मासा प्राण्याची संपूर्ण माहिती Fish Animal Information In Marathi

Fish Animal Information In Marathi लहानपणी चित्रकला शिकताना तुम्ही मासा काढण्यापासून सुरुवात नक्कीच केली असेल. एक जलचर प्राणी ज्याला दोन पर असतात, तो मोठ्या प्रमाणावर समुद्रामध्ये तसेच गोड्या पाण्यामध्ये देखील आढळून येत असतो. किनाऱ्याच्या कडेला आढळणाऱ्या प्राण्यांना खाद्य मासे म्हणून ओळखले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून माशांना खाद्य संस्कृतीमध्ये स्थान देण्यात आलेले आहे. 

Fish Animal Information In Marathi

मासा प्राण्याची संपूर्ण माहिती Fish Animal Information In Marathi

जगभराचा विचार केल्यास सुमारे २८,५०० विविध प्रजाती असणारे हे मासे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. अगदी हाताच्या करंगळी पासून महाकाय जहाजापर्यंत या माशांचा आकार आढळू शकतो. पाण्यामध्ये अतिशय चपळतेने पोहू शकणारे हे प्राणी पाण्याबाहेर काढले असता तडफडून मृत्यू पावत असतात. आजच्या भागामध्ये आपण मासा या जलचर प्राण्याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावमासा
इंग्रजी नावफिश
प्रकारप्राणी
उपप्रकारजलचर प्राणी
क्लेडऑलफॅक्टोरिअस
क्लासेसहाडयुक्त मासा, जबडाहिन मासा व किरणपंख्य मासा

माशांची विविध वैशिष्ट्ये:

 • मासा हा पाण्यामध्ये राहणारा जलचर प्राणी असून, त्याचे शरीरामध्ये असणाऱ्या हाडांनुसार विविध प्रकार पडले जातात.
 • मासा हा एक थंड रक्ताचा प्राणी आहे.
 • माशांना त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा उपलब्ध नसते.
 • शार्क सारखे काही मासे उष्ण रक्ताचे असतात.
 • काही मासे हे केवळ गोड्या पाण्यामध्ये जगतात, तर काही मासे केवळ खाऱ्या पाण्यामध्ये जगतात.
 • मासे पाण्यामध्ये असणारा ऑक्सिजन श्वसनासाठी वापरण्यास सज्ज असतात. यासाठी त्यांच्या शरीरावर गिल नावाचा अवयव असतो.
 • माशांचे मूत्रक्षय अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असते, आणि पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगायचे असेल तर ते यामध्ये हवा भरत असतात.
 • मासा हा प्राणी अतिशय चपळ स्वरूपाचा आहे, व अन्न मिळवण्याच्या वेळी ते अतिशय संवेदनशील रित्या हालचाली करत असतात.
 • माशांच्या शरीरावर असणाऱ्या पंखांच्या जोड्या त्यांना दिशा बदलण्यासाठी मदत करत असतात  तसेच पोहण्यासाठी देखील त्याचा फायदा होत असतो.

माशांचे निवासस्थान:

मासा हा प्राणी पाण्यामध्ये राहतो हे आपल्याला माहितीच आहे. मात्र त्यातही त्यांच्या शरीराच्या आवश्यक तापमानानुसार व ऑक्सिजनच्या गरजेनुसार हे प्राणी पाण्याच्या विविध खोलींवर राहत असतात. अनेक माशांचे प्रजाती जास्त खोल पाण्यामध्ये राहणे पसंत करत असल्या, तरी देखील लहान मासे किनाऱ्याच्या कडेलाच राहणे पसंत करतात.

काही प्राणी केवळ नदीमध्येच आढळून येतात, तर काही समुद्रासारख्या खोल पाण्यामध्ये आपले जीवन व्यतीत करत असतात. काही माशांच्या प्रजाती या केवळ एका प्रकारच्या समुद्रामध्येच आढळून येतात. ज्या इतरत्र कुठेही आढळत नाही.

सिल्वर फिष सारख्या प्रजाती केवळ दक्षिण महासागरामध्येच अर्थात अंटार्टिका खंडाजवळच आढळून येतात. दलदलीच्या प्रदेशामध्ये देखील काही प्रकारच्या माशांच्या प्रजाती राहत असतात, ज्यामध्ये मिनो, बफिन, यांसारखा प्रजातींचा समावेश होतो.

मानवी जीवनामध्ये माशांचे महत्त्व:

फार पूर्वीच्या काळापासून मानवाचे आणि माशांचे एक वेगळेच नाते तयार झालेले आहे.  मासा हा मानवासाठी अन्न म्हणून फार महत्त्वाचा आहे.माशांमुळे मानवाला मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झालेला आहे. त्यामुळे कोळी बांधवांच्या घर खर्चाला हातभार लागत असतो.

आरोग्याच्या दृष्टीने देखील मासे फारच उपयोगी असून, काही प्रकारच्या माशांना पाळल्यामुळे अनेक आजार पसरवणारे जिवाणू व विषाणू नियंत्रित केले जाऊ शकतात. या मध्ये गप्पी प्रजातीच्या माशांचा समावेश होतो. मासा हा प्राणी चरबीने अतिशय युक्त असतो. त्यामुळे हृदयरोग किंवा रक्तवाहिन्यांच्या संदर्भातील आजारांमध्ये माशांचा फार मोठा वापर केला जातो.

माशांपासून विविध शोभिवंत वस्तू लाकडाचे पॉलिशिंग, दागदागिने, त्याचबरोबर सौंदर्यप्रसाधने बनविले जातात. त्याचबरोबर विविध प्रकारच्या औषधांमध्ये देखील माशांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मासा हा किनारपट्टीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे व रोजगाराचे एक महत्त्वाचे साधन म्हणून फायदेशीर आहे.

