वायू प्रदूषण विषयी संपूर्ण माहिती Air Pollution Information In Marathi

Air Pollution Information In Marathi आज आपल्या आजूबाजूच्या सर्वच गोष्टींमध्ये प्रदूषण आढळून येत आहे. आपण खात असलेले अन्न असो की श्वास घेत असलेली हवा असो, अगदी पिण्याचे पाणी देखील अशुद्ध व प्रदूषित झालेले आहे. त्यामुळे हळूहळू वातावरण दूषित होऊन, त्याचा परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीवर होत आहे.

Air Pollution Information In Marathi

वायू प्रदूषण विषयी संपूर्ण माहिती Air Pollution Information In Marathi

प्रदूषण हे दीर्घकालीन परिणाम दाखवत असल्यामुळे, प्रदूषण करताना त्याचे परिणाम दिसून येत  नसले, तरीदेखील भविष्यामध्ये त्यापासून फार त्रास भोगावा लागतो. पूर्वी दहा वर्षांपूर्वी झालेल्या प्रदूषणाचे तोटे आज मानव  भोगत आहे, तर आज केलेला प्रदूषणाला पुढील पिढी बळी पडू शकते. त्यातीलच एक सर्वात जास्त धोकेदायक स्वरूप धारण करत असलेले प्रदूषण म्हणजे वायू प्रदूषण होय.

रस्त्यावरच्या वाहनांपासून मोठ्या मोठ्या कारखान्यापर्यंत अनेक ठिकाणी प्रदूषण होत असून, हवेमध्ये दूषित स्वरूपाचे वायू सोडल्यामुळे मानवासह इतर सर्व प्राण्यांच्या श्वासनामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्यातही झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होत असल्यामुळे, या प्रदूषणाची तीव्रता व दाहकता अजूनच जाणवत आहे. 

मात्र याचा परिणाम समजून देखील अनेक लोक प्रदूषण कमी करताना दिसत नाहीत, त्यामुळे समाजामध्ये प्रदूषणाविषयी जनजागृती निर्माण करणे फार गरजेचे ठरलेले आहे. आजच्या भागामध्ये आपण वायू प्रदूषण म्हणजे काय याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नाववायू प्रदूषण
इंग्रजी नावएअर पॉल्युशन
स्वरूपपर्यावरणीय समस्या
कारणहवेमध्ये दूषित वायू सोडणे
प्रदूषकधूर, जड कण, धूळ आणि दूषित वायू
प्रभावसजीवांच्या फुफुसावर

वायु प्रदूषण म्हणजे काय:

वायु प्रदूषण म्हणजे हवेमध्ये कुठल्याही अनावश्यक घटकांची, अर्थात धूळ, माती, कण, धूर, विषारी वायू इत्यादींचे प्रमाण वाढणे. आणि त्या मार्फत परिसंस्था किंवा वातावरणाला हानी पोहोचणे होय. या अंतर्गत संपूर्ण पृथ्वीतलावर वाईट परिणाम दिसून येत आहेत. यामध्ये मुख्यतः कारखानदारी आणि वाहने कारणीभूत असून, मानवी आरोग्यावर त्याचा फारच नकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

वायु प्रदूषण नैसर्गिकरीत्या होत असले, तरी देखील मुख्यतः या वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढण्यामागे मानवी कृत्य कारणीभूत आहेत. कारण निसर्गतः झालेले प्रदूषण आपोआप भरून देखील निघत असते. दरवर्षी एकट्या दिल्ली राजधानी क्षेत्रामध्ये दहा लाख लोकसंख्येतील सुमारे १८०० व्यक्तींचा मृत्यू प्रदूषणाच्या कारणांनी होत आहे, तर याच ठिकाणी दरवर्षी वीस लाखांपेक्षा जास्त फुफुसाच्या कर्करोगांचे रुग्ण आढळून येत आहेत. यावरून या प्रदूषणाची घातकता लक्षात येऊ शकते.

