क्रिस्टियानो रोनाल्डो यांची संपूर्ण माहिती Cristiano Ronaldo Information In Marathi

Cristiano Ronaldo Information In Marathi कुठल्याही गोष्टीसाठी प्रयत्न केले तर या जगात अशक्य असे काहीच नाही. त्याची प्रचिती देणारा खेळाडू म्हणजे रोनाल्डो होय. लहानपणापासूनच फुटबॉल च्या ध्येयाने वेडा झालेला हा खेळाडू फुटबॉलला आपला देव समजत असे. आणि फुटबॉल खेळ खेळत त्याने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीच राष्ट्रीय संघासाठी खेळून आपली कामगिरी दाखवली होती.

Cristiano Ronaldo Information In Marathi

क्रिस्टियानो रोनाल्डो यांची संपूर्ण माहिती Cristiano Ronaldo Information In Marathi

आज रोनाल्डो या खेळाडूला संपूर्ण जग ओळखते, मात्र या उंचीवर पोहोचण्यासाठी त्यांनी खूप मोठे कष्ट घेतलेले आहेत. त्याच्यामागे त्याचे सातत्य, कष्ट, जिद्द, चिकाटी, इत्यादी गुण आहेत. सुरुवातीला इतका प्रसिद्ध नसणारा हा खेळाडू आपल्या आवडीच्या खेळाबद्दल खूपच उत्साही होता, त्यामुळे तो फुटबॉलसाठी काहीही करायला तयार असे.

आज मीतिला जगातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंची नाव घेतले तर प्रथम क्रमांकावर रोनाल्डो चे नाव दिसते. त्याचबरोबर सर्वात प्रसिद्ध आणि फुटबॉल च्या क्षेत्रामध्ये सर्वात उत्तम खेळाडू म्हणून देखील त्याचे नाव घेतले जाते. आजच्या भागामध्ये आपण या रोनाल्डो बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत, व त्याच्या जीवनाबद्दल जाणून घेणार आहोत…

नाव रोनाल्डो
संपूर्ण नाव क्रिस्टियानो रोनाल्डो डोस सेंटॉस एव्हरो
जन्म दिनांक५ फेब्रुवारी १९८५
जन्म देशपोर्तुगाल
इतर नावेसी आर, रॉनि, सी आर ७,  द सुलतान ऑफ द स्टेप ओव्हर, क्राय बेबी,
ओळखउत्कृष्ट स्ट्रायकर फुटबॉलपटू
सध्याचे वय३९ वर्ष

क्रिस्टियानो रोनाल्डो बद्दल प्रारंभिक माहिती:

अतिशय गरीब घरामध्ये रोनाल्डो चा जन्म झाला, तो दिनांक ५ फेब्रुवारी १९८५ हा होता. त्याची आई गृहिणी तर वडील मुन्सिपल ऑफिसमध्ये माळी काम करत असे. रोनाल्डो हा त्यांच्या आई-वडिलांचा सर्वात लहान मुलगा होता.  त्याला दोन बहिणी व एक भाऊ होता.

वडिलांप्रमाणेच रोनाल्डोला देखील चार मुले आहेत. ज्याच्या सर्वात मोठ्या मुलाला ज्युनिअर रोनाल्डो म्हणून देखील ओळखले जाते. त्याचे सर्वात पहिले आपत्य १७ जून २०१० या दिवशी जन्माला आले होते. त्यांनी आपल्या पत्नीची ओळख आजपर्यंत उघड केलेली नसली, तरी देखील त्याच्या मुलाबद्दल तो माहिती सांगत असतो. त्याच्या इतर मुलांची नावे इवा मारिया, माटेओ, आणि अलाना मार्टिनेज आहेत.

