फुलपाखरू पक्षाची संपूर्ण माहिती Butterfly Bird Information In Marathi

Butterfly Bird Information In Marathi अतिशय स्वच्छंदरित्या आपले आयुष्य जगणारे फुलपाखरू कोणाला आवडत नाही?, अगदी लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींना भुरळ घालणारे हे फुलपाखरू अतिशय सुंदर मात्र तेवढेच नाजूक स्वरूपाचे प्राणी असतात. आपल्या पिसांच्या सौंदर्यासाठी ओळखले जाणारे हे फुलपाखरू फुलांमधील पराग कणातून रस शोषण घेत असतात, व आपला उदरनिर्वाह करत असतात. आपल्याच धुंदीत फिरणारे हे फुलपाखरू अतिशय सुंदर लहान स्वरूपाचे प्राणी समजले जातात.

Butterfly Bird Information In Marathi

फुलपाखरू पक्षाची संपूर्ण माहिती Butterfly Bird Information In Marathi

महाराष्ट्राने सर्वप्रथम राज्य फुलपाखराचा दर्जा दिला होता. त्या पाठोपाठ अनेक राज्यांनी आजकाल फुलपाखरांना राज्य फुलपाखराचा दर्जा देऊन सन्मानित केलेले आहे. आजच्या भागामध्ये आपण या सुंदर प्राण्याबद्दल अर्थात फुलपाखरा बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावफुलपाखरू
प्रकारकीटक
शास्त्रीय नावRhopalocera
साधारण आयुष्य१५ ते २९ दिवस
पंखांचा आकार३२ ते ४७ मिलीमीटर
राज्यएनिमलिया
वर्गलेपीडोपटेरा

फुलपाखराचे वैशिष्ट्ये:

फुलपाखरू स्वतः एक पृथ्वीवरील वैशिष्ट्य म्हणून नावारुपास आलेले आहे. पृथ्वीवरील सर्वात तेजस्वी त्याचबरोबर शरीर रचनेच्या दृष्टीने आकर्षक असणारा प्राणी म्हणून फुलपाखराला ओळखले जाते. हजार वर्षांपासून फुलपाखरांच्या कित्येक प्रजाती पृथ्वीवर असून, दोन समान भागांमध्ये विभागीय होणारे हे प्राणी वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळून येत असतात. त्यांचे पंख अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असतात.

हे सौंदर्य त्यांच्या रंगामुळेच या फुलपाखरांना सौंदर्य प्राप्त होत असते. फुलपाखरांच्या पंखावर चीटिन नावाचा घटकाचा थर असतो. हे एक प्रथिनांचा प्रकार असून, त्यापासून फुलपाखरांचे बाह्य आवरण तयार होत असते. जेणेकरून त्यांना सुरक्षा देखील प्राप्त होत असते. फुलपाखरांचे पंख अतिशय पातळ स्वरूपाचे असतात.

अगदी काही फुलपाखरांच्या पंखांमधून आपण आरपार देखील बघू शकतो. वाढत्या वयानुसार त्यांचे पंख देखील काहीसे गडद होत असतात. त्यामुळे ते उडण्यास सक्षम राहत नाहीत. अवघ्या १४ ते २९ दिवसांचे आयुष्य लाभणारे हे प्राणी आपल्या आयुष्य खूपच आनंदात जगत असतात.

या प्राण्यांचे पाय देखील खूपच वैशिष्ट्यपूर्ण असतात. या पायांवर चवीसाठी आवश्यक असणाऱ्या ग्रंथी असतात. त्यानुसार ज्या फुलावर हा फुलपाखरू बसतो, त्याची चव फुलपाखरांना समजत असते. आणि त्यानुसार या फुलातून रसद्राव्य शोषण्यास फुलपाखरू प्रारंभ करत असतो.

फुलपाखरू नेहमी संपूर्ण फलातील रस शोषून होईपर्यंत, आपले पाय फुलांवरच ठेवत असते, जेणेकरून त्यांना चवीचे ज्ञान मिळत असते. फुलपाखराची मादी योग्य वनस्पती बघून त्यावर आपली अंडी घालत असते. काही वेळेला अन्नावर देखील फुलपाखरे अंडी घालत असतात.

