Cricket Ground Information In Marathi शालेय जीवनामध्ये प्रत्येक जण रविवारच्या सुट्टीची आठवणीने वाट बघत असे, कारण या दिवशी आपल्या सवंगड्यांसोबत मैदानावर क्रिकेट खेळायला मिळत असे. लहानपणी अगदी कुठल्याही ठिकाणी अगदी रस्त्यावर देखील आपण क्रिकेट खेळत असू. त्यासाठी साहित्य नाही अशी ओरड कधीच कोणी करत नसे. मोठे होता होता क्रिकेटच्या मैदानाबद्दल माहिती व्हायला लागली, तरी देखील आज अनेक लोकांना या क्रिकेटच्या मैदानाबद्दल शास्त्रशुद्ध माहिती नाही. यासाठीच आजच्या लेखांमध्ये आम्ही ही माहिती घेऊन येणार आहोत.
क्रिकेट मैदान विषयी संपूर्ण माहिती Cricket Ground Information In Marathi
क्रिकेट मैदान म्हणजे असे ठिकाण जिथे क्रिकेट खेळले जाते. त्याला काही वेळा खेळपट्टी म्हणून देखील ओळखले जाते. या ठिकाणी फलंदाजी, गोलंदाजी त्याच बरोबर क्षेत्ररक्षण इत्यादी कार्य केली जातात. अनेक खेळाडूंच्या यशाचे तर अनेक खेळाडूंच्या शिक्षणाचे प्रतीक समजले जाणारे हे खेळाचे मैदान खेळाडूंसाठी देवभूमी असते. प्रत्येक जण आपल्याला अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीची निवड करताना दिसतात. जेणेकरून त्यांना अधिकच चांगल्या पद्धतीने खेळता येईल.
नाव | क्रिकेट मैदान |
प्रकार | खेळाचे मैदान |
खेळपट्टीची लांबी | ६६ फूट |
खेळपट्टीची रुंदी | दहा फूट |
मैदानाचा आकार | अंड गोलाकार |
बॉलिंग क्रीज आणि स्टंप मधील अंतर | चार फूट |
खेळपट्टी पासून सीमारेषेचे अंतर | किमान ६४ तर कमाल ८२ मीटर |
जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये क्रिकेट हा खेळ फारच लोकप्रिय झालेला आहे, त्यामुळे या क्रिकेटच्या मैदानाची माहिती जाणून घेणे फारच गरजेचे ठरते. या मैदानाला असे विशिष्ट माप नसले तरी देखील लंबगोलाकार स्वरूपाचे हे मैदान गवताच्या सहाय्याने झाकलेले असते.
या मैदानाच्या अगदी मध्यभागी एक खेळपट्टी असते. त्याचा आकार आयताकृती असतो. यावर फलंदाजी व गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना खेळण्याची मुभा असते, तर उर्वरित मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या उमेदवारांना पेरले जाते. साधारणपणे १० फूट रुंद असणारी ही खेळपट्टी दोन बाजूंना स्टंप ने युक्त असते.
क्रिकेट मैदानातील विविध घटक:
क्रिकेटचे मैदान हे बऱ्यापैकी मोठे मैदान असते. त्यामुळे ते विविध प्रकारच्या घटकांनी मिळून तयार झालेले असते. ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खेळाडूंसाठी वेगवेगळ्या जागा सुनिश्चित करण्यात आलेल्या असतात.
क्रिकेटच्या मैदानाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून खेळपट्टीला ओळखले जाते. मैदानाच्या अगदी मध्यभागी असलेली ही खेळपट्टी फलंदाज व गोलंदाज यांच्याकरिता सुनिश्चित केलेली असते. या खेळपट्टीच्या एका बाजूने गोलंदाज चेंडू फेकत असतो, तर दुसऱ्या बाजूला असणारा फलंदाज त्या चेंडूला हवेत टोलावत लावण्याचा प्रयत्न करत असतो. या खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला स्टंप लावलेले असतात. या अंतर्गत फलंदाज व्यक्ती बाद देखील केला जाऊ शकतो.
