Ambenli Ghat Information In Marathi उंच उंच डोंगरातील नागमोडी वाट, आणि खोल दर्या हे वैशिष्ट्य म्हणजे घाट रस्ते होय. दळणवळण सोयीचे व्हावे म्हणून अनेक ठिकाणी घाट रस्ते निर्माण करण्यात आले, मात्र या घाटरस्त्यांमध्ये आपोआपच सौंदर्याच्या निर्मितीचे देखील कार्य घडून गेले. आज डोंगरदऱ्यामध्ये असणारे अनेक घाट अतिशय सौंदर्यपूर्ण असून, प्रवास करणाऱ्यांच्या मनाला मोहुन टाकत असतात. असाच एक उत्कृष्ट घाट म्हणून आंबेनळी घाटाला ओळखले जाते.
आंबेनळी घाटची संपूर्ण माहिती Ambenli Ghat Information In Marathi
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा घाट एक उत्तम निसर्ग सौंदर्य म्हणून ओळखला जातो. हिरवळीने नटलेला हा घाट अनेक पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबरच येथे असणाऱ्या निसर्गसौंदर्याने प्रत्येकाला मोहन टाकत असतो. आजच्या भागामध्ये आपण या मंत्रमुग्ध करणाऱ्या आंबेनळी घाटाबद्दल माहिती बघणार आहोत. त्याचबरोबर तेथील आसपास असणारी पर्यटन स्थळे, त्याची ऐतिहासिक व भौगोलिक माहिती, व वैशिष्ट्य इत्यादी गोष्टीं बद्दल माहिती बघणार आहोत.
नाव | आंबेनळी घाट |
प्रकार | घाट रस्ता |
लांबी | सुमारे ३५ किलोमीटर |
उंची | समुद्रसपाटीपासून ८०० ते ११०० मीटर |
जवळील नदी | कृष्णा नदी |
जोडणारी शहरे | पोलादपूर ते महाबळेश्वर |
ठिकाण | सह्याद्री पर्वत |
आंबेनळी घाटाचे भौगोलिक स्थान:
महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतात विस्तारलेला हा आंबेनळी घाट लांबीला सुमारे १५ किलोमीटर इतका असून, त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ८०० ते ११०० मीटर इतकी समजली जाते. मुंबईकडून गोव्याकडे जाताना या घाटातून प्रवास करावा लागतो.
खऱ्या अर्थाने हा घाट पोलादपूर ते महाबळेश्वर या शहरांदरम्यान असला, तरी देखील या ठिकाणावरून अनेक शहरांमध्ये प्रवास करता येतो. या घाटामधून जाणाऱ्या महामार्गाचे नाव एन एच ६६ आहे, ज्याला पूर्वी एन एच १७ या नावाने देखील ओळखले जात असे.
पुण्यापासून विचार केला तर अवघ्या १२० किलोमीटर अंतरावर असणारा हा घाट आपण कधीही भेट देण्यासारखा आहे. या ठिकाणी तुम्ही कोणत्याही वाहनाने जाऊ शकता, मात्र मोटरसायकल वापरण्यास येथे धोका समजला जातो.
निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत आंबेनळी घाट:
आंबेनळी घाट हे एक निसर्गसौंदर्याचे मूर्तीमंत उदाहरण असून, पावसाळ्यामध्ये तर येथे खूपच आकर्षक दृश्य दिसून येत असतात. लहान लहान प्राणी इकडून तिकडे उड्या मारत असतात. तर मोठे प्राणी देखील या परिसरामध्ये वावरताना आढळतात.
एकंदरीत प्राणी व वनस्पती यांच्या भरपूर प्रजाती या आंबेनळी घाटात वास्तव्य करत आहेत. त्याचबरोबर निसर्गाच्या सौंदर्यात भर घालणारे विविध नयनरम्य धबधबे, आणि खोल दर्या या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कारणीभूत ठरतात. येथे सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप जास्त असते, कारण धुके आणि उगवत्या सूर्याची कोवळी किरणे अतिशय सुंदर दृश्य निर्माण करतात. जे टिपण्यासाठी छायाचित्रकार गर्दी करत असतात.
आंबेनळी घाटाचे पर्यटन:
आंबेनळी घाट हा मुख्यतः दळणवळणाकरता बनवण्यात आला असला, तरी देखील त्याच्या निसर्गसौंदर्यामुळे तो एका प्रेक्षणीय स्थळांमध्ये रूपांतरित झालेला आहे. या ठिकाणी पर्यटकांसोबत अनेक साहसी गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमी व्यक्ती देखील भेट देत असतात.
या ठिकाणी अनेक लोक कॅम्पिंग सारखे साहसी कार्य देखील करत असतात. तर इतर काही लोक येथील टेकड्यांवर व डोंगरावर चढाई करत गिर्यारोहणाचा आनंद लुटत असतात. या ठिकाणी तुम्हाला अनेक हॉटेल्स, फार्म हाऊस, किंवा कॅम्पिंग च्या ठिकाणांचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे येथे राहण्याचा विचार केला तरी देखील अतिशय उत्तम ठरू शकते.
सांस्कृतिक दृष्ट्या आंबेनळी घाटाचे महत्त्व:
पूर्वीच्या काळी मुख्यतः व्यापारी दृष्टिकोनातून विविध घाट मार्गांची निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे हा घाट देखील एक व्यापारी मार्ग होता. त्याचबरोबर मराठा साम्राज्याच्या काळामध्ये या घाटाचा वापर युद्ध सैनिकांना ये जा करण्यासाठी देखील केला जात असे. धार्मिक दृष्ट्या देखील हा घाट महत्त्वाचा असून, या घाटाच्या परिसरामध्ये दुर्गा देवी आणि महादेव यांचे मंदिरे असून, या मंदिरांना देखील पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात.