फुलपाखराची खाणपानाची पद्धत:

फुलपाखरे नेहमी फुलांवर आपली उपजीविका करत असतात. फुलांमधील परागकण व रस शोषून ते त्यातून शरीरासाठी शक्ती मिळवत असतात. मात्र केवळ याच रसावर त्यांना आवश्यक असणारे सर्व घटक किंवा खनिजे मिळतात असे नाही. त्यामुळे अनेकदा या प्राण्यांना डबक्यामधून पाणी पिताना देखील बघितले गेलेले आहे.

या पाण्यामुळे त्यांच्या शरीराला आवश्यक असणाऱ्या विविध खनिजांची पूर्तता देखील होत असते. त्यांच्या तोंडाला समोर लांब नळीसारखी रचना असते, आणि या नळीच्या माध्यमातून ते फुलातील रस शोषून  खात असतात. त्याचबरोबर काही मेलेल्या प्राण्यांवर बसून त्यांच्यातील रक्तद्रव्य देखील हे प्राणी काही वेळेला शोषित असतात.

थंडी आणि फुलपाखरू:

फुलपाखरांना सरासरी उष्ण हवामान गरजेचे असते. ८५ अंश फेरनहाईट पेक्षा जास्त तापमानावर ते चांगल्या पद्धतीने कार्य करत असतात. थंड रक्ताचे प्राणी असल्यामुळे यांना स्वतःचे शरीराचे तापमान देखील नियंत्रित करता येत नाही, त्यामुळे आजूबाजूच्या तापमानानुसार त्यांना कार्य करावे लागते. व या हवामानाचा त्यांच्यावर लगेचच परिणाम दिसून येत असतो.

५५ अंश फॅरेनाईट पेक्षा कमी असलेले तापमान फुलपाखरांसाठी अतिशय घातक समजले जाते. या तापमानामध्ये त्यांना उडता येत नाही, त्याचबरोबर ते अन्न देखील खाऊ शकत नाहीत. परिणामी त्यांचा मृत्यू अटळ असतो. फुलपाखरू थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला ऊर्जा मिळवण्याकरिता संपूर्ण शरीर थरथरवत असतात, किंवा सूर्यामध्ये फिरून उष्णता देखील प्राप्त करत असतात.

फुलपाखराचे जीवन चक्र:

फुलपाखरू आपल्या एका आयुष्यामध्ये चार वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जगत असते  सर्वात प्रथम अंडी अवस्थेमध्ये असलेले हे फुलपाखरू मादी फुलपाखराद्वारे एखाद्या झाडावर सोडले जाते. एकावेळी एक मादी सुमारे २०० ते ३०० अंडी देण्यासाठी समर्थ असते.

तीन ते सात दिवसानंतर ही अंडी उबवून त्यातून अळी बाहेर येते, या अळीच्या टप्प्याला लारवा स्टेज म्हणून देखील ओळखले जाते. या अळ्या सुरवंट स्वरूपात असतात. दोन ते पाच आठवडे या अवस्थेमध्ये राहून, त्या झाडांच्या पानांवर आपले उदर भरत असतात. यादरम्यान त्यांचे वजन व आकार दोन्ही वाढत असते.

योग्य रीतीने शरीर वाढल्यानंतर त्या पुढील टप्प्यासाठी सज्ज होत असतात, मात्र अनेक फुलपाखरांचा याच टप्प्यांमध्ये मृत्यू होत असतो. त्यामुळे फारच कमी फुलपाखराच्या अळ्या पुढील टप्प्यावर जाऊ शकतात.

पुढील टप्प्यामध्ये ही अळी आपल्या स्वतःभोवती एक  रसायन सोडून संरक्षक कवच तयार करत असते. दोन आठवड्यांपर्यंत या कवचामध्ये राहिल्यानंतर ही अळी फुलपाखरू म्हणून बाहेर येत असते. या टप्प्याला प्रौढ अवस्था म्हणून ओळखले जाते. ही फुलपाखराच्या आयुष्यातील अंतिम पातळी किंवा अवस्था असते.