दुसरा घटक म्हणजे यष्टी होय. यष्टी म्हणजे इंग्रजी भाषेमधील अष्टम. या लाकडाच्या स्वरूपात असतात. ज्यावेळी फलंदाज धाव पूर्ण करण्याकरिता खेळपट्टीवर धावत असतो, अशा वेळेला क्षेत्ररक्षकाने चेंडू या यष्टी वर मारल्यास तो खेळाडू बाद होऊ शकतो. या यष्टीच्या दोन्ही बाजूला लावलेला असतात. ज्यांच्यामध्ये अंदाजे २० मीटरचे अंतर असते, व त्यांची संख्या दोन्ही बाजूला तीन-तीन इतकी असते.
विकेट कीपर म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, फलंदाजाला यष्टीचे रक्षण करणारा खेळाडू असतो.
क्रिकेटच्या मैदानातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे क्षेत्ररक्षकांसाठी असलेला भाग होय. हा शक्यतो गवताने झाकलेला किंवा अच्छादिलेला भाग फलंदाजाने टोलावलेला चेंडू झेलण्याकरिता खेळाडूंना जागा प्रदान करून देत असतो.
क्रिकेट मैदानाचे प्रकार:
क्रिकेटचे मैदान किती कालावधीसाठी वापरले जाणार आहे, यावरून त्याचे मुख्य दोन प्रकार पडत असतात. ज्यामध्ये स्थायी क्रिकेट मैदान व अस्थायी क्रिकेट मैदान असे दोन प्रकार आहेत.
स्थायी क्रिकेट मैदान म्हणजे स्टेडियम स्वरूपातील असते, ज्या ठिकाणी नियमित क्रिकेटचे स्पर्धा घेतल्या जातात. आणि या मैदानाची उत्कृष्टरित्या देखभाल देखील ठेवली जाते. मात्र अस्थायी प्रकारातील क्रिकेट मैदान नियमित देखभालीत केले जात नाही, व ते विशिष्ट स्पर्धेकरिता उभारले जाते व त्यानंतर ते पुन्हा बंद केले जाते.
क्रिकेट मैदानाची काळजी कशी घ्यावी:
क्रिकेट मैदानाची काळजी घेणे फारच गरजेचे ठरते. त्यासाठी या मैदानावरील गवताची कापणी वेळेच्या वेळी करणे गरजेचे असते. त्याचबरोबर या गवताला योग्य पद्धतीची वाढ मिळावी याकरिता त्याला पाणी देणे देखील महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर विविध साहित्य स्वच्छ ठेवले पाहिजे, व वेळच्यावेळी त्यावर रंगकाम देखील केले पाहिजे.
क्रिकेटचा खेळपट्टीचे प्रकार:
क्रिकेटच्या मैदानाची जसे प्रकार असतात, त्याचप्रमाणे खेळपट्टीचे देखील प्रकार असतात. यातील डेड पीच ही अतिशय साधारण व कोणत्याही गवताविना तयार केलेली असते. या प्रकारच्या क्रिकेटचा वापर शक्यतो टी २० व एकदिवसीय स्वरूपातील सामने खेळण्याकरिता केला जातो.
त्यानंतर डस्ट पीच नावाची खेळपट्टी असते. या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर धूळ असते, मात्र या धुळीमुळे या खेळपट्टीला मऊपणा प्रदान करण्यास मदत मिळत असते. या खेळपट्ट्या फलंदाजासाठी चांगले असल्या, तरी देखील गोलंदाजांना इथे फार त्रास सहन करावा लागतो. कारण अशा प्रकारच्या खेळपट्टीवर चेंडू वेग घेत नाही.
