नियमांची निर्मिती केली.
आंतरराष्ट्रीय सामना १९५२ या वर्षी बेल्जियम व जर्मनी यांच्यामध्ये खेळण्यात आला होता. पुढे या खेळाची लोकप्रियता बघता १९२६ मध्ये आंतरराष्ट्रीय हँडबॉल फेडरेशन या संस्थेची स्थापना करून, या खेळाला जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त करून देण्यात आले.
भारतामध्ये हा खेळ येण्यास जरा विलंबच झाला. तो भारतात १९७० यावर्षी सर्वप्रथम खेळला गेला. त्याकरिता हँडबॉल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेची देखील स्थापना करून या खेळाचे महत्व समाजामध्ये पेरण्यात आले. आज भारतासह इतर देशांद्वारे देखील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. या खेळाला १९८२ यावर्षी आशियाई खेळांमध्ये देखील सामावून घेण्यात आले.
हँडबॉल खेळाचे मैदान:
हँडबॉल खेळाच्या मैदानाची मोजमापे ही विशिष्ट स्वरूपाची असतात, ज्यामध्ये ४० मीटर लांबीचे हे मैदान रुंदीला मात्र २० फूट असते, जेणेकरून एक आयताकृती मैदान तयार होते. या मैदानाच्या अगदी मध्यभागी एक गोल पोस्ट बनवला जातो, व त्याकडेने गोल रेषा आखली जाते. खेळताना चेंडू मागे जाऊ नये म्हणून जाळी देखील बांधण्यात येत असते. या मैदानाला दोन समान भागांमध्ये विभागणी करून दोन खेळाडू संघांना याचे वाटप केले जाते.
हँडबॉल खेळाचे स्वरूप:
हँडबॉल हा एक अनोख्या स्वरूपाचा खेळ असून, दोन संघ मैदानामध्ये समान अंतरावर उभे असतात. खेळ सुरू करण्याची सूचना मिळताच विरुद्ध संघाचा गोल वर चेंडू मारण्याचे कार्य सुरू केले जाते. जोपर्यंत वेळ संपत नाही, तोपर्यंत हे कार्य सुरू असते.
या संपूर्ण खेळाच्या दरम्यान जो संघ जास्तीत जास्त गोल करेल, त्या संघाला विजयी घोषित केले जाते. मात्र वेळ संपेपर्यंत दोन्ही संघाचे गोल सारखे असतील, तर पुन्हा पाच मिनिटांचा कालावधी दिला जातो. व या पाच मिनिटांच्या कालावधीमध्ये जो संघ जास्तीत जास्त गोल करेल, त्या संघाला विजयी म्हणून घोषित केले जाते.
हँडबॉल खेळाचे नियम:
- या खेळामध्ये गोल करताना काही मर्यादा पाळाव्या लागतात, तसेच सीमारेषेच्या मर्यादे मध्ये राहूनच गोल करावा लागतो.
- एक खेळाडू केवळ तीन सेकंदात चेंडू स्वतःकडे ठेवू शकतो, जास्त वेळ ठेवल्यास तो नकारात्मक गुणासाठी पात्र असतो.
- तीन मीटर अंतरावरून गोल केला पाहिजे.
- एखाद्या संघातील खेळाडूने गैरवर्तन केल्यास, त्याला दोन मिनिटं करिता संघाच्या बाहेर केले जाऊ शकते.
- जोपर्यंत खेळाडूच्या हातामध्ये चेंडू आहे, तोपर्यंत तो सात मीटर रेषेला स्पर्श करू शकत नाही.
- रेफरीने शिटी वाजवल्यानंतर तीन सेकंदाच्या आत चेंडू फेकावा लागतो, अन्यथा नकारात्मक गुण मिळत असतात.
- गोल क्षेत्रामध्ये केवळ गोलकीपरलाच येण्याची परवानगी देण्यात आलेली असते.
- खेळाडूंना त्यांच्या केवळ गुडघ्याच्या वरील भागाला स्पर्श करण्याची परवानगी असते.
