अजिंक्यतारा किल्ल्याची संपूर्ण माहिती Ajinkyatara Fort Information In Marathi

Ajinkyatara Fort Information In Marathi नावाप्रमाणेच अजिंक्य असणारा अजिंक्यतारा हा किल्ला सह्याद्री पर्वताचे वैभव असून, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये वसलेला आहे. सोळाव्या शतकात अजीमतारा या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला अतिशय अभेद्य असून, औरंगजेब यांनी त्याच्या मुलाच्या नावानुसार या किल्ल्याचे नामकरण केले होते.

Ajinkyatara Fort Information In Marathi

अजिंक्यतारा किल्ल्याची संपूर्ण माहिती Ajinkyatara Fort Information In Marathi

सातारा या जिल्ह्याला स्वराज्याची चौथी राजधानी या नावाने देखील ओळखले जात असते, कारण सर्वात प्रथम राजगड, तदनंतर रायगड, पुढे जिंजी आणि सर्वात शेवटी अजिंक्यतारा इत्यादी किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानी राहिलेल्या आहेत.

सुमारे १३५६ मीटर अर्थात जवळपास ४४०० फूट उंच असणारा हा किल्ला एक मध्यम किल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र असे असूनही तो किल्ला अभेद्य आणि भक्कम स्वरूपाचा आहे. त्याची रचना देखील अतिशय सुंदर रित्या केलेली असून, अनेक पर्यटक दरवर्षी या किल्ल्याला भेट देण्यासाठी आकर्षित होत असतात.

सातारच्या राजधानीचे ठिकाण म्हणून देखील या किल्ल्याला नावलौकिक मिळालेला आहे. साताऱ्याच्या पर्यटनाला येणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून बघावा असा हा किल्ला अतिशय खास असून, आजच्या भागामध्ये आपण या अजिंक्यतारा किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावअजिंक्यतारा
प्रकारकिल्ला
उपप्रकारगिरीदुर्ग
निर्मिती वर्ष ११९०
समुद्रसपाटीपासून उंची ४४०० फूट
निर्माताशिलाहार राजा भोज दुसरा
स्थळसातारा, महाराष्ट्र

बामनोली डोंगर रांगेतील सर्वात उंच किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख आहे. त्यामुळे आसपासच्या सर्वच परिसरातून हा किल्ला बघता येऊ शकतो. तसेच या किल्ल्यावर गेल्यानंतर देखील आजूबाजूच्या परिसरातील अनेक किल्ले आपण बघू शकतो, कारण या किल्ल्यापेक्षा बाकीचे किल्ले काहीसे कमी उंचीवर आहेत.

मराठा साम्राज्याची चोथी राजधानी म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला अतिशय उत्तम व भक्कम असून, या किल्ल्यावर मंगलाई देवीचे मंदिर अतिशय खास आहे. ११५७ या वर्षी या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले असे सांगितले जाते. या किल्ल्याच्या बांधकामाचा निर्माता म्हणून बहमनी साम्राज्यातील राजाला ओळखले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्यावर जुलै १६७३ पासून राज्य केले होते. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने महाराष्ट्रावर आक्रमण करत, या किल्ल्याला वेढा घातला होता. मात्र तेथील सेनापती प्रयागजी प्रभू यांनी तब्बल चार महिने हा किल्ला लढवला होता  मात्र औरंगजेबाने शेवटी हा किल्ला ताब्यात घेऊन त्याला अजमतारा असे नाव दिले होते.

मात्र स्वराज्याच्या वारसदार असणाऱ्या महाराणी ताराबाई यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला, व या किल्ल्याचे नामकरण अजिंक्यतारा असे केले. पुढे पुन्हा एकदा मुघलांनी हा किल्ला ताब्यात घेतला असला तरी देखील छत्रपती शाहू महाराजांनी या किल्ल्याला पुन्हा एकदा जिंकत तिथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते.

त्यानंतर शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला पेशव्यांना प्राप्त झाला, व तिथून या किल्ल्यावर इंग्रजांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यतेश्वर नावाच्या डोंगरावरून देखील हा किल्ला सहजतेने आपण बघू शकतो. या किल्ल्यावरून संपूर्ण सातारा शहर अतिशय सुंदर स्वरूपात बघता येते.

अजिंक्यतारा किल्ल्याच्या आसपास असणारी पर्यटन स्थळे:

अजिंक्यतारा किल्ला बघायला गेल्यानंतर तुम्ही येथे असणारे अनेक पर्यटन स्थळे देखील बघू शकता. ज्यामुळे तुमच्या सहलीच्या आनंदामध्ये नक्कीच द्विगुणित वाढ होण्यास मदत मिळेल. या ठिकाणी सातारा बसस्थानकाच्या अगदी जवळच अर्थात अवघ्या पाच किलोमीटरवर संगम माहुली नावाचे ठिकाण आहे. या ठिकाणी वेण्णा आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम झालेला आहे.

या ठिकाणी अतिशय निसर्ग सौंदर्य फुलून आलेले असल्यामुळे अत्यंत आनंददायी व आल्हाददायी ठिकाण म्हणून या ठिकाणाला ओळखले जाते. त्याचबरोबर इथूनच अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर एक नटराज नावाचे मंदिर असून, या मंदिरालाच उत्तरा चिदंबरम मंदिर या नावाने देखील ओळखले जात असते.

राष्ट्रीय महामार्ग ४ वर असणारे हे मंदिर नेहमीच पर्यटकांच्या आणि भाविक भक्तांच्या गर्दीने गजबजलेले असते. सातारा पासून थोडेसे दूर, मात्र अवघ्या २८ किलोमीटर अंतरावर वजराई नावाचा धबधबा असून, पुण्यातील अनेक लोक पावसाळी पर्यटनाकरिता या धबधब्याला भेट देत असतात.