वायु प्रदूषणाचे स्तर:

वायु प्रदूषणाचे दोन स्तर असतात. ज्यांना पायऱ्या म्हणून देखील ओळखले जाते. पहिला पायरीमध्ये प्रदूषक डायरेक्ट वातावरणामध्ये मिसळत असतात, तर दुसऱ्या पायरीमध्ये हे मिसळलेले प्रदूषक अप्रत्यक्षरीत्या नुकसान करत असतात. ज्यामध्ये ओझोन सारख्या वायूवर परिणाम करणे समाविष्ट असते.

वायु प्रदूषणाचे स्वरूप:

प्रत्येक सजीवांना जीवन जगण्याकरिता प्राणवायूची आवश्यकता असते, आणि कोणताही प्राणी श्वसन करत असताना या प्राणवायू सोबत इतर वायू देखील शरीरामध्ये जात असतात. प्राणवायू वापरून इतर उर्वरित वायू पुन्हा शरीराबाहेर टाकले जातात, मात्र या श्वसनाच्या हवेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषित घटक असतील तर ते शरीरामध्ये जाऊन फुफुसासारख्या अवयवांवर परिणाम करत असतात. त्याचबरोबर वनस्पतींना देखील जीवन जगण्याकरिता या दूषित वायूंचे प्रभाव दिसून येत असतात. त्यामुळे अवघ्या सजीव सृष्टीवर या प्रदूषणाचा परिणाम दिसून येत असतो.

प्रदूषणाची कारणे:

प्रदूषण होत असेल तर त्याची काही कारणे देखील असतीलच. ज्यामध्ये नैसर्गिक व मानवनिर्मित अशा दोन स्वरूपांच्या कारणांचा समावेश होतो.

नैसर्गिक कारणाने होणारे प्रदूषण हे आपोआप भरून निघणारे असते, कारण त्याचे स्वरूप हे कमी प्रमाणात असते. आणि निसर्ग आपोआपच या प्रदूषणाला कमी करत असतो. यामध्ये जंगलामध्ये लागलेली आग किंवा वनवा ज्वालामुखी, वनस्पती व प्राणी यांच्याद्वारे उत्सर्जित केले गेलेले हरितगृह वायू, आणि इतर घातक वायू इत्यादींचा समावेश होतो.

या सर्व प्रदूषक घटकांचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे, निसर्ग आपोआप त्याला रिपेयर करत असतो. मात्र मानवी क्रियाकल्पांमुळे झालेले प्रदूषण हे न भरून काढणारे असते. ज्यामध्ये जीवाश्म इंधन जाळणे, वाहतूक व्यवस्थेतून होणारे प्रदूषण, जंगलतोड, कारखानदारी इत्यादी प्रकारांचा समावेश असतो.

प्रदूषणाचे परिणाम:

कुठलेही प्रदूषण असो, त्याने फार दूरगामी परिणाम होत असतात. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्याला त्याचा तोटा जाणवत नाही. वायु प्रदूषणामुळे जागतिक तापमान वाढ होणे, दृश्यमानता कमी होणे, शेतीवर विपरीत परिणाम होणे, परागीभवन प्रक्रिया कोलमडणे, त्याचबरोबर शारीरिक समस्या जाणवणे, इत्यादी परिणाम दिसून येत असतात.

वायु प्रदूषण रोखण्याचे पर्याय:

वायू प्रदूषणामुळे समाजावर घातक परिणाम होत आहे’ ते सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे यासाठी सरकारने अनेक कडक कायदे देखील बनवलेले आहेत. मात्र या कायद्यांची योग्य अंमलबजावणी होणे देखील तेवढेच गरजेचे आहे. त्याचबरोबर थ्री आर ही त्रिसूत्री वापरून प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी केले जाऊ शकते.