रोनाल्डो चे शैक्षणिक आयुष्य:

रोनाल्डो हा अतिशय गरीब घराण्यातील विद्यार्थी होता. तो सुरुवातीच्या काळामध्ये शाळेत जात असला, तरी देखील तेथे वयाच्या चौदाव्या वर्षी त्याचा त्याच्या शिक्षकांसोबत वाद झाला होता. परिणामी त्यांनी त्याच्या शिक्षकांवरच खुर्ची फेकून मारली होती.

या घटनेनंतर त्याला शाळेतून काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी कधीही दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेतला नाही, व आपली लहानपणापासून असणारी फुटबॉल खेळण्याची आवड जोपासली. फुटबॉल या क्षेत्रामध्येच काहीतरी करायचे या ध्येयानेच त्यांनी आपले शिक्षण थांबविले होते.

त्याच्या आईने देखील फुटबॉल खेळण्याला त्याला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर नियमित सराव, आणि प्रयत्नाच्या जोरावर त्यांनी फुटबॉल क्षेत्रामध्ये चांगली पकड मिळवली, आणि वयाच्या १८ व्या वर्षीच त्यांनी राष्ट्रीय संघात प्रवेश घेतला.

रोनाल्डो चा वैयक्तिक आयुष्य बद्दल माहिती:

रोनाल्डो हा वैयक्तिक आयुष्यात अतिशय शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. त्याच्या वडिलांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या नावावरून त्याचे नाव ठेवले होते. रोनाल्डो गरीब घरामध्ये वाढल्यामुळे, त्याला लहानपणापासूनच प्रत्येक गोष्टीसाठी तडजोड करावे लागत असे. यातून त्याच्या आनंदाचा मार्ग म्हणून तो फुटबॉल कडे बघत असे.

लहानपणापासूनच आपल्या सवंगड्यांसोबत फुटबॉल खेळता खेळता त्यांनी या फुटबॉलमध्ये खूप प्राविण्य मिळवले होते. त्याला इतर कुठल्याही गोष्टी आवडत नव्हती. तो केवळ सतत फुटबॉल खेळत असे. त्याच्या या फुटबॉल खेळाच्या आवडीला त्याच्या आईने नेहमीच पाठिंबा दर्शवला होता.

वडील मात्र त्याच्या खेळण्याकडे फारसे लक्ष देत नसत. त्याच्या वडिलांना मद्य प्राशनाचा छंद होता, त्यामुळे वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी रोनाल्डो वरून त्याचा वडिलांची छत्र छाया हरपली गेली. पुढे त्याच्या आईला देखील कर्करोग असल्याचे निदान झाले, त्यामुळे रोनाल्डो वर दुःखाचे डोंगरच कोसळला. त्यातून सावरत त्याने आईच्या उपचाराकरिता सर्वकाही केले, आणि आर्थिक मदत देखील केली. त्यांनी इसवी सन १९९२ पासून १९९५ पर्यंत फुटबॉल क्षेत्रातील एका संघाचे सदस्यत्व देखील भूषविले होते.

रोनाल्डो चे फुटबॉल क्षेत्रातील विक्रम:

फुटबॉल क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा बॅलेन डी ओर हा पुरस्कार तब्बल पाच वेळा पटकावणारा क्रिस्टियानो हा एकटाच खेळाडू ठरलेला आहे. वर्ल्ड सॉकर प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार देखील त्यांनी तब्बल पाच वेळा जिंकून, एक ऐतिहासिक नोंद केलेली आहे. एकापाठोपाठ एक ४० सीजन मध्ये गोल करण्याचा विक्रम देखील रोनाल्डो च्या नावे आहे.

रोनाल्डो हा खेळाडू अतिशय सकारात्मक विचारांचा असून, तो नेहमी जगभरातील लोकांना प्रेरणा देण्यासाठी ओळखला जातो. त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टींमध्ये सर्वोत्कृष्ट असा किंवा नसा मात्र तुमच्या मध्ये आत्मविश्वास हवा. आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही कुठल्याही अवघड कामाला सहज साध्य करू शकता, आणि जागतिक पातळीवर तुम्ही त्यातील अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती होऊ शकतात. अशा या सकारात्मक विचाराच्या ख्रिस्तीयानो रोनाल्डोला फुटबॉल क्षेत्रातील अव्वल दर्जाचा व्यक्ती म्हणून ओळखले जाते.