अजिंक्यतारा किल्ल्याची रचना:

चार मीटर उंचीची तटबंदी असणारा हा किल्ला दोन दरवाजांनी सज्ज असून, आग्नेय दिशेला मोठा दरवाजा, तर वायव्य दिशेला लहान दरवाजा आहे. सोबतच या ठिकाणी देवी मंगलाई, भगवान शंकर, हनुमान, यांसारख्या अनेक देवतांची मंदिरे असून, अत्यंत भक्कम स्वरूपाचा हा किल्ला लाखो पर्यटकांचा आणि ट्रेकिंग करणाऱ्या लोकांचा आवडता किल्ला आहे. या किल्ल्यावर सात तलाव असून, हे तलाव किल्ल्याच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर घालत असतात.

अजिंक्यतारा किल्ल्याला भेट देण्यासाठी वर्षभर सोयीचे असते, मात्र या ठिकाणी पावसाळ्यामध्ये अतिशय उत्तमरीत्या निसर्ग फुलून येत असतो. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये असणारे थंड हवामान येथील निसर्ग सौंदर्याला अधिकच खुलवत असते. उन्हाळ्यामध्ये हा किल्ला बघणे सोयीचे असले, तरी देखील या पर्यटनात फारशी मजा येत नाही. त्यामुळे शक्यतो पावसाळा आणि हिवाळा या ऋतूमध्ये या ठिकाणी भेट देणे उत्तम समजले जाते.

अजिंक्यतारा किल्ल्यावर जाताना स्वतःच्या पिण्याच्या पाण्याची बाटली बरोबर ठेवणे गरजेचे असते. कारण या ठिकाणी कुठल्याही पिण्याच्या पाण्याचे सोय करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर हा गड डोंगरदऱ्यात असल्यामुळे लहान मुलांची देखील काळजी घेणे गरजेचे ठरते.

निष्कर्ष:

महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर किल्ल्यांची संख्या आहे. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असणारे हे किल्ले आज देखील मोठ्या दिमाखात उभे असून, छत्रपती शिवाजी महाराजांनी यातील बऱ्याचशा किल्ल्यांवर आपले राज्य स्थापन केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे तत्कालीन कालावधीमध्ये सर्वाधिक किल्ल्यांचे मालक असणारे व्यक्ति होते.

त्यांनी महाराष्ट्रातील जवळपास  सर्वच मुख्य राजसत्तांचे किल्ले हस्तगत केले होते. आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातील एका उत्कृष्ट किल्ल्याबद्दल अर्थात अजिंक्यतारा किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे. यामध्ये या किल्ल्याचा इतिहास, त्याचबरोबर या किल्ल्यावर बघण्यासारखे ठिकाणे,  व या किल्ल्याची रचना, इत्यादी बाबतची माहिती घेतलेली आहे.

सोबतच या किल्ल्याच्या आसपास असणारी प्रेक्षणीय स्थळे देखील जाणून घेतलेली आहे. या किल्ल्यावर औरंगजेबाने केलेला हल्ला, व त्याला दिलेले प्रतिउत्तर याबाबत देखील माहिती घेतानाच या किल्ल्याला भेट द्यायची असेल, तर उत्तम वेळ कोणती आहे, तसेच उत्तम हंगाम किंवा कालावधी कोणता आहे, याबाबत देखील जाणून घेतले आहे. या किल्ल्यावर जाण्याचा योग्य मार्ग, व काही टिप्स याबाबत देखील माहिती समजून घेतलेली आहे.

FAQ

अजिंक्यतारा हा किल्ला कोठे वसलेला आहे?

अजिंक्यतारा हा किल्ला महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यामध्ये वसलेला असून, सह्याद्रीच्या बामनोली डोंगररांगेमध्ये हा किल्ला स्थित आहे.

अजिंक्यतारा या किल्ल्याची ओळख कशी आहे?

अजिंक्यतारा हा अतिशय उंचीवर वसलेला, आणि मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेला किल्ला आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे, या किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर जाण्यासाठी थेट प्रवास करता येत नाही.

अजिंक्यतारा या किल्ल्यावर कोणाकोणाला बंदी करून तुरुंगात ठेवलेले होते?

१८८० यावर्षी पहिल्या आदिलशहाची पत्नी असणारी चांदबिबी हिला बंदी बनवून अजिंक्यतारा किल्ल्यावर तुरुंगवास आता ठेवले गेले होते. त्याचबरोबर बजाजी निंबाळकर हे देखील या ठिकाणी बंदी म्हणून ठेवण्यात आले होते.

अजिंक्यतारा किल्ल्यावर बघण्यासारखे कोणकोणते ठिकाणी आहेत?

अजिंक्यतारा किल्ल्यावर हनुमान मंदिर, मंगलादेवी मंदिर, गडावरील तलाव, गडावरील बुरुज, महादेव मंदिर, आणि तारा राणीचा वाडा इत्यादी ठिकाणे बघण्यासारखी आहेत.

अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी कोणकोणते मार्ग उपयुक्त आहेत?

अजिंक्यतारा किल्ल्यावर कुठूनही जाता येत असले, तरी देखील पुण्यापासून ११५ किलोमीटरचा प्रवास करून जाणे अतिशय सोयीचे ठरते. साताऱ्यातील अदालत वाडा येथून गाडी रस्त्याने तुम्ही या किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता.

Leave a Comment