हरीण प्राण्याची संपूर्ण माहिती Deer Animal Information In Marathi

Deer Animal Information In Marathi अतिशय भित्रा आणि चपळ असणारा चतुष्पाद प्राणी म्हणून हरणाला ओळखले जाते. हा एक रवंथ करणाऱ्या गटातील प्राणी असून, त्याला दोन गटात विभागले जाते. त्यातील एका गटांमध्ये हरिण आणि चितळ तर दुसऱ्या गटामध्ये रेनडियर आणि रो हरीन इत्यादींचा समावेश होतो.

Deer Animal Information In Marathi

हरीण प्राण्याची संपूर्ण माहिती Deer Animal Information In Marathi

हरणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या डोक्यावर असणारे शिंगे दरवर्षी पडत असतात, आणि पुन्हा नवीन शिंगे उगवली जात असतात. मादी हरणांना शिंगे नसतात, तर केवळ नर हरीनांनाच शिंगे असतात. आजच्या भागामध्ये आपण एक वैशिष्ट्यपूर्ण प्राण्याबद्दल, अर्थात हरणाबद्दल माहिती बघणार आहोत…

नावहरीण
प्रकार प्राणी
इंग्रजी नावडियर
साधारण वेग ६० ते ८० किलोमीटर प्रति तास
गर्भधारणा कालावधी२२२ दिवस
गटएनिमलिया
हायर क्लासिफिकेशनपेकोरा
साधारण उंची८५ ते १४० सेंटीमीटर
शास्त्रीय नावसर्ववाडा
कुटुंब किंवा कुळसर्विडे

सस्तन गटातील रवंथ करणारा चपळ प्राणी म्हणून हरीण ओळखले जाते. शाकाहारी असून देखील हरीण अतिशय चपळ स्वरूपाचा असतो. त्याचे शरीर रचना वैशिष्ट्यपूर्ण असून, त्याला मोठे डोळे आणि सुंदरशी त्वचा लाभलेली असते. या प्राण्याची शिंगे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून, जणू एखादे वाळलेले झाड आहे असेच भासत असते.

हरीन पळत असताना उड्या मारत जात असते. त्याची उडी फारच लांब अर्थात दहा फुटापर्यंत देखील असते. त्यामुळे या हरीणाला चांगला वेग धारण करण्यास मदत होते. जो साधारणपणे ६० ते ८० किलोमीटर प्रतितास इतका असतो. पृथ्वीवरील अंटार्टिका व ऑस्ट्रेलिया या दोन खंडांना वगळले, तर इतरत्र सर्वच ठिकाणी या हरणांची संख्या आढळून येते.

अतिशय वैशिष्ट्यपूर्ण डोळे असणारे हे हरीण कानांच्या बाबतीत देखील अतिशय तीक्ष्ण असते. त्यामुळे त्यांना खूप स्पष्टपणे आवाज ऐकू येत असतात. त्याचबरोबर यांची वास घेण्याची क्षमता देखील प्रचंड चांगली असते.

हरणांमधील नराला मादीला आकर्षित करण्याकरिता अतिशय छान शिंगे असतात. ज्यावेळी मादी सोबत मिलन करायचा कालावधी येईल, त्यावेळी मादीला मिळवण्याकरिता नर हरीन एकमेकांशी संघर्ष करत असतात.

हरिणांचे गट:

वर बघितल्याप्रमाणे हरिण हे दोन गटांमध्ये विभागले गेले आहे, असे आपल्याला माहितीच आहे. ज्यामध्ये सर्विडे आणि कॅप्रेओलीना या गटांचा समावेश होतो. यातील सरवडे गटामध्ये चितळ, फॉलो हरीण, वाटीपी आणि मुंटजॅक यांचा तर कॅप्रेओलीना गटामध्ये रो हरीन, रेनडियर आणि मुसं या प्राण्यांचा समावेश होतो.

हरीण प्राण्याची शरीररचना:

हरीण प्राण्याची शरीररचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून, त्याला चार पाय असतात. तसेच एक लहानशी शेपटी देखील असते. दोन कान आणि तोंड असणारा हा प्राणी डोळ्यांच्या बाबतीत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतो. दिसायला सडपातळ असणारे हरिणाचे पाय खूपच मजबूत स्वरूपाचे असतात.

ज्याचा वापर करून ते अतिशय तीव्र वेगाने धावू शकतात. तसेच उंचावरून उडी मारली तरी देखील त्यांना समस्या जाणवत नाहीत, त्यामुळे ते सुमारे दहा फूट लांब उडी देखील मारू शकत असतात. या हरणांच्या डोक्यावर शिंगे दिलेली असतात या शिंगांबद्दल विशेष सांगायचे झाल्यास अगदी सिंहाचे हाड मोडू शकेल इतके शक्तिशाली हे शिंगे असतात. हरिण प्राण्याचे डोळे अतिशय मोठे व सुंदर असतात.

हरीण प्राण्याचा आहार:

आपल्या सर्वांना माहिती आहे की हरीण हा प्राणी शाकाहारी गटातील आहे. त्यामुळे तो नेहमी वनस्पतीजन्य आहार घेण्यास प्राधान्य देत असतो. हरीण हा प्राणी हिवाळा, उन्हाळा, आणि पावसाळा अशा वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचा आहार घेत असतो.

उन्हाळ्यामध्ये त्याच्याकडून फळे, गवत, झाडांची पाने आणि फुले इत्यादी गोष्टी खाल्ल्या जातात. तर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला चांगले पोषण मिळावे, याकरिता तो झाडांच्या फांद्या किंवा साल देखील कुरतडून खात असतो. जेणेकरून त्याला थंडीच्या दिवसांमध्ये उष्ण राहण्यास मदत मिळते.