ज्यामध्ये रीयुज, रिसायकल, आणि रिड्यूस या प्रकारांचा समावेश होतो. त्याचबरोबर सार्वजनिक वाहनांचा वापर करणे, काडी कचरा न जाळता त्याचे खत बनवणे, या प्रकारांचा देखील अवलंब केला जाऊ शकतो.

निष्कर्ष:

प्रदूषण नियंत्रण म्हटलं की थोड्यावेळापुरते प्रत्येक जण त्याचे गोडवे गात असतो. मात्र ज्यावेळी स्वतः प्रदूषणाच्या विरुद्ध लढण्याची किंवा प्रदूषण न करण्याची वेळ येते, तेव्हा कोणीही या गोष्टीकडे लक्ष देताना दिसत नाही. प्रदूषणामुळे अनेक गंभीर तोटे मानव जातीसह संपूर्ण सजीवाला होत असून, पर्यावरणाच्या ऱ्हासामध्ये प्रदूषण हे फार मोठे कारण ठरलेले आहे. त्यातही वायू प्रदूषणामुळे जागतिक तापमान वाढ सारख्या महाभयंकर समस्या डोके वर काढत आहेत.

वायु प्रदूषण वेळीच रोखले नाही, तर ते पुढील पिढींना अतिशय घातक ठरू शकते. कदाचित पृथ्वीवरील सजीव सृष्टी यामुळे नष्ट देखील होऊ शकते. त्यामुळे मानवाने प्रदूषणाला आळा घालणे फारच गरजेचे ठरत आहे. आजच्या भागामध्ये आपण या वायू प्रदूषणाविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे.

त्यामध्ये वायू प्रदूषण म्हणजे काय, त्याच्या विविध पायऱ्या, या वायू प्रदूषणाचे स्वरूप कसे असते, प्रदूषण घडवून आणण्यामागील कारणे, तसेच विविध प्रदूषके, यामध्ये नैसर्गिक व मानवनिर्मित प्रदूषके, सोबतच विविध प्रकारच्या वायू प्रदूषकांची यादी, ओझोन आणि वायू प्रदूषण यांचा परस्पर संबंध, प्रदूषणामुळे होणारे विविध स्वरूपाचे परिणाम, प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना, इत्यादी गोष्टींवर माहिती बघितली आहे.

FAQ

वायु प्रदूषण अर्थात एअर पोल्युशन म्हणजे काय?

वायु प्रदूषण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, हवेमध्ये विषारी वायू, धूळ, धूर, आणि घातक पदार्थांचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त वाढणे होय.

प्रदूषणाचे विविध नैसर्गिक कारणे कोणती आहेत?

निसर्गतः देखील हवेचे प्रदूषण होत असते. यासाठी जंगलातील आग, धूळ, ज्वालामुखी, वनस्पती, आणि प्राण्यांच्या विविध क्रिया इत्यादी गोष्टी कारणीभूत असतात.

हवा प्रदूषणाचे मानवनिर्मित कारणे कोणती आहेत?

हवा प्रदूषणाचे मानवनिर्मित कारणांमध्ये जीवाश्म इंधनाचे ज्वलन, जंगलतोड, उद्योगधंदे,  वाहतूक व्यवस्था, व वाहने इत्यादी कारणांचा समावेश होतो.

हवा प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम मानवाच्या कोणत्या अवयवांवर दिसून येत असतो?

हवा प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम मानवाच्या फुफ्फुस या अवयवावर दिसून येत असतो.

हवा प्रदूषणामुळे कोणकोणते परिणाम होत असतात?

हवा प्रदूषणामुळे जागतिक तापमान वाढ यासारख्या गंभीर समस्या दिसून येत असतात. सोबतच पावसामध्ये वादळ निर्माण होणे, दृश्य मानता कमी होणे, शेतीवर परिणाम होऊन उत्पन्न कमी येणे, काही प्राण्यांच्या प्रजाती नाश पावणे, त्याचबरोबर मानवी फुफुसांच्या विविध समस्या निर्माण होणे, इत्यादी परिणाम दिसून येत असतात.

Leave a Comment