आंबेनळी घाटाच्या आसपास असणारी भेट देण्यासारखी ठिकाणे:
आंबेनळी घाटाला भेट देतानाच तुम्ही येथे आसपास असणाऱ्या अनेक पर्यटन स्थळांना देखील भेट देऊ शकता. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या ठिकाणाचा अर्थात प्रतापगड किल्ल्याचा देखील समावेश होतो. प्रतापगड हा आंबेनळी घाटाच्या अगदीच जवळ असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान इतिहासाची साक्ष देणारा हा किल्ला खरोखरच एक उत्तम स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे. या किल्ल्याला भेट देऊन तुम्ही ऐतिहासिक अनुभव घेऊ शकता.
ज्या लोकांना निसर्गसौंदर्यसह धबधबे फार आवडतात, अशा लोकांसाठी येथे लिंगमळा नावाचा धबधबा असून, या धबधब्याची उंची तब्बल ५०० फूट इतकी आहे. फेसाळत कोसळणारे पाणी बघत, निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर हे ठिकाण तुम्ही नक्कीच भेट दिली पाहिजे.
त्याचबरोबर वेण्णा तलाव देखील प्रसिद्ध आहे, आणि जवळच असणाऱ्या महाबळेश्वर हिल स्टेशनला भेट देऊन तुम्ही आपल्या सहलीला एक वेगळा आनंद निर्माण करू शकता.
आंबेनळी घाटाच्या सहलीमध्ये खबरदारी:
आंबेनळी हा एक घाट रस्ता असल्यामुळे येथे भौगोलिक बदल दिसून येत असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची व जीवाची काळजी घेत योग्य रीतीने पर्यटन करायला हवे, व अतिशय सुरक्षित रित्या आपली संपूर्ण सहल पार पाडायला हवी.
निष्कर्ष:
घाट रस्ता म्हटला की अनेकांच्या अंगावर काटा येत असला, तरी देखील निसर्गाच्या सौंदर्याचे खरे चाहते असणाऱ्या प्रवाशांना घाट रस्ते फार आवडत असतात. घाट रस्त्यातून प्रवास करताना एक अलौकिक अनुभव मिळत असतो. त्याचबरोबर निसर्गाचे सौंदर्य बघण्याबरोबरच येथील प्रवासाचा आनंद देखील घेता येतो.
आपोआपच या घाट रस्त्यांमध्ये विविध धबधब्यांची निर्मिती होत असते, त्यामुळे इथून प्रवास करताना मन कसे अगदी प्रसन्न होऊन जात असते. अनेक लोक घाटामधून प्रवास करताना घाबरत असतात, कारण घाट रस्त्यांबद्दल काही आख्यायिका देखील सांगितल्या जातात.
आजच्या भागामध्ये आपण एका घाटा रस्त्याबद्दल अर्थात आंबेनळी घाटाबद्दल माहिती बघितलेली असून, या घाटाबद्दलची भौगोलिक माहिती, या घाटाच्या ऐतिहासिक महत्त्व, त्याचबरोबर या घाटामध्ये बघण्यासारखी अनेक आकर्षक ठिकाने, या ठिकाणी भेट देण्यासाठी च्या काही टिप्स, इत्यादी गोष्टी बघितलेल्या आहेत.
FAQ
आंबेनळी घाट हा कोणत्या ठिकाणी वसलेला आहे?
आंबेनळी हा घाट महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये वसलेला आहे.
आंबेनळी हा घाट कोणत्या महत्वपूर्ण ठिकाणांना जोडण्याचे कार्य करत आहे?
आंबेनळी हा घाट महाराष्ट्रातील पोलादपूर व सातारा किंवा कराड यांना जोडणारा उत्तम घाट असून, या दोन ठिकाणांमध्ये असणारे सह्याद्री पर्वतातून हा मार्ग काढत असतो.
आंबेनळी हा घाट कशासाठी प्रसिद्ध आहे?
आंबेनळी हा घाट त्याचा परिसरामध्ये असणाऱ्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असून, येथे हिरवीगार वृक्षराई, भव्य धबधबे, आणि उत्कृष्ट दृश्य यांच्यासाठी प्रसिद्ध असलेला हा धबधबा दरवर्षी पर्यटकांच्या संख्येने मोठ्या प्रमाणावर भरलेला असतो.
आंबेनळी घाटाच्या जवळ असणारे महत्त्वाचे ठिकाण कोणती आहेत?
प्रवासाच्या दृष्टिकोनातून बघितले तर आंबेनळी घाटाला सर्वात जवळ असणारे रेल्वे स्टेशन म्हणून चिपळूण रेल्वे स्टेशनला ओळखले जाते, जे अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असून, विमानतळाबाबतित तुम्हाला २५० किलोमीटर प्रवास करावा लागेल. व मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठावे लागेल.
छायाचित्रकारांसाठी आंबेनळी घाट का महत्त्वाचा समजला जातो?
आंबेनळी घाटाच्या ठिकाणी सूर्य उगवताना व मावळताना अतिशय उत्कृष्ट दृश्य दिसून येत असते, त्यामुळे अनेक चित्रकार व छायाचित्रकार या ठिकाणी या घटनेचे दृश्य कॅमेऱ्यामध्ये टिपण्याकरिता हजेरी लावत असतात. त्याचबरोबर धुके असताना हा सूर्योदय व सूर्यास्त खूपच छान दिसत असतो.