हरिण प्राण्याची राहण्याची ठिकाणे:

हरिण हा प्राणी काहीसा घाबरट स्वरूपाचा असतो, त्यामुळे तो शक्यतो मानवी वस्तीमध्ये येण्यास धजावत नाही. हा प्राणी कोणत्याही परिस्थितीमध्ये तग धरू शकतो. मुख्यतः गवताळ प्रदेशात वास्तव्य करणे या हरीणांना खूपच आवडत असते. हरीण कळप करून राहत असतात, आणि या कळपांनी आपला एरिया किंवा क्षेत्र वाटून घेतलेले असते. त्यामुळे ते एकमेकांच्या परिसरामध्ये शक्यतो प्रवेश करत नाहीत. या परिसराचा विस्तार सुमारे ३० किलोमीटर पर्यंत असतो.

हरीण प्राण्याची जीवनशैली:

हरीण हा प्राणी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असून, तो मनमोकळ्यापणाने जीवनशैली जगत असतो. अतिशय चपळ असला तरी देखील खेळकर वृत्ती या हरणामध्ये दिसून येते. पिवळसर तपकिरी रंगाचे असणारे हे हरीण, शरीरावर वेगवेगळ्या पट्ट्यांनी आच्छादलेली असतात.

त्याचबरोबर ज्यावेळी हरणाचे पिल्लू जन्माला येते, तेव्हा त्याच्या शरीरावर एक पांढरा ठिपका दिसून येतो. ज्यामुळे त्यांना शत्रूपासून बचाव करणे अतिशय सोपे होत असते. मात्र त्याच्या वाढत्या वयानुसार हा पांढरा डाग किंवा ठीपका लोप पावत असतो.

कस्तुरी मृगाची माहिती:

हरिणांची एक कस्तुरी मृग नावाची प्रजाती असते. जी मुख्यतः नर स्वरूपाची असून, त्यांच्या पोटामध्ये एक ग्रंथी असते. ज्याला कस्तुरी ग्रंथी म्हणून ओळखले जाते, ज्यापासून सुंदर सुवास निर्माण होत असतो. खरे तर या ग्रंथी पासून एक प्रकारचा स्त्राव स्त्रावत असतो जो अतिशय छान सुगंध सोडत असतो.

एक हरणाच्या पोटातून २८ ग्रॅम कस्तुरी मिळवली जाऊ शकते. ज्यापासून विविध सुगंधी उत्पादने बनवली जात असतात. त्यामध्ये उटणे, साबण, तेल, अत्तर, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. त्यामुळे या हरिणांची शिकार फार मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

निष्कर्ष:

शक्यतो जंगलामध्ये आढळणारे हरीण हे प्राणी शेतामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आढळत असते. दिसायला अतिशय आकर्षक असले, तरी देखील शेताचे नुकसान करण्यासाठी देखील हे प्राणी ओळखले जातात. शेतकरी या प्राण्यांना बऱ्याचदा कंटाळत देखील असतात, मात्र हे प्राणी शक्यतो कोणाच्याही हाती लागत नाहीत.

असेच चपळ आणि भित्र्या स्वरूपाचा असल्यामुळे, हा प्राणी उड्या मारत इकडून तिकडे फिरत असतो. या प्राण्याची देखील उडी फार मोठी असते. या प्राण्यांना शिंगे असतात, मात्र ही शिंगे केवळ नर प्राण्यांमध्ये आढळत असतात. या प्राण्यांच्या बेंबी मध्ये कस्तुरी नावाचा एक पदार्थ असतो, असे सांगितले जाते. मात्र ही केवळ एक अफवा आहे.

आजच्या भागामध्ये आपण याच हरीण प्राण्याविषयी माहिती बघितली आहे. यामध्ये हरणाशी संबंधित काही गुणधर्म, त्याचे विविध गट, शरीर रचना, त्याचा आहार, त्याची राहण्याची ठिकाणे, हरणाचा रंग, तो कोणत्या प्रकारची जीवनशैली जगत असतो, हरणाच्या वेगवेगळ्या प्रजाती, आणि हरणांना लाभलेले आयुष्य, इत्यादी बाबींवर माहिती बघितली आहे.

FAQ

हरीण या प्राण्याला इंग्रजी भाषेमध्ये व शास्त्रीय भाषेमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

हरीण या प्राण्याला इंग्रजी भाषेमध्ये डियर, तर शास्त्रीय भाषेमध्ये सर्ववाडा या नावाने ओळखले जाते.

हरीण हा प्राणी साधारणपणे किती वेगाने धावू शकतो?

हरीण हा प्राणी देखील धावण्याच्या बाबतीत चपळ प्राणी समजला जातो. जो सुमारे ६० ते ८० किलोमीटर प्रति तास या वेगाने धावू शकतो.

हरिण प्राण्यांची उंची साधारणपणे किती असते?

हरीण या प्राण्याची साधारण उंची ही ८५ सेंटीमीटर पासून १४० किंवा १५० सेमी समजली जाते.

हरीण प्राण्यांमधील गर्भधारणेचा कालावधी साधरण किती दिवसांचा असतो?

हरण प्राण्यांमधील गर्भधारणेचा कालावधी साधारणपणे २२२ दिवसांचा असतो.

हरणांच्या शिंगा बद्दल काय वैशिष्ट्य सांगता येईल?

हरणांच्या शिंगाबद्दल वैशिष्ट्ये सांगायचे झाले, तर हरणांची शिंगे ही दरवर्षी पडून पुन्हा नव्याने उगवत असतात. त्याचप्रमाणे ही शिंगे केवळ नर हरीनालाच असतात मादी हरीनाला नाही.

Leave a Comment