मासा या प्राण्याबद्दल तथ्य माहिती:

 • बॉक्स जेलीफिश नावाचा मासा सर्वात घातक म्हणून ओळखला जातो. याच्या केवळ स्पर्शाने देखील मृत्यू ओढावला जाऊ शकतो.
 • भारताने डॉल्फिन माशाला राष्ट्रीय माशाचा दर्जा दिलेला आहे.
 • मासा हा प्राणी देखील गटाने राहत असतो. या माशांचा एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा एक विशिष्ट संकेत असतो. पक्षांप्रमाणेच हे मासे एका माशामागे चालत असतात.
 • मासा हा थंड रक्ताचा प्राणी आहे, ज्याला तापमानाशी जुळवून घेता येत नाही.
 • पाण्यामधील सर्वात जास्त चपळ किंवा वेगवान प्राणी म्हणून माशांना ओळखले जाते.
 • माशांमधील सर्वात वेगवान मासा म्हणून सेल फिश ओळखला जातो. जो सुमारे १०० किलोमीटर प्रति तास या वेगाने जात असतो.
 • व्हेल शार्क मासा जागतिक पातळीवरील सर्वात व वजनदार प्राणी म्हणून ओळखला जातो.
 • माशांच्या प्रजातीमध्ये सर्वात जास्त प्रकारच्या प्रजाती अंडी घालून पिलांना जन्म देत असतात, मात्र काही प्रजाती अपत्याला जन्म देखील देत असतात.
 • ऑस्ट्रेलियन लंग फिश हा मासा ६५ वर्ष वयासह सर्वात वयस्कर मासा म्हणून ओळखला जातो.
 • एका अहवालानुसार एक शार्क मासा आपल्या संपूर्ण जीवनामध्ये तब्बल १२ व्यक्तींना मारत असतो.
 • मासा हा असा प्राणी आहे जो संपूर्ण आयुष्यात कधीही डोळे बंद करू शकत नाही, अगदी तो झोपलेला असताना देखील.
 • व्हेल शार्क या माशाला सुमारे ४००० पेक्षा देखील जास्त दात असतात.
 • महागड्या लिपस्टिक मध्ये माशांच्या चरबीचा वापर केलेला असतो.

निष्कर्ष:

मासा हा एक जलचर प्राणी आहे हे आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे. करंगळी पासून या प्राण्यांचा आकार सुरू होत असतो. शक्यतो एक ते दीड फूट लांबीपर्यंतचे मासे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जातात. मासा हा एक अतिशय उत्तम खाद्य प्रकार असून, प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून माशाकडे बघितले जाते. त्याचबरोबर अनेक आजारांमध्ये मासा खाणे सांगितले गेलेले आहे.

मासा हा प्राणी पाण्याबाहेर काढले असता, मृत्यू पावत असतो. माशांचे फार मोठ्या प्रमाणावर प्रकार पडत असतात. आपण समुद्रकिनारी फिरायला गेल्यास आपल्याला लक्षात राहणार नाहीत इतक्या प्रकारचे माशांचे प्रकार बघायला मिळत असतात. याचे आकार देखील वेगवेगळे असतात. त्याचबरोबर चव, राहण्याचे ठिकाण, आवश्यक पाण्याचे प्रकार देखील फार वेगवेगळे असतात.

आजच्या भागामध्ये आपण मासा या प्राण्याविषयी संपूर्ण माहिती बघितली असून, मासा म्हणजे काय, मासा या प्राण्याची विविध वैशिष्ट्ये, मासा गटामध्ये पाण्यात राहून देखील अपवाद असणारे प्राणी, मासा प्राण्यांमध्ये गर्भधारणा व प्रजननाची प्रक्रिया, माशांची उत्क्रांती, माशांचे विविध प्रकार, त्यांचे कोणत्या पाण्यामध्ये वाढ होते यानुसार पडणारे विविध प्रकार, माशांचे संवर्धन करण्याची आवश्यकता, माशाचे मानवी जीवनामध्ये महत्त्व, आणि मासा या प्राण्याबद्दल असणारे विविध मनोरंजक तथ्य इत्यादी माहिती बघितलेली आहे.

FAQ

माशाची सर्वात मोठी प्रजाती म्हणून कोणत्या माशाला ओळखले जाते?

माशाची सर्वात मोठी प्रजाती म्हणून शार्क या माशाला ओळखले जाते.

मासा हा प्राणी साधारणपणे कोठे आढळून येतो?

मासा हा प्राणी पाण्यामध्ये राहण्यासाठी ओळखला जातो, मात्र काही मासे हे केवळ गोड्या पाण्यामध्ये राहू शकतात, तर काही मासे केवळ खाऱ्या पाण्यामध्ये राहू शकतात.

भारतातील कोणत्या नदीमध्ये सर्वात जास्त माशांच्या प्रजाती आढळून येतात?

भारतातील गंगा या नदीमध्ये सर्वात जास्त माशांच्या प्रजाती आढळून येतात.

सन फिश ही माशांची प्रजाती प्रतिवर्षी किती अंडी घालण्यासाठी ओळखली जाते?

सनफिश ही माशांची प्रजाती प्रत्येक वर्षाला सुमारे ३०० दशलक्ष इतक्या मोठ्या प्रमाणावर अंडी घालत असते.

माशांच्या चरबीचा वापर कोणत्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो?

माशांच्या चरबीचा वापर हा लिपस्टिक सारख्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.

Leave a Comment