सारस पक्षाची संपूर्ण माहिती Crane Bird Information In Marathi

Crane Bird Information In Marathi आपल्या आकर्षक हालचाली, आणि मनमोहक सौंदर्यामुळे कित्येक शतकांपासून मानवाला मंत्रमुग्ध करणारा पक्षी म्हणून सारस पक्षाला ओळखले जाते. या पक्षाच्या नावाने पुण्यामध्ये एक बाग देखील आहे. अतिशय अनोखे व स्थलांतरित करणारे प्रवासी पक्षी म्हणून या पक्षांना ओळखले जाते.

Crane Bird Information In Marathi

सारस पक्षाची संपूर्ण माहिती Crane Bird Information In Marathi

हे पक्षी सहसा मानवी वस्तीमध्ये आढळत नसले, तरी देखील अतिशय आकर्षक स्वरूपाचे असतात. ते निसर्गातः काहीसे उंच स्वरूपाचे व लांबट असतात. जे अगदी पाच फूट पर्यंत देखील वाढू शकतात. त्यांच्या पंखांचा विस्तार हा सुमारे आठ फुटांपर्यंत देखील होऊ शकतो, ज्यामुळे त्यांना आकाशामध्ये उडणे सहज शक्य होते. स्थलांतर करत असल्यामुळे त्यांची प्रवास करण्याची क्षमता देखील अतिशय जास्त असते.

साधारणपणे काळा पांढऱ्या रंगाच्या छटांनी माखलेला हा पक्षी राखाडी रंगांमध्ये देखील दिसून येत असतो, मात्र प्रजनन कालावधीमध्ये ते स्वतःला लालसर सोनेरी किंवा निळा रंग प्राप्त करून घेत असतात. या रंगामुळे त्यांचे डोके अतिशय सुशोभित दिसत असते. आजच्या भागामध्ये आपण या सारस पक्षाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावसारस
प्रकारपक्षी
साधारण उंची३ ते ५ फूट
शास्त्रीय नावगृडीइ प्र
कुटुंबगृडीइ
पंखांचा विस्तारपाच ते आठ फुटांपर्यंत
रंगराखाडी किंवा काळा पांढरा
ओळखस्थलांतरित पक्षी

सारस पक्षाबद्दल ऐतिहासिक माहिती:

सारस हा पक्षी पूर्वीच्या काळातील ज्युरासिक कुळातील पक्षांपासून झाला आहे, असे सांगितले जाते. पुढे या पक्षांमध्ये विविध प्रकारच्या भौतिक घटकांमुळे बदल घडून आला, आणि हळूहळू आज आपल्याला दिसणाऱ्या पक्षाची निर्मिती झाली. या पक्षाला सर्वात प्रथम ८० दशलक्ष वर्षांपूर्वी बघितले गेले होते, असे सांगितले जाते.

ते ठिकाण ग्रुइफॉर्मेस हे होते. पुढे त्यांच्या गुणधर्मानुसार आणि राहण्याच्या सवयीनुसार त्यांचे विविध प्रजातींमध्ये वर्गीकरण करण्यात आले. आज आढळणाऱ्या सारस पक्षाच्या प्रजाती ३० दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झाले असाव्यात असे अंदाज बांधले जातात. या सारस पक्षामध्ये प्रजातीनुसार विविध प्रकारची विविधता आढळून येते. त्याचबरोबर या पक्षाची लोकसंख्या देखील चांगल्या पद्धतीत उपलब्ध आहे.

आज या पक्षाच्या मुख्य चार प्रजाती असून, या चारही प्रजाती अस्तित्वात आहेत. ज्यांच्यामध्ये बॅलेरिका, ग्रूस, अँथ्रोपोईड्स, आणि बुगेरान्स या प्रजातींचा समावेश होतो.