आणि सर्वात महत्त्वाची खेळपट्टी म्हणजे हिरवी किंवा ग्रीन पीच होय. या खेळपट्टीवर वर्षभर गवत उगविले जाते. त्याचबरोबर याला कायम ओलसर ठेवले जाते. या खेळपट्टीचा वापर वेगवान गोलंदाजांना खूप चांगल्या पद्धतीने करता येतो. या खेळपट्टीवर चेंडू चांगला वेग धारण करत असतो, कारण येथे चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारची घर्षण होत नाही.
निष्कर्ष;
लहानपणी आपण अनेक खेळ खेळलो असलो, तरी देखील त्यासाठी शास्त्रशुद्ध मैदान किंवा साहित्याची आवश्यकता आपल्याला कधीच वाटत नसेल. आपण कुठल्याही ठिकाणी खेळ खेळून आपला आनंद मिळवत असायचो. मात्र तुम्हाला या खेळामध्ये करिअर करायचे असेल, किंवा तुम्हाला या क्षेत्रामध्ये नाव कमवायचे असेल तर तुम्हाला योग्य मैदानावर खेळणे फारच गरजेचे ठरते. जेणेकरून सवयीअंति तुम्ही मुख्य सामन्याच्या वेळेला योग्य व प्रभावीपणे खेळू शकता.
असेच एक खेळाचे मैदान म्हणजे क्रिकेटचे मैदान होय. क्रिकेटच्या मैदानाबद्दल अनेकांना शास्त्रीय स्वरूपाची माहिती नसते. त्यासाठीच आपण हा लेख लिहिलेला आहे. या लेखामध्ये तुम्हाला क्रिकेटच्या मैदानाची माहिती बघताना, त्याची लांबी रुंदी, खेळपट्टी म्हणजे काय, खेळपट्टीवरील पायऱ्या, बॉलिंग क्रीज, खेळपट्टी व सीमारेषा यांचे एकमेकांशी असणारे संबंध, खेळपट्टीचे विविध उदाहरणे, खेळपट्टीचे प्रकार, या मैदानाची किंवा खेळपट्टीची निर्मिती करण्याकरिता विविध पद्धती ही माहिती बघितली आहे.
FAQ
क्रिकेटच्या मैदानाला कोणत्या नावाने ओळखले जाते?
क्रिकेट या ठिकाणी खेळले जाते त्या क्रिकेटच्या मैदानाला क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जाते.
जागतिक पातळीवरील सर्वात उत्कृष्ट क्रिकेटचे मैदान किंवा स्टेडियम म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते?
जगभरातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट स्टेडियम हे लॉर्ड स्टेडियम असून यालाच क्रिकेटचे माहेरघर असे देखील नाव आहे. या स्टेडियम ची निर्मिती १८१४ या वर्षी करण्यात आली होती. ज्याची निर्मिती थॉमस लॉर्ड यांनी केलेली असून, त्यांच्याकडे मेरीलेबोन क्रिकेट क्लब या क्लबची मालकी हक्क देखील होते.
क्रिकेटच्या मैदानावर पृष्ठभाग कसा असतो?
क्रिकेटचे मैदान हे खेळाडूंना सहजरित्या इकडून तिकडे धावता यावे, त्याचप्रमाणे खेळताना कुठल्याही प्रकारचे दुखापत होऊ नये म्हणून त्यावर गवत उगवले जाते. तर खेळपट्टी ही विशिष्ट स्वरूपात बनवलेली असते.
क्रिकेट मैदानाबद्दल अजून काय सांगता येईल?
क्रिकेटचे मैदान हे अंडगोलाकार स्वरूपाचे असते. ज्याचा व्यास १३७ मीटर पासून १५० मीटर पर्यंत असतो. काही ठिकाणी ही मैदाने चौरस स्वरूपाचे देखील असतात.
क्रिकेट मैदानाचे किंवा खेळपट्टीचे कोणकोणते प्रकार पडत असतात?
क्रिकेट मैदानाचे अथवा खेळपट्टीचे डस्ट पिच, डेड पीच, ग्रीन पीच यासारखे प्रकार पडत असतात.