निष्कर्ष:

प्रत्येकाने आपले करिअर लहानपणीच निवडले, तर त्या क्षेत्रामध्ये फार मोठे नाव करता येते. याची अनेक उदाहरणे आपल्याला आसपास बघायला मिळतात. ज्या व्यक्तीने लहानपणापासूनच एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन त्या साठी प्रयत्न केले. त्यांनी अवघ्या काही वर्षांच्या वयामध्ये त्या क्षेत्रामध्ये फार मोलाची कामगिरी बजावली आहे.

यामध्ये रोनाल्डो या खेळाडूचा देखील समावेश होतो. रोनाल्डो ने केवळ प्रॅक्टिस च्या जोरावर आपल्या वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीच देशाच्या राष्ट्रीय संघामध्ये सहभागी होण्याचा बहुमान पटकावला होता, हे काही सोपे कार्य नव्हते. आज रोनाल्डो चे वय ३५ ते ४० च्या दरम्यान आहे. मात्र त्याच्या वयाच्या मानाने त्यांनी मिळवलेले प्रसिद्धी व लोकप्रियता खूपच मोठी आहे.

आजच्या भागामध्ये आपण या रोनाल्डो फुटबॉलपटू विषयी माहिती बघितली आहे. त्यामध्ये जीवनचरित्र, त्याच्या जन्मा बद्दल माहिती, त्याचे शैक्षणिक आयुष्य, वैयक्तिक आयुष्य, खेळाडू म्हणून त्याची कारकीर्द, त्यांनी केलेले विविध रेकॉर्ड्स, त्याचबरोबर त्यांनी खेळलेल्या काही विशेष सामन्यांबद्दल माहिती, इत्यादी गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत.

FAQ

क्रिस्टियानो रोनाल्डो चे संपूर्ण नाव काय आहे?

क्रिस्टियानो रोनाल्डो चे संपूर्ण नाव क्रिस्टियानो रोनाल्डो डोस सॅन्टॉस एवेरो असे आहे.

क्रिस्टियानो रोनाल्डो या खेळाडूचा जन्म कोणत्या दिवशी व कोणत्या ठिकाणी झाला होता?

क्रिस्टियानो रोनाल्डो या फुटबॉलपटू खेळाडूचा जन्म ५ फेब्रुवारी १९८५ या दिवशी पोर्तुगाल या देशांमध्ये झाला होता.

रोनाल्डो या खेळाडूच्या शैक्षणिक आयुष्य बद्दल काय सांगता येईल?

रोनाल्डो हा असा खेळाडू आहे, ज्याने शाळा शिकलेली नाही. त्याच्या शालेय आयुष्यात त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी प्रशिक्षकाला खुर्चीने मारहाण केल्याचा आरोप असल्यामुळे त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले होते.

लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्यामध्ये संबंध कसे आहेत?

लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा वैयक्तिक स्तरावर कुठलाही संघर्ष नाही. मात्र एक फुटबॉलपटू खेळाडू म्हणून त्यांचा मैदानावर एकमेकांशी संघर्ष आहे. व प्रत्येक जण आपल्याला पुढे कसे जाता येईल यासाठी प्रयत्न करत आहे.

रोनाल्डो चे बालपण कसे गेले?

रोनाल्डो हा अतिशय गरीब घरामध्ये जन्माला होता, त्याला लहानपणी अनेक गोष्टींसाठी संघर्ष करण्याबरोबरच तडजोड देखील करावी लागली होती. मात्र लहानपणी त्याला फुटबॉल फारच आवडत असे. त्यासाठी तो काहीही करायला तयार असे.

Leave a Comment