सारस पक्षांबद्दल राहणीमान:

सारस पक्षी हे स्थलांतर करणारे किंवा प्रवासी पक्षी आहेत, असे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. ते शक्यतो बदलत्या हवामानानुसार शरीराला चांगले आरोग्य लाभावे याकरिता स्थलांतर करत असतात. त्याचबरोबर योग्य प्रकारचे अन्न व निवारा मिळवण्यासाठी देखील स्थलांतर करणे त्यांच्यामध्ये सामान्य आहे. संपूर्ण जगभरातील केवळ अंटार्टिका खंड आणि दक्षिण अमेरिका इत्यादी भाग वगळले, तर सर्वत्र हे प्रवासी पक्षी स्थलांतर करत असतात.

सारस पक्षाची वागणूक किंवा वर्तन:

मानवाप्रमाणे सारस हा पक्षी कुटुंबामध्ये राहणे पसंत करतो. अनेक पक्षांचे मिळून गट किंवा कळप तयार होत असतात. या पक्षांच्या एकत्रीकरणाला सेज म्हणून ओळखले जाते. अन्न खाण्याच्या सवयीमध्ये देखील हे पक्षी फारच विचित्र, किंवा वैशिष्ट्यपूर्ण असतात.

ते धनधान्य खाण्याबरोबरच मांसाहारामध्ये कीटक, मासे, सरड्यासारखे लहान प्राणी, आणि उंदीर इत्यादी गोष्टी खात असतात. ते आपल्या जोडीदाराला आकर्षित करण्याकरिता नृत्य देखील करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते एकमेकांना हाक मारायचे असेल तर आपले पंख फडफडवत असतात.

सारस पक्षाची वैशिष्ट्ये किंवा गुणधर्म:

सारस पक्षी स्थलांतर करत असल्यामुळे त्यांच्या उडण्याची क्षमता फारच उंच पर्यंत असते. त्यांचे पाय आणि मान अतिशय लांब स्वरूपाची असल्यामुळे, त्यांना शारीरिक उंची प्राप्त होत असते. मासे खाताना हे पक्षी केवळ पाण्यात पाय देऊन उभे राहू शकतात. त्यामुळे त्यांच्या इतर शरीराला पाणी लागत नाही.

सारस हे पक्षी उडताना नेहमी आपली मान समोर करत असतात, जेणेकरून त्यांना हवेचा रोध कमी करण्यात मदत मिळत असते. त्यांच्या शरीरावर असणारी पिसे अतिशय मऊ स्वरूपाचे असतात. सारस पक्षांच्या पायांना साधारणपणे तीन बोट असतात.

सारस पक्षांच्या प्रजातीवर येणारे धोके:

मानवाने ज्याप्रमाणे निसर्गावर मालकी गाजवायला सुरुवात केली, त्याच वेगाने इतर प्राण्यांवर नामशेष होण्याची वेळ आलेली आहे. या सारस पक्ष्यांची नैसर्गिक अधिवासस्थाने, त्याचबरोबर त्यांना स्थलांतरित करण्यापासून होणारी धोके यामुळे ही प्रजाती नाश पावत असून, यामध्ये मानवाचा फार मोठा वाटा आहे. या पक्षांच्या संरक्षणाकरिता १९७२ या वर्षी करण्यात आलेल्या वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये देखील तरतुदी टाकण्यात आलेले आहेत.

सारस पक्ष्यांच्या स्थलांतरांनाविषयी माहिती:

एका उड्डाणामध्ये अतिशय लांबपर्यंत प्रवास करू शकणारे हे पक्षी, कित्येक मैल सहज प्रवास करत असतात. व वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करत असतात. या पक्षांचे स्थलांतर मुख्यतः अन्नधान्य मिळवणे, व प्रजनन करणे या कार्यासाठी होत असते. या पक्षांसाठी कुठल्याही ठिकाणी जाणे फार अवघड नाही. ते सुमारे पाच हजार मैल इतके अंतर देखील स्थलांतर करू शकतात. वर्षभर चांगला आहार व प्रजननासाठी योग्य जागा शोधण्यासाठी ते स्थलांतर करत राहतात.