निष्कर्ष:

निसर्ग फार सुंदर आहे, आणि त्यातील प्रत्येक सजीव हा अतिशय वेगवेगळ्या स्वरूपाचे वैशिष्ट्ये घेऊन जन्माला येत असतो, आणि आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करत असतो. अनेक प्राणी हे ताकतीच्या बाबतीत सरस असतील, काही उंचीच्या बाबतीत, काही चपळतेच्या बाबतीत, काही वेगाच्या बाबतीत, तर काही समुद्राच्या बाबतीत. असाच अतिशय सौंदर्यवान प्राणी म्हणून फुलपाखराला ओळखले जाते.

कीटक वर्गातील हा प्राणी प्रत्येकाला आपल्या निसर्ग सौंदर्याने मोहुन टाकत असतो. अतिशय वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळणारा हा प्राणी शक्यतो फुलांवर दिसून येत असतो. बहुधा तो एखाद्या व्यक्तीच्या हातावर देखील बसतो. त्यावेळी तो क्षण अतिशय सुखावून टाकणारा असतो.

आजच्या भागामध्ये आपण या फुलपाखरा बद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे. यामध्ये फुलपाखराबद्दल विविध गोष्टी, त्याचे वैशिष्ट्य, फुलपाखराचे पंख, फुलपाखरांच्या पायांचे वैशिष्ट्य, त्याच्या खाद्य प्रकाराविषयी माहिती, चिखलातून पाणी पिण्याची फुलपाखराची पद्धत, थंडीच्या दिवसातील फुलपाखरांचे आयुष्य, फुलपाखराचे आयुष्यमान, त्याचा रंग आणि फुलपाखराचे जीवन चक्र इत्यादी बद्दल माहिती बघितली आहे. त्याचबरोबर काही तथ्य देखील जाणून घेतली आहेत…

FAQ

फुलपाखराला इंग्रजी भाषेमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते, तसेच त्याचे शास्त्रीय नाव काय आहे?

फुलपाखराला इंग्रजी भाषेमध्ये बटरफ्लाय या नावाने ओळखले जाते? तसेच शास्त्रीय नाव Rhopalocera असे आहे.

फुलपाखराचे साधारण आयुष्यमान किती समजले जाते, त्याचबरोबर त्याच्या पंखांचा आकार किती असतो?

फुलपाखराला साधारणपणे १५ ते २९ दिवसांचे आयुष्य लाभत असते. व त्याच्या पंखांचा आकार हा ३२ ते ४७ मीटर पर्यंत असतो.

फुलपाखराच्या आयुष्याच्या कोणत्या महत्त्वाच्या चार अवस्था किंवा टप्पे असतात?

फुलपाखराच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या अवस्थांना किंवा टप्प्यांना फुलपाखराचे जीवन चक्र म्हणून ओळखले जाते. त्यामध्ये अंडी, अळी, प्युपा, आणि प्रौढावस्था ह्या अवस्थांचा समावेश होतो.

फुलपाखरे कोणत्या स्वरूपाचे अन्न खात असतात?

फुलपाखरे नेहमी फुलांवर बसलेली आपल्याला आढळून येतात. फुलांतील रसावर आपला उदरनिर्वाह करत असतात. फुलपाखरू कधीही घनपदार्थ खात नाही, केवळ द्रव पदार्थांवर तो आपली गुजरान करत असतो.

फुलपाखरू आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या विविध खनिजांची पूर्तता करण्यासाठी काय करतात?

फुलपाखरांना फुलांमधून केवळ शर्करा युक्त रसच प्राप्त होत असतो. ज्यामध्ये खनिजांची मात्रा फारच कमी असते. या खनिजांची पूर्तता करण्यासाठी चिखलाच्या डबक्यामधून फुलपाखरे पाणी शोषून घेत असतात.

Leave a Comment