आवळा वनस्पती विषयी संपूर्ण माहिती Amla Plant Information In Marathi

Amla Plant Information In Marathi आवळा कॅन्डी असो की आवळा सुपारी, प्रत्येक जण अतिशय आवडीने खात असतो. मात्र या आवळा झाडाविषयी अनेकांना माहिती नसते. भारतीय उपखंडामध्ये उगम पावणारे बारीक पानाचे झाड म्हणून या आवळ्याच्या झाडाला ओळखले जाते. आवळ्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असण्याबरोबरच सौंदर्यकारक दृष्टिकोनातून देखील आवळा झाडाचे फारच महत्त्व दिसून येते.

Amla Plant Information In Marathi

आवळा वनस्पती विषयी संपूर्ण माहिती Amla Plant Information In Marathi

पौराणिक भारतीय आरोग्य शास्त्र आणि आयुर्वेद यामध्ये देखील या आवळ्याची महती दिलेली असून, या आवळ्या बद्दल विविध गुणधर्म देखील सांगण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमध्ये वापरण्यात येणारा हा आवळा अतिशय आरोग्यदायी फळ असण्याबरोबरच केसांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर समजला जातो. त्याच बरोबर त्वचेच्या विविध अशुद्धींना दूर करण्याचे काम देखील या आवळ्या द्वारे केले जाते.

आवळा सेवन  विविध प्रकारे केला जातो. अनेक लोक या आवळ्याच्या फळाला कच्चा स्वरूपात देखील खात असतात, तर इतर काही लोक त्यापासून रस बनवून पीत असतात. व्यवसायिक स्तरावर आवळ्याला पावडर, लोणचे, कॅन्डी, सुपारी यासारख्या अनेक उत्पादनांच्या माध्यमातून विकले जात असते.

विविध प्रकारच्या जीवनसत्त्वांनी आणि खनिजांनी समृद्ध असलेला हा आवळा चवीला मात्र थोडासा तुरट असतो. मात्र तरी देखील पोटाच्या आरोग्यासाठी खूपच उत्तम समाजाला जाणारा हा आवळा प्रत्येक जण आवडीने खात असतो. आजच्या भागामध्ये आपण या आवळा वनस्पती बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.

नावआवळा
प्रकारफळझाड
इंग्रजी नावAnola
शास्त्रीय नावफायलँथस एमब्लिका
हायर क्लासिफिकेशनलिफ फ्लावर
किंगडमप्लांटी
कुटुंब किंवा कुळफायलँथसी

लहान ते मध्यम आकाराचे आणि अगदी छोट्या छोट्या पानांनी समृद्ध असलेले आवळा वनस्पतीचे झाड अतिशय आकर्षक असून, मुख्यतः माळारानावर उगवण्यासाठी ही वनस्पती चांगली समजली जाते. पिसासारखे असणारे याचे पान काहीशा हिरवट पोटी रंगांमध्ये आढळून येते. या वनस्पतीचे पाने नेहमीच फिकट रंगांमध्येच दिसून येतात. शरद ऋतूमध्ये फुले लागणारी ही वनस्पती लहान आणि टनक गोल फळांसाठी ओळखली जाते.

या फळांच्या मध्यभागी एक बियाणे असते, याचा रंग अतिशय गडद हिरवा असतो.  तर फळाचा रंग मात्र पिवळट पोपटी स्वरूपाचा असतो. कोणत्याही हवामानाला जुळवून घेणारे हे आवळ्याचे झाड फारसे लक्ष दिले नाही तरी देखील चांगल्या पद्धतीने वाढत असते. यासाठी पाणी देखील कमी असले तरीही चालू शकते.

आवळा वनस्पतीचे औषधी उपयोग:

पूर्वीच्या काळापासून अगदी आयुर्वेदामध्ये देखील आवळा वनस्पतीचे औषधी गुणधर्म सांगितलेले असून, प्रत्येक आजारांमध्ये आवळ्याचे काही ना काही तरी महत्त्व ओळखले जाते. जीवनसत्व क आणि विविध खनिजे त्याचबरोबर अँटिऑक्सिडंट यांनी पुरेपूर आणि भरगच्च असणारे हे आवळ्याचे झाड रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूपच उपयुक्त समजले जाते.

त्यातील क जीवनसत्त्वामुळे कुठलेही रोगाशी लढण्यासाठी रुग्णांना क्षमता प्राप्त होत असते. त्याचबरोबर शरीरातील विविध दूषित घटक बाहेर टाकण्यासाठी मदत करण्याकरिता यामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म देखील आढळून आले आहेत. ज्या अंतर्गत कर्करोग, हृदयरोग तसेच मूत्रपिंडाशी संदर्भात असणारे आजार दूर करण्यासाठी खूपच मदत मिळत असते.

त्याचबरोबर जुनाट सर्दी देखील या आवळ्याच्या सेवनाने कमी केली जाऊ शकते. त्यामुळे अनेक लोक जेवणानंतर आवळ्याच्या सुपारीचे सेवन करत असतात. जेणेकरून अन्नपचण्याबरोबरच पोटामध्ये होणाऱ्या वायूचे प्रमाण देखील कमी केले जाऊ शकेल. त्याचबरोबर बद्धकोष्ठता दूर करून, या आवळ्याच्या माध्यमातून भूक देखील सुधारली जाऊ शकते. भूक सुधारण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या चवनप्राश मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आवळ्याचा समावेश केलेला असतो.

आवळ्यामध्ये आढळणारी विविध फायटोकेमिकल्स शरीरात दाहक विरोधी गुणधर्म पेरत असतात, त्यामुळे शरीर संधिवात, त्वचा विकार, आणि दमा यांच्याविरुद्ध लढण्यास सज्ज होत असते.