सारस पक्षाच्या संवर्धनाची गरज:

इतर प्रजातीप्रमाणेच सारस पक्षाच्या प्रजाती देखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मानवाने या पक्षांच्या संवर्धनाकरिता विविध मोहिमा आखल्या पाहिजेत. त्यासाठी विविध संस्था व संघटना प्रयत्न करत असून, त्यामध्ये इंटरनॅशनल क्रेन फाउंडेशन ही संस्था फारच मोलाचे कार्य करत आहे.

आपण देखील या पक्षाच्या संवर्धनाकरिता खारीचा वाटा उचलू शकतो. त्यासाठी हे पक्षी आपल्याला आढळून आले असता त्यांच्या शिकार करण्यावर आपण नियंत्रण मिळवले पाहिजे. त्याचबरोबर कोणी या पक्षांची शिकार करत असेल, तर त्याला अडवले पाहिजे. त्यांच्या स्थलांतरणाकरिता आवश्यक असणाऱ्या पाणथळ जमिनींचे संरक्षण देखील महत्त्वाचे ठरते.

निष्कर्ष:

देस वैसा भेस’ असे आपण ऐकले असेलच. प्रत्येक ठिकाणावरील पक्षी हे काहीतरी वेगळेपण घेऊन जन्माला येत असतात. प्रत्येक पक्षी वेगवेगळा असतो, मात्र या प्रत्येक पक्षाचे काहीतरी वैशिष्ट्य असतेच. तसाच एक वैशिष्ट्यपूर्ण प्रवासी पक्षी म्हणून सारस पक्षाला ओळखले जाते.

इंग्रजीमध्ये क्रेन या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी अतिशय आकर्षक स्वरूपाचा असतो. आजच्या भागामध्ये आपण या सारस पक्षाविषयी इत्यंभूत माहिती बघितली आहे. यामध्ये तुम्हाला या पक्षाविषयी संपूर्ण माहिती झाली असेल. जसे की सारस पक्षी राहण्याची ठिकाने, त्या पक्षांचे वर्तन किंवा वागण्याची पद्धत, या पक्षांची विविध गुणवैशिष्ट्ये, सारस पक्षाला निर्माण झालेले विविध धोके, आणि या पक्षाचा इतिहास इत्यादी बाबींबद्दल माहिती घेतलेली आहे.

FAQ

सारस या पक्षाला इंग्रजी भाषेमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

सारस या पक्षाला इंग्रजी भाषेमध्ये क्रेन या नावाने ओळखले जाते.

सरस पक्षाची साधारण उंची किती समजली जाते?

सारस हा पक्षी काहीसा अवजड स्वरूपाचा असून, त्याची उंची तीन ते पाच फूट इतकी होत असते. काही वेळेला ही उंची सहा ते साडेसहा फुटांपर्यंत देखील दिसून येते.

सारस पक्षाच्या पंखांचा विस्तार साधारणपणे किती समजला जातो?

सारस अर्थात क्रेन या पक्षाच्या पंखांचा विस्तार हा जवळपास सहा ते आठ फुटांपर्यंत असतो, जे त्याला उंच व लांब अंतरापर्यंत भरारी घेण्यासाठी मदत करत असतात.

सारस पक्षांबद्दल काही वैशिष्ट्ये सांगता येईल?

प्रत्येक पक्षाचे आपले असे विशिष्ट्यपूर्ण निवासस्थान असते. मात्र सारस हा पक्षी कुठल्याही एका निवासस्थानी राहत नसून, तो स्थलांतर करणारा पक्षी आहे.

सारस पक्षी कोणत्या ठिकाणावरून कोणत्या ठिकाणी स्थलांतर करण्याला प्राधान्य देत असतात?

सारस पक्षी हे जगभरातील जवळपास संपूर्ण देशांमध्ये स्थलांतर करतात. मात्र ते दक्षिण अमेरिका व अंटार्टिका या ठिकाणी भेट देणे टाळतात.

Leave a Comment