आज सर्वत्र लोकप्रियतेने खेळला जाणारा खेळ अर्थात हँडबॉल चा शोध कार्ल शैलेंज यांनी लावला असे सांगितले जाते. त्यांनी या खेळाचा शोध १९१९ या वर्षी लावला, असे देखील काही ठिकाणी पुरावे आढळतात. त्याचबरोबर भारतामधील या खेळाचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते ते रोहतक येथील असले तरी देखील मद्रासच्या वाय एम सी ए या महाविद्यालयामध्ये शिकलेले होते. त्यांची निवड हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या पहिल्या महासचिव पदी देखील करण्यात आलेली होती. त्यांनी हँडबॉल आणि तत्सम खेळाच्या लोकप्रियतेकरिता भारतामध्ये फार मोठे प्रयत्न केलेले आहेत.
या हँडबॉल खेळामुळे खेळाडू अतिशय चपळ होण्याबरोबरच त्याचे स्नायू देखील बळकट होण्यास मदत मिळत असते. सोबतच त्याचा स्टॅमिना देखील वाढत असतो. हृदयाशी व रक्तवाहिनेशी संबंधित आजार देखील बरे होतात.
निष्कर्ष:
खेळ म्हटलं की प्रत्येकाच्या अंगामध्ये वेगळाच उत्साह संचारत असतो. खेळ खेळल्यामुळे प्रत्येक जण उत्साही होण्याबरोबरच, तणाव मुक्त देखील होत असतो. खेळ हा मानवाच्या आयुष्यामध्ये अतिशय फायदेशीर असून, या खेळामुळे मानवाच्या व्यक्तिमत्त्वाची जडण घडण देखील होत असते.
यातून नेतृत्व गुण, सांघिक कौशल्य, यांसारख्या गुणांचा विकास होण्याबरोबरच व्यक्ती अतिशय प्रॅक्टिकल विचार करण्यास देखील सक्षम होत असतो. त्याचबरोबर शारीरिक स्तरावर देखील व्यक्तीचा चांगला विकास होत असतो, त्यामुळे खेळ खेळल्यामुळे प्रत्येकाला हलके वाटत असते. आणि हेच कारण आहे की प्रत्येकाला खेळ खेळावासा वाटतो.
आजच्या भागामध्ये आपण याच खेळ प्रकारातील एका खेळाबद्दल अर्थात हँडबॉल खेळाबद्दल माहिती बघितली आहे. हा खेळ कसा उत्क्रांत झाला, त्याचा इतिहास काय आहे, खेळाच्या मैदाना बद्दल माहिती, त्याची मोजमापे, हा खेळ कसा खेळतात, खेळ खेळण्याकरिता काय नियम असतात, त्याचबरोबर खेळासाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती बघितलेली आहे. हा लेख तुमच्यासाठी खूपच ज्ञानवर्धक ठरला असेल, असे समजायला हरकत नाही.
FAQ
हँडबॉल या खेळाचे स्वरूप कसे आहे?
हँडबॉल या खेळाचे स्वरूप सांघिक प्रकारचे असून, तो मैदानी स्वरूपात किंवा घरगुती स्वरूपात खेळला जाऊ शकतो.
हँडबॉल खेळासाठी किती मिनिटांचा कालावधी दिला जातो?
हँडबॉल खेळासाठी सुमारे ६० मिनिटांचा अर्थात एक तासाचा कालावधी दिला जातो. ज्याला पुन्हा अर्ध्या अर्ध्या तासांमध्ये विभागले जाते. या अर्ध्या तासांच्या स्लॉटला देखील विश्रांती करिता पंधरा मिनिटांमध्ये विभागलेले असते.
हँडबॉल खेळामध्ये किती संघ खेळत असतात, व या संघामध्ये खेळाडूंची संख्या किती असते?
हँडबॉल खेळामध्ये सुमारे दोन संघ खेळत असतात, त्यातील खेळाडूंची संख्या सात इतकी असते. आणि या सात पैकी एक खेळाडू गोलकीपर तर उर्वरित सहा खेळाडू सामान्य असतात.
हँडबॉल खेळाच्या मैदानाचे मोजमाप किंवा आकार कसा असतो?
हँडबॉल या खेळाच्या मैदानाची मोजमापे ही लांबीला ४० मीटर तर रुंदीला २० मीटर असे आयताकृती असते.
हँडबॉल हा खेळ किती देशांमध्ये खेळला जातो?
जगाच्या पाठीवर अस्तित्वात असणाऱ्या सुमारे १८० हूनही जास्त देशांमध्ये हा हँडबॉल खेळला जातो. ज्या अंतर्गत सुमारे १९ दशलक्ष लोकांना मनोरंजन प्राप्त होत असते.