त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी देखील आवळा खूपच गुणकारी समजला जातो. त्यामुळे अनेक डोक्याला लावायच्या तेलामध्ये आवळ्याचा अंश किंवा अर्क टाकलेला आपण बघितला असेलच.

आवळ्याच्या तुरट चवीमुळे त्याला मधुमेही लोकांकडून देखील मोठ्या प्रमाणावर पसंत केले जात असते, कारण मधुमेह आटोक्यात आणण्यासाठी आवळा खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

अति प्रमाणात आवळा खाण्याचे दुष्परिणाम:

आवळा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असला तरी देखील त्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे गरजेचे असते. जास्तीत जास्त प्रमाणावर आवळा जर खाल्ला तर उलट्या व मळमळ होण्याबरोबरच पोट बिघडण्याची समस्या देखील उद्भवू शकते. त्याचबरोबर आवळ्यामध्ये रक्त पातळ करण्याचे गुणधर्म आढळून येत असतात.

त्यामुळे ज्या व्यक्तींना कुठलीही जखम झाली असेल, किंवा हिरड्यांमधून रक्त येत असेल तर या परिस्थितीमध्ये आवळा खाणे धोकेदायक समजले जाते. त्याचबरोबर एलर्जीच्या समस्येमुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवळ्याचे सेवन करणे उचित ठरते.

निष्कर्ष:

आपल्या आजूबाजूला अनेक फळझाडे आढळत असले, तरीही मोजक्या स्वरूपाच्या फळांचे सेवन आपल्या द्वारे नियमित स्वरूपाने केले जात असते. मात्र आवळा हा अतिशय गुणकारी असणारा प्रकार अगदी क्वचितच मानवाद्वारे खाल्ला जातो. त्याच्या तुरट चवीसाठी ओळखला जाणारा हा आवळा लहान मुले प्रचंड आवडीने खात असतात.

या आवळ्याला थोडेसे ठेचल्यानंतर त्यावर मीठ आणि थोडेसे तिखट लावून लहान मुले याचा चांगलाच आस्वाद घेत असतात. अनेक लोकांना या आवळ्याची चव आवडत असली, तरी देखील सहसा हा आवळा कोणीही खाताना आढळून येत नाही. मात्र काही पोटाच्या संदर्भातील आजार झाल्यानंतर डॉक्टरांकडूनच या आवळ्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जात असतो.

आवळा हा विविध प्रकारात खाल्ला जाऊ शकतो, त्यामध्ये मुख्यतः कच्च्या स्वरूपात आवळ्याचे फळ खाल्ले जात असले तरी देखील त्यापासून आवळा कॅन्डी, आवळा लोणचे, आवळा सुपारी, यांसारखे नवनवीन पदार्थ बनवले जात असतात. आयुर्वेदामध्ये देखील याला फार महत्त्व असून, याला अमृत फळाचा किंवा धत्रीफळाचा दर्जा देण्यात आलेला आहे.

आजच्या भागामध्ये आपण या आवळा विषयी संपूर्ण माहिती बघितली असून, आवळा झाडाची देखील माहिती घेतलेली आहे. यामध्ये आवळा म्हणजे काय, आवळ्याच्या झाडाचे आणि फळाचे औषधी गुणधर्म काय काय आहेत, त्याचबरोबर आरोग्यासाठी आवळा कसा गुणकारी आहे, याबद्दल जाणून घेतलेली आहे.

अति प्रमाणात आवळा खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम बघतानाच आवळा ज्यूस बनवण्याची पद्धत आणि आवळा पिकवण्याची देखील पद्धत जाणून घेतलेली आहे. आवळा या झाडाचे कोणते भाग वापरणे योग्य असतात त्याची देखील माहिती बघतानाच आवळ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांसह आवळ्याचे शेती करण्याची पद्धत देखील जाणून घेतलेली आहे.

FAQ

आवळा या फळाची चव साधारणपणे कशा स्वरूपाची असते?

आवळा या फळाची चव साधारणपणे तुरट स्वरूपाची असते, मात्र खाल्ल्यानंतर काही वेळाने तोंडात गोडसरपणा जाणवत असतो.

आवळ्याचे झाड साधारणपणे कसे वाढत असते?

आवळ्याचे झाड हे उंचीला मध्यम असण्याबरोबरच ८ ते १८ मीटर पर्यंत वाढत असते. त्याची पाने अतिशय हिरवट पोपटी रंगाची असून, ती लहान लहान पानांची असतात. जी अगदी पिसाऱ्याप्रमाणेच दिसत असतात.

आवळा ही वनस्पती उगवण्याकरिता कोणत्या स्वरूपाचे हवामान अत्याधिक गरजेचे असते, तसेच यासाठी कोणत्या प्रकारची माती योग्य समजली जाते?

आवळा ही वनस्पती उगवण्याकरिता उष्णकटिबंधीय आणि समशतोष्ण स्वरूपातील हवामानातली गरजेचे समजले जाते. सोबतच या वनस्पतीच्या वाढीकरिता व पाण्याचा उत्तम निचरा होणारी माळरानाची जमीन उपयुक्त असते.

आवळा लागवडीमध्ये मुख्यतः कोणत्या स्वरूपाची लागवड प्रमुख समजली जाते?

आवळा लागवडीत मुख्यतः बियाण्याच्या माध्यमातून केली जाणारी लागवड प्रमुख समजले जाते.

आवळा या वनस्पतीचे उगम कोठे समजले जाते?

आवळा ही भारतीय उपखंडातील उगमाची वनस्पती असून, उष्ण कटिबंधीय परिसरामध्ये उगवण्यासाठी ही वनस्पती सर्वोत्तम समजली जाते.

Leave a Comment