गाजर विषयी संपूर्ण माहिती Carrot Information In Marathi

Carrot Information In Marathi उन्हाळा चालू झाला की आपल्याकडे सर्रास गाजरांची आवक वाढू लागते. गाजर हे जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये खाल्ले जाणारे कंदमुळ असून डोळ्यांच्या आजारासाठी फारच महत्त्वाचे समजले जाते. असे लाल चुटुक रंग असणारे हे गाजर प्रत्येकाला आवडत असते. सलाड मध्ये तर याचा मुख्यतः समावेश केला जातो. अनेक लोकांना या गाजरापासून तयार करण्यात आलेला हलवा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आवडत असतो.

Carrot Information In Marathi

गाजर विषयी संपूर्ण माहिती Carrot Information In Marathi

गाजर शिजवून देखील खाल्ले जात असले तरी देखील कच्चे गाजर हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम समजले जाते. काही ठिकाणी गाजराचा रस करून देखील पिला जातो, जो रक्त वाढीसाठी खूपच उपयुक्त समजला जातो. त्याचप्रमाणे ज्या वेळेला मानवाला थकवा जाणवत असतो त्या वेळेला गाजराच्या रसाने अतिशय ताजे तावाने वाटू लागते.

गाजरामध्ये अनेक पोषक तत्वे असल्यामुळे पचन संस्था सुधारण्यासाठी देखील या गाजराचा मोठ्या प्रमाणावर उपाय केला जातो. ज्या लोकांना बद्धकोष्ठता किंवा मलामध्ये दुर्गंधी इत्यादी समस्या जाणवत असतील अशा लोकांनी नियमितरीत्या गाजराचे सेवन करावे असे सांगितले जाते.

गाजराच्या सेवनामुळे कॅन्सर सारख्या आजारांवर देखील नियंत्रण मिळवले जाऊ शकते. त्याचबरोबर आजारपणाच्या कालावधीमध्ये गाजर खाल्ल्यामुळे शरीराची झालेली झीज सुद्धा भरून काढली जाऊ शकते. अशा या बऱ्याच दृष्टिकोनातून गुणकारी असणाऱ्या गाजरा बद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती बघणार आहोत…

नाव गाजर
इंग्रजी नावकॅरट
किंगडमप्लांटी
ऑर्डरअपियल्स
कुटुंब किंवा कुळअपिसी
वंशडॉकस
रंगलाल
प्रकारकंदमुळ
हंगामउन्हाळा
चवगोडसर

अगदी कमी कालावधीमध्ये रुग्णांना तरतरी प्रदान करायची असेल किंवा आजारपणामुळे झालेली शरीराची झीज भरून काढायची असेल तर गाजर सेवन खूपच फायदेशीर समजले जाते. अनेक डॉक्टरांकडून रुग्णांना गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो.

अतिशय लालचट्टूक रंगाचे हे गाजर जमिनीमध्ये उगते, त्यामुळे त्याला कंद म्हणून ओळखले जाते. अतिशय उत्तम स्वाद असणारे हे गाजर अनेक लोक रस करून देखील घेत असतात. या रसामध्ये काही प्रमाणात जिरे पावडर, थोडीशी साखर, आणि सेंधा मीठ देखील वापरले जाते.

आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असणारे हे गाजर रक्तदाब नियंत्रण ठेवण्याबरोबरच डोळ्यांचे आरोग्य देखील सुधारत असते. यातील जीवनसत्व अ रातांधळेपणावर गुणकारी समजले जाते. त्याचबरोबर यामध्ये जीवनसत्व ब, ड, इ आणि के मोठ्या प्रमाणात आढळत असतात. गाजराला एक संतुलित आहारामध्ये देखील समावेश केले जाऊ शकते, त्यामुळे दररोजच्या आहारामध्ये मध्यम आकाराचे गाजर खाल्ले तर कोलेस्ट्रॉल देखील कमी होते असे सांगितले जाते.

गाजर सेवनाचे फायदे:

  • गाजर सेवन केल्यामुळे गेलेली शक्ती परत येण्यास त्याचबरोबर उत्साह वाटण्यास मदत मिळत असते.
  • गाजराला शक्तिवर्धक म्हणून देखील ओळखले जाते.
  • रक्तदाब नियंत्रित करण्याबरोबरच हृदयाचे वाढलेले ठोके कमी करण्यास देखील गाजराचा खूपच फायदा होत असतो.
  • गाजराच्या नियमित सेवनामुळे लघवी आणि मल साफ होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर बद्धकोष्ठतेसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते.
  • ज्या लोकांना विसरभोळेपणाचा त्रास असेल अशा लोकांनी देखील नियमित गाजराचे सेवन केले पाहिजे.
  • लहान मुलांना नियमित गाजराचा रस सेवन करण्यास दिला तर त्यांच्यामधील आजारी पडण्याचे प्रमाण फार कमी होते, असे आढळून आलेले आहे.
  • गाजराच्या नियमित सेवनामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढली जाते.
  • त्वचारोगामध्ये देखील गाजर खूपच फायदेशीर असते, गाजराच्या सेवनामुळे रक्त शुद्ध होत असते, परिणामी शरीरावर येणारी खाज कमी होण्याबरोबरच चेहऱ्यावरील पुरळ देखील कमी होण्यास मदत मिळते. आणि चेहरा कोरडा देखील राहत नाही.
  • भाजलेल्या ठिकाणी गाजर कुस्करून लावल्यास तेथे होणारी आग कमी केली जाऊ शकते.

गाजर वापरण्याची पद्धत:

गाजर मुख्यतःहा कच्च्या स्वरूपात सॅलड म्हणून खाल्ले जाते, मात्र काही ठिकाणी याचा रस देखील पिला जात असतो. गाजराचा रस करताना त्यामध्ये बीटाचे दोन तुकडे टाकण्याचा देखील सल्ला दिला जातो, जेणेकरून चव चांगली लागू शकेल.

पपईचा गर आणि गाजर एकत्र करून चेहऱ्याला लावावे, व दहा ते पंधरा मिनिटांनी धुवावे याने चेहऱ्यावर तेच येण्यास मदत मिळत असते.

गाजर सेवनाचे तोटे:

गाजर अतिशय उपयुक्त असले तरी देखील गाजरातील साखर मधुमेही रुग्णांसाठी धोकेदायक ठरू शकते.

कच्च्या स्वरूपातील गाजर मोठ्या प्रमाणावर खाल्ल्यास पोट फुगण्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर पोटामध्ये दुखणे देखील जाणवू शकते.

गाजरामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्वे व खनिजे असतात, त्यांच्या अतिरेकाने पचन संस्था बिघडू देखील शकते.

गाजरामध्ये असणारे बीटा कॅरोटीन लाल रंग देण्याचे काम करत असतात, गाजराचे अतिप्रमाणात सेवन केल्यास चेहरा देखील लालेलाल होऊ शकतो. जो दिसताना अतिशय खराब दिसतो. त्यामुळे नेहमी प्रमाणातच गाजराचे सेवन केले जावे असा सल्ला दिला जात असतो.

निष्कर्ष:

आपल्या आयुर्वेदामध्ये अनेक फळांचे महत्त्व सांगण्याबरोबरच कंद मुळांना देखील प्रचंड महत्व दिलेले आहे. आणि निसर्गाची किमया म्हणायची तर प्रत्येक फळ किंवा कंदमुळे हे योग्य ऋतूमध्ये उगवले जाते, आणि त्या हंगामामध्ये किंवा ऋतूमध्ये या पदार्थांचा शरीराला फार मोठा फायदा होत असतो.

डोळ्यांचे आरोग्यासाठी सर्वोत्तम समजले जाणारे आणि अ जीवनसत्वाने भरपूर असणारे गाजर देखील उत्तम आरोग्यदायी कंदमूळ असण्याबरोबरच त्याचे उत्पादन मुख्यतः उन्हाळ्यामध्ये घेतले जाते. उन्हाळ्यात या कंदमळाचे सेवन केल्यास शरीराला फारच फायदा होत असतो.

अनेक लोक जेवण करताना कच्च्या स्वरूपात सलाद म्हणून या गाजराचा वापर करत असतात. रोजच्या जेवणामध्ये कच्च्या गाजराचा समावेश केल्यामुळे बद्धकोष्ठते सारख्या आजारांवर मात करण्याबरोबरच शौचास साफ होण्यास देखील मदत मिळत असते. गाजर हे डोळ्यांची दृष्टी मजबूत ठेवण्यासाठी ओळखले जाते, कारण यामध्ये उपलब्ध असणारे जीवनसत्व डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच उपायकारी समजले जात असते.

आजच्या भागामध्ये आपण या गाजराविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ज्यामध्ये गाजर म्हणजे काय, गाजराची लागवड कशी करावी? गाजराचे विविध फायदे व उपयोग काय असतात, कोणकोणत्या गोष्टीसाठी गाजर वापरले जाते, गाजरा पासून कोणकोणते पदार्थ बनवले जातात, गाजर कशा रीतीने वापरावे, त्याचबरोबर गाजर खाल्ल्याने होणारे काही फायदे व तोटे इत्यादी माहिती घेतलेली आहे.

FAQ

गाजर या कंदमुळाला इंग्रजी भाषेमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

गाजर या कंदमुळला इंग्रजी भाषेमध्ये कॅरेट या नावाने ओळखले जात असते.

गाजरामध्ये कोणते जीवनसत्व सर्वाधिक प्रमाणात आढळते असे सांगितले जाते?

गाजरामध्ये सर्वात जास्त प्रमाणात जीवनसत्व अ आढळून येते असे सांगितले जाते. हे जीवनसत्त्व डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असण्याबरोबरच रातांधळेपणासारख्या आजारांवर उपाय म्हणून देखील वापरले जात असते.

गाजरचे सेवन कोणाच्या परिस्थितीमध्ये टाळले पाहिजे?

गाजर आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी देखील ज्या रुग्णांना सर्दी किंवा पडसे झाले असेल, जुना ताप असेल, किंवा न्यूमोनिया सारखे आजार झालेले असतील अशा लोकांनी गाजराचे सेवन करू नये असे सांगितले जाते.

गाजराचे सेवन करणे कोणकोणत्या रुग्णांना फायदेशीर ठरले जाते?

गाजराचे सेवन करणे हे आव, टॉन्सिलाइटिस, मुतखडा, मुळव्याध, रक्तालपत, आणि अल्सर यांसारख्या आजारांमध्ये खूपच फायदेशीर समजले जाते.

गाजर सेवनाचे कोणकोणते फायदे आहेत?

गाजर सेवनामुळे गेलेला उत्साह व तरतरी पुन्हा येण्यास मदत होते. रक्ताची कमतरता आणि शारीरिक कमजोरी दूर होण्याबरोबरच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यामध्ये देखील गाजर खूपच फायदेशीर असते. गाजरामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्याबरोबरच स्मरणशक्ती देखील वाढते. त्याचबरोबर पचन संस्था मजबूत होण्याबरोबरच पोटाच्या सर्व समस्यांवर मात

